Vijay Sales [CPS] IN

Wednesday, June 10, 2020

फिल्मी आहे 'दुनियादारी' फेम अंकुश चौधरी आणि दिपा परब यांची लव्हस्टोरी

फिल्मी आहे 'दुनियादारी' फेम अंकुश चौधरी आणि दिपा परब यांची लव्हस्टोरी 


अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी आहे खूपच हटके



मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीनेविविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकुश आणि दिपाने 2007 साली लग्न केले. ते दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.

दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर 2006 रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा या दोघांनीही त्यांचा साखरपुडा झाल्याचे सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. मीडियाला देखील याविषयी अनेक दिवसांनंतर कळले. 


अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव ही तेव्हाची लोकप्रिय तिकडी. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा अधिक लोकप्रिय ठरला. अंकुशने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट देत तो सुपरस्टार बनला. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.



No comments:

Post a Comment