Vijay Sales [CPS] IN

Wednesday, September 30, 2020

प्राचीन भारतीय गणित - इतिहास आणि सद्यस्थिती

 शाळेच्या वयापासूनच आपण गणित आणि भूमिती हे विषय म्हटले की थोडा धसकाच घेतो, नाही का?


काही जणांना गणिताची मुळात आवड असते पण काही मात्र त्याकडे रुक्ष विषय, आकडेमोड म्हणूनच पाहतात. पण भारतीय व्यवहारात आणि इतिहासात गणिताची सुरुवात आणि रुजवात कशी झाली हे समजून घेण मात्र तितकच रंजक आहे बर का!

हा विषय तसा विस्ताराने मांडण्याचा आहे. पण वाचकांची उत्सुकता वाढवून त्यांना या विषयाची अधिक माहिती घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि त्यासाठी किमान काही प्राथमिक माहिती हाती असावी इतकाच या लेखाचा मर्यादित उद्देश आहे.

गणित हा विषय म्हटला की मोजमापे, संख्या, गुणाकार, भागाकार हे सगळ आलच त्यात. यामध्ये आपल्याला माहिती असलेल्या यज्ञाचा आणि फलज्योतिष शास्त्राचा संबंधी आहे!





लोकमान्य टिळक यांचा अभ्यासपूर्ण असलेला ओरायन ग्रंथ म्हणजे गणित आणि ज्योतिष यांचा उत्तम मिलाफच म्हणावा लागेल.

यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा |
तथैव सर्व शास्त्राणां गणितं मूर्धनि तिष्ठति ||

ज्याप्रमाणे मोराच्या डोक्यावरील तुरा, नागाच्या फण्यावर असलेला मोती उच्चस्थानी आहे त्याचप्रमाणे गणित शास्त्र हे सर्व शास्त्रांच्या उच्चस्थानी, शिरोभागी आहे अशा शब्दात गणित या शास्त्राचे गुणगान केलेले दिसते.

भारतीय संस्कृतीचा आधार म्हणजे चार संहिता- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि नंतरच्या काळात तयार झालेला अथर्ववेद! या जोडीने वेदातील माहिती स्पष्ट करणारी सहा वेदांगे सुद्धा आहेत- शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. गणितशास्त्र हा पूर्वी वेदांग ज्योतिषाचा भाग मानला जात असे. गणित म्हणजे केवळ संख्यांशी संबंध असे नसून या शास्त्राच्या अभ्यासाने परमेश्वराची प्राप्ती होते अशीही समजूत प्रचलित होती.







शून्यासह दशमान पद्धती ही भारताने संपूर्ण विश्वाला दिलेले योगदान आहे.

गणिताची अंकगणित ही एक शाखा. प्रसिद्ध गणिती भास्कराचार्य त्याला "पाटीगणित' असे म्हणतात. दशमान पद्धतीने संख्या लिहिणे हा भारतीय अंक गणितातील महत्वाचा शोध मनाला जातो. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात पुरुषसूक्त आहे. त्यामध्ये सहस्त्रमुखे असलेला, सहस्त्र डोळे असलेला विराट पुरुष असे वर्णन आढळते. येथील सहस्त्र हा शब्द संख्यावाचक आहे. याखेरीज मैत्रायणी संहिता, काठक संहिता, पंचविंश ब्राह्मण अशा ग्रंथातही संख्यांची नावे दिसून येतात.

सोळा संस्कारापैकी सध्या प्रचलित असलेले संस्कार म्हणजे नामकरण, विवाह इ. या संस्कारांमध्ये म्हटले जाणारे जे वैदिक मंत्र आहेत त्यामध्येही संख्यावाचक शब्द दिसून येतात.






भारताच्या इतिहासात जे प्राचीन गणिती होऊन गेले त्यापैकी ब्रह्मगुप्त याने ब्राह्म-स्फुट-सिद्धांत या आपल्या ग्रंथात अंक गणितातील बेरीज, वजाबाकी,वर्गम वर्गमूळ, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक , घन या संकल्पना सांगितल्या आहेत. ब्रह्मगुप्त याने मांडलेल्या चक्रीय चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र प्रसिद्ध पावले आहे. त्याच्याखेरीज श्रीधर,महावीर,भास्कर,श्रीपती इ. गणित पंडितांनी आपापल्या ग्रंथात गणितविषयक विविध संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. बखशाली हस्तलिपी, त्रिशतिका, गणित तिलक, गणित कौमुदी हे गणित विषयक काही प्राचीन ग्रंथ होत.

भूमिती ही गणित शास्त्राची एक महत्वाची शाखा मानली जाते. भारतातील प्राचीन धर्म संस्कृतीतील यज्ञसंस्था ही या शाखेची जननी मानली जाते.





कल्प या वेदांगाच्या अंतर्गत शुल्बसूत्रे नावाचे ग्रंथ येतात. या ग्रंथात यज्ञवेदी निर्मिती याविषयी विवरण केलेले आढळते. पौरोहित्य करणा-या अध्वर्युला केवळ पौरोहित्याचा अभ्यास करून चालत नसे तर त्याला यज्ञकुंडांची निर्मिती करण्यासाठी कर्तव्यभूमितीचा अभ्यास करावा लागे.

प्रत्यक्ष यज्ञ करण्यापूर्वी यज्ञकुंडाची निर्मिती करावी लागे. त्यांचे आकार हे प्रमाणबद्ध असत. प्रत्यक्ष यज्ञ वेदी तयार करण्यापूर्वी त्रिकोण किंवा चौकोन आकाराच्या विटा तयार कराव्या लागत असत. त्या प्रमाणबद्ध असत. शुल्ब म्हणजे मोजण्याची दोरी. त्यामुळे प्रत्यक्ष यज्ञाच्या ठिकाणी दोरीने चितीचा आकार शुल्बसूत्रानुसार काढला जाई.

अंतर मोजण्यासाठी शुल्बसूत्रे अंगुल हे परिमाण वापरत असत. तिल,अणु,प्रादेश, पद, युग, जानु, बाहु ही परिमाणे वापरली जात. एक पुरुष म्हणजे १२० अंगुले एवढे अंतर असे मोजमाप असे.







इसवी सनाचे पाचवे शतक ते बारावे शतक हे भारतीय गणिताचे सुवर्णयुग मानले जाते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात आर्यभट्ट याने दशगीतिक पाद नावाच ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्याने अंकगणित, बीजगणित,त्रिकोणामिती यांच्या संकल्पना मांडल्या. क्षेत्रफळ काढणे,समतल परीक्षा,शंकू आणि त्याची छाया याविषयी त्याने वर्णन केले आहे.

लीलावती आणि भास्कराचार्य हे समीकरण जगात प्रसिद्ध आहे. भास्कराचार्य हे एक प्रसिद्धी ज्योतिषशास्त्रज्ञ होते. त्यांचा सिद्धांत शिरोमणि नावाच ग्रंथ असून त्याच्या पहिल्या भागाचे नाव लीलावती असे आहे. त्याजोडीने करणकुतूहल हा त्यांचा ज्योतिष विषयक आणखी एक ग्रंथ आहे. शून्य या शब्दासाठी भास्कराचार्य यांनी आपल्या ग्रंथात "पूर्ण" असा शब्द वापरलेला दिसून येतो. त्याखेरीज आकाश, बिंदू, गगन,विष्णुपाद असेही शब्द वापरलेले दिसतात. सिद्धांत शिरोमणि ग्रंथात गणिताध्याय आणि गोलाध्याय यामध्ये ज्योतिष शास्त्र विषयक वर्णन आहे. भारतीय ज्योतिषशास्त्र विषयक मुलभूत माहिती देणारा ग्रंथ म्हणून सिद्धांत शिरोमणि जगता प्रसिद्ध पावलेला ग्रंथ आहे. भास्कराचार्य आणि अन्य अभ्यासकांनी पृथ्वी वाटोळी आहे आणि ती स्वत:भोवती फिरते असे नोंदविलेले दिसते.






त्यानंतर १२व्या शतकाच्या आसपास केरळमध्ये गणिताचे पुनरुज्जीवन झालेलेले दिसते. माधव या अभ्यासकाने करणपद्धती नावाचा ग्रंथ लिहिला. नारायण पंडिताचा गणित कौमुदी हा ग्रंथ हा गणितावर भाष्य करणारा आहे.

कटपयादि सूत्र हा प्राचीन गणितातील एक मनोरंजक प्रकार आहे. केरळमध्ये तिचा विशेष प्रचार झालेला दिसतो. कर्नाटक संगीतातील राग ओळखण्यासाठी याच पद्धतीचा उपयोग केला जातो असे संदर्भ सापडतात.







१८ व्या शतकातील शंकर वर्मन नावाच्या अभ्यासकाच्या सद् रत्नमाला या ग्रंथात त्याने पायची १७ दशांश स्थळापर्यंत किमत शोधून काढलेली दिसते.
संस्कृत ग्रंथ आणि हस्तलिखिते यावर संख्यावाचक अंक दर्शविले जाण्याऐवजी अनेकदा त्याजागी शब्दांचा किंवा प्रतीकरूप संकेतांचा वापर केलेलें दिसतात. उदा. १ या संख्येसाठी चंद्र, सूर्य, ५ या संख्येसाठी इंद्रिय किंवा प्राण अशा प्रकारे.

त्रैराशिक पद्धती, व्याज आणिकर्जाचे व्यवहार, सापेक्ष गती यासंदर्भात प्राचीन गणितात विविध प्रक्रिया नोंदवून ठेवलेल्या दिसून येतात.

जगभरात गेले शतकभर जी शिक्षण पद्धती प्रचलित झाली आहे त्याला 'कारखानदारी शिक्षण पद्धती' असे संबोधले गेले आहे. सुमारे दीड शतकापूर्वी युरोप मध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्याने वस्तू उत्पादन, यंत्रांच्या आधारे करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत गेले. २४ तास आणि बारा महिने न थांबता आणि न थकता काम करू शकणारी यंत्रे विकसित होत राहिली. या करिता असे मनुष्यबळ हवे होते जे मुख्यत्वे एकच एक काम अहोरात्र यंत्राकडून करून घेईल. (Charlie Chaplin यांचा Modern Times हा चित्रपट अवश्य बघा) व्यक्तीगत कल्पकतेला, नवनिर्मितीला, सृजनशीलतेला अजिबात वाव राहिला नाही. या बरोबरीनेच अनेक युरोपीय देशांनी तंत्रज्ञान आणि यंत्रज्ञान यांच्या बळाच्या जोरावर जगभर आपल्या वसाहती वसवल्या. त्यांच्याकडून त्यांना त्यांच्या जगभर पसरलेल्या वसाहतींवर आज्ञाधारक, स्वत्व गमावलेले, कारकुनी काम करू शकणारे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर हवे होते. त्यामुळेच जगभर ज्या देशांवर या युरोपीय देशांचे साम्राज्य पसरले होते तेथील पारंपारिक ज्ञान आणि शिक्षण पद्धती मोडीत काढत 'सांगकामे कारकून निर्माण करणारी' अशी 'कारखानदारी शिक्षण पद्धती' त्यांनी रुजवली.




या शिक्षण पद्धतीने जरी कारखानदारी फोफावली, बळावली, पसरली, रुजली आणि स्थिरावली, वस्तूंचे उत्पादन वाढले तरी जगभरातल्या पारंपारिक ज्ञानाचे आणि ज्ञान ग्रहणाच्या पद्धतींचे मात्र अपरिमित आणि पूर्वस्थितीवर आणायला अतिशय आव्हानात्मक असे नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आपण गणिताबद्दल आणि गणित शिक्षणाबद्दलसुद्धा बघणे आवश्यक आहे. गणिताबद्दलच्या भीती आणि गैरसमज यांच्याबद्दलचे मूळ असे त्याच्या शिक्षण प्रक्रियेत दडलेले आहे.

या दृष्टीने प्राचीन भारतीय गणित जर बघितले तर त्यातील शोध आणि प्रगती हे विस्मयकारी वास्तव आहे हे आता जगन्मान्य झाले आहे; होत आहे.





एक काळ असा होता की रोमन साम्राज्य जगभर पसरले होते. मात्र या जगज्जेत्या समाजाला 'शून्य' या संख्येचा मागमूसही नव्हता ती संख्या ही भारतीय गणिताची जगाला दिलेली एक अत्युच्च अशी देणगी आहे. ज्या संगणकाने डोळे दिपतील अशी प्रगती गेल्या अर्ध शतकात केली आहे तो संगणक केवळ 'शून्य' आणि 'एक' या दोन संख्यांच्या आधारे काम करतो. दशमान पद्धती ही संख्या लिखाणाची पद्धत ज्यात 'स्थानिक मूल्य' आणि 'दर्शनी मूल्य' यांच्या आधारे अवाढव्य मोठ्या संख्या अतिशय संक्षिप्त रुपात मांडणे शक्य झाले. गणिती क्रिया जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी सुद्धा रोमन संख्याच्या पेक्षा अतिशय सुलभ झाले. या मुळे अतिसूक्ष्म आणि अतिविशाल अश्या वैज्ञानिक संख्यांवर (Quantities) काम करणे शक्य झाले ज्यामुळे विज्ञानाची झपाट्याने प्रगती झाली.






प्राचीन भारतातील गणिताची प्रगत माहिती युरोपात पाठविण्याचे काम भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मोपदेशक लोकांनी केले. भारतातील या ज्ञानाचा प्रसार पुढे काळाच्या ओघात अरबस्तानात झाला. व्यापार, तीर्थक्षेत्र भेटी यामुळे संस्कृतीचे जसे आदान प्रदान होत गेले तसेच भारतातील गणिती विद्याही जगभरात पसरली, स्वीकारली गेली, मान्यता पावली.

प्राचीन भारतातील गणित विषयक ग्रंथ हे प्रामुख्याने संस्कृत भाषेतील आहेत. ते अभ्यासायचे तर त्यासाठी संस्कृत भाषा यायला हवी, आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासकांना गणितशास्त्र समजायला हवे. सध्या अशा दोन्ही विषयावरील प्रभुत्व असलेली मंडळी उपलब्ध नाहीतच. त्यामुळे नव्या पिढीतील युवक आणि युवतींनी अशा विषयाचा ध्यास घेवून कार्य केले तर प्राचेने गणिताच्या सर्व प्रक्रिया आधुनिक गणिताशी जोडून दाखविणे रंजक ठरेल, जागतिक ज्ञानात यामुळे मुलभूत भर पडेल.





अवकाशात सोडल्या गेलेल्या पहिल्या वहिल्या दुर्बिणीची कहाणी..!

 


आज आपण एका अतिशय वेगळ्या आणि रंजक गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. तो गोष्ट म्हणजे आहे एक दुर्बीण. आता तुम्ही म्हणाल एका दुर्बिणीबद्दल काय वेगळं जाणून घ्यायचंय, तर मंडळी हि दुर्बीण साधी सुधी नव्हे, ही आहे अवकाशात सोडली गेलेली पहिली दुर्बीण! काय ऐकून चक्रावलात ना..कधी ऐकलंय या दुर्बीणीबद्दल.नाही ना? सगळा मग आज जाणून घेऊया!

अवकाशात सोडल्या गेलेल्या ह्या पहिल्या दुर्बिणीचे नाव आहे हबल दुर्बीण




एडविन हबल या सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे नाव ह्या दुर्बिणीला देण्यात आले आहे. या दुर्बिणीच्या प्राथमिक अंतर्गोल आरशाचा व्यास २.४ मीटर इतका असून अवकाशातून आलेले प्रकाशकिरण हे या आरशाद्वारे परावर्तित होऊन त्याच्यासमोरील ३३ सेंटिमीटर व्यासाच्या बर्हिगोल आरशावर पडतात व त्या ठिकाणी त्यांचे परावर्तन होऊन प्राथमिक आरशाच्या मध्यभागी असलेल्या ६६ सेंटिमीटर व्यासाच्या छिद्रातून मागे एका बिंदूत एकत्र येतात.

याच ठिकाणी बाह्य वस्तूंची प्रतिमा तयार होते. तेथे प्रतिमेचे विश्लेषण करणारी अत्याधुनिक साधने म्हणजेच वाइड फिल्ड प्लॅनेटरी कॅमेरा, फेट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ हाय रिझोल्युशन स्पेक्ट्रोग्राफ, हाय स्पीड फोटोमीटर फेट ऑब्जेक्ट कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक यंत्रे ठेवण्यात आली आहेत.

या यंत्रामध्ये जमा केलेली माहिती दुर्बिणीवर बसवलेल्या अँटेनामार्फत अमेरिकेतील व्हाइट सँडम येथे प्रक्षेपित केली जाते. तेथून कृत्रिम उपग्रहाद्वारे ही माहिती बाल्टिमोर येथील स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट आणि गोडार्ड स्पेस सेंटर येथे प्रक्षेपित केली जाते.




दुर्बिणीला आवश्यक असलेला विद्युत पुरवठा करण्यासाठी तिच्या दोन बाजूंना ११.८ बाय २.३ मीटर आकाराच्या पडद्यावर सोलर सेल्सची शृंखला बसवण्यात आली आहे. हबल अंतरिक्ष दुर्बिणीची एकंदर लांबी १३.१मीटर असून तिचा व्यास ४.३ मीटर आहे.

११६०० किलोग्रॅम वजन असलेली ही अवाढव्य दुर्बीण प्रथमच स्पेस शटलचा उपयोग करून अवकाशात सोडण्यात आली. पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी हबल दुर्बिणीला केवळ ९० मिनिटे लागतात.

हबल अंतरिक्ष दुर्बीण पृथ्वीभोवती भ्रमण करीत असल्यामुळे तिच्या आरशाची दिशा सतत बदलत राहणार हे लक्षात घेऊन तिला प्रदीर्घ काळ एकाच लक्ष्याच्या दिशेत रोखून धरण्यासाठी गायरोस्कोप आणि अत्यंत संवेदनशील अशा पाच मार्गदर्शक संवेदकांचा सेन्सर्सचा उपयोग करण्यात आला आहे.




हबल दुर्बिणीची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. विश्वाचे प्रसरण नेमके किती वेगाने होत आहे याचा शोध हबल दुर्बीण घेते आहे. क्वेझार्स नावाच्या चमत्कारिक खगोलीय प्रकाशाकडून येणा-या जवळजवळ १० ते १२ अब्ज प्रकाशवर्षे अंतरापर्यंतच्या अवकाशातील वस्तूंचा वेध हबल दुर्बीण घेत आहे.

याशिवाय विश्वाच्या वयाचा अंदाज, विश्वाचे मोजमाप, क्वेझार्सच्या स्वरूपाचा शोध, परग्रहांचा शोध वगैरे इतर अनेक गोष्टींचा अभ्यास हबल दुर्बिणीद्वारा केला जात आहे.

अंतरिक्षात प्रक्षेपित झाल्यानंतर हबलमध्ये अनेक अडचणी येऊ लागल्या. त्यात दुर्बिणीच्या आरशांची यंत्रणा प्रकाशकिरणांचे योग्य प्रकारे एकत्रीकरण करू शकत नव्हती. तिचे सोलर सेल पॅनल ३० सेंटिमीटरमधून वर-खाली होत असे.

त्याचा परिणाम हबल दुर्बीण लक्ष्यापासून विचलित होण्यामध्ये होत असे. याशिवाय एकंदर ६ गायरोस्कोपपैकी २ निकामी व एक अर्धवट कार्य करत असे. रिझोल्युशन स्पेक्वोग्राफ देखील काम करेनासा झाला होता.





हबल अंतरिक्ष दुर्बिणीत निर्माण झालेल्या दोषामुळे खर्च केलेले १.५ अब्ज डॉलर्स पाण्यात जाण्याची वेळ आली. जे दोष पृथ्वीवरून सुधारणे शक्य होते ते तंत्रज्ञानाने सुधारले तरीही दुर्बिणीकडून स्पष्ट छायाचित्रे मिळवणे शक्य होणार नाही ही गोष्ट लक्षात आली.

एकच उपाय बाकी होता तो म्हणजे हबल दुर्बिणीला पुन्हा एकदा स्पेस शटलमध्ये आणून तिची दुरुस्ती करणे. १९९३ रोजी हा चित्तथरारक आणि अभूतपूर्व उपाय प्रत्यक्ष अंमलात आणण्यात आला.

गेली २६ या दुर्बिणीने आपले काम चोख बजावले असून आजही ती उत्तमपणे कार्यरत आहे. या दुर्बिणीमुळे पृथ्वीवर आदळणा-या अवकाशातील वस्तू आदींची माहिती आधीच मिळालेली आहे. या दुर्बिणीने एका तसेच अनेक धूमकेतू व अनेक लघुग्रहांचा शोध लावलेला आहे.





कडकनाथ कोंबडी खाल्ली का? होमिओपॅथी आणि मानसिक विकारासाठी होतोय वापर!

 …म्हणून कडकनाथ कोंबडीची किंमत साध्या कोंडीपेक्षा जास्त असते. जाणून घ्या कडकनाथ कोंबडीचे औषधी गुणधर्म


मेजवानी किंवा पार्टी , हा शब्द उच्चारताच मांसाहारी खवय्यांना कोंबडीचा चमचमीत ,झणझणीत रस्सा आठवला नाही तर नवलच. मांसाहारी लोकसंख्येपैकी बहुतांश लोकसंख्या ही कोंबडीचे मांस खाण्याला प्राधान्य देतात. कोंबडीच्या प्रजातींमध्येसुद्धा आपल्याला निरनिराळ्या भागांमध्ये तेथील हवामान ,खाद्यसंस्कृती यानुसार निरनिराळ्या प्रजाती आढळून येतात. अशीच एक कोंबडीची प्रजाती सध्या त्याच्या मांस व अंड्याच्या  चवी सोबतच औषधी गुणधर्मामुळे चर्चेत आहे.



कोंबडी ची ही  प्रजाती म्हणजे कडकनाथ कोंबडी होय. अलीकडच्या काळामध्ये कडकनाथ कोंबडी पालनाचे प्रमाण भारताच्या बहुतांश भागांमध्ये वाढल्याचे दिसून येते. या कडकनाथ कोंबडीच्या पालना मधून प्रचंड नफा मिळत असल्याचे चित्र समोर आल्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा अनेक शेतकरी व कुकूटपालन उद्योजकांनी कडकनाथ कोंबडीचे पालनाचा उद्योग सुरू केले मात्र यामध्ये मध्यंतरीच्या काळात फसवणूक झाल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे कडकनाथ कोंबडी म्हणजे नक्की काय आहे व या कडकनाथ कोंबडी चे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांमध्ये निर्माण झाली. आज आपण कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.


कडकनाथ कोंबडी भारतीय कोंबड्याची प्रजाती असून तिला काली मासी म्हणजे काळे मांस असलेली कोंबडी असे म्हटले जाते. कडकनाथ कोंबडी किंवा काली मासी इंडोनेशियातील आयाम केमिया कोंबडीच्या प्रजातीशी मिळतेजुळते आहे. कडकनाथ कोंबडी भारतातील राजस्थान आणि गुजरात मधील धर आणि झाबुआ प्रदेशांमध्ये मुख्यत्वे आढळते. कडकनाथ कोंबडी मुख्यत्वे गुजरात आणि राजस्थान मधील आदिवासी ,वनवासी द्वारे संवर्धित केली जाते.


गुजरात आणि राजस्थान मधील ग्रामीण भागामध्ये कडकनाथ कोंबडी ला पवित्र मानले जाते व दिवाळीनंतर तेथील देवतेला कडकनाथ कोंबडीचा नैवद्य अर्पण केला जातो. कोंबडी चे प्रमुख तीन प्रकार आहेत जेट ब्लॅक, गोल्डन आणि पेन्सील हे तीन प्रकार कडकनाथ कोंबडीचे आहेत.कडकनाथ कोंबडीचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य व शरीराला होणारा फायदा म्हणजे अन्य प्रजातीच्या कोंबड्यांच्या मांसापेक्षा कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये कमी प्रमाणात फँट असतात.


कडकनाथ कोंबडीच्या बाबतीत जॉग्रफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक संकेतांक भारत सरकारने कडकनाथ कोंबडीच्या मांसाला भारत सरकारने 2018 साली भौगोलिक संकेतांक प्रदान केला आहे. कडकनाथ कोंबडी चा रंग करडा किंवा काळा असतो. त्याचप्रमाणे कडकनाथ कोंबडीचे मांस आणि अंडी सुद्धा  काळ्या रंगाची असतात. कडकनाथ कोंबडी चा रंग काळा असण्यामागे मेलँनिन या घटकाचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते.


कडकनाथ कोंबडीचे मूल्य हे अन्य कोंबड्यांच्या मूल्यापेक्षा  अधिक असते याचे प्रमुख कारण म्हणजे कडकनाथ कोंबडी वरील औषधी गुणधर्म होय. कडकनाथ कोंबडी मध्ये साधारण 25 टक्के इतके प्रोटीन असते तर अन्य कोंबड्यांच्या मांसामध्ये सर्वसाधारणपणे 18 टक्के इतके असते.


कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो असिड व सर्व विटामिन्स असतात जी आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास साहाय्य करतात. कडकनाथ कोंबडीची अंडी व मांस रक्तदाबाच्या विकारांवर लाभदायी ठरतात असे काही संशोधनांमध्ये आढळून आलेला आहे.



कडकनाथ कोंबडीची अंडी व मांस कोलेस्टेरॉल कमी असल्यामुळे डायट साठी व ह्रुद्यविकारांवर सुद्धा प्रभावी ठरते. कोंबडीचे मांस काही औषधांमध्ये कामोत्तेजना वाढवणार्‍या औषधांमध्ये वापरले जाते. अस्थमा ,टीबी, दमा यासारख्या विकारांवर सुद्धा कडकनाथ कोंबडीचे मांस व अंडी उपाय योजना करू शकतात असे काही औषधांमध्ये दिसून आले आहे.



कडकनाथ कोंबडी तिच्या  औषधी गुणधर्मांमुळे साधारण कोंबड्याच्या पेक्षा अधिक मूल्याने विकली जाते. साधारण सर्वसाधारण कोंबडीचे मूल्य प्रतिकिलो दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रतिकिलो असून  कडकनाथ कोंबडीचे मुल्य प्रति किलो बाराशे रुपये ते पंधराशे रुपये प्रति किलो इतके असते. कोंबडीच्या मांस सेवनामुळे त्वचेचे विकार ,हृदय विकार, रक्तविकार सुद्धा दूर ठेवले जाऊ शकतात.



Monday, September 28, 2020

निवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही


 भिनयाशिवाय इतरही क्षेत्रात सक्रिय असणारे बरेच कलाकार मराठी कलाविश्वात आहेत. या इंडस्ट्रीतून यशस्वी उद्योजक ठरलेले कलाकार कोणते ते पाहुयात..


अभिज्ञा भावे- 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री अभिज्ञा भावेनं एअर होस्टेसचं प्रशिक्षण घेतलं. अभिनयातही करिअर करणाऱ्या अभिज्ञाने तिची खास मैत्रीण तेजस्विनी पंडित हिच्यासोबत मिळून कपड्यांचा एक ब्रँड लाँच केला. अभिज्ञाला फॅशन डिझाइनिंगमध्ये रस आहे.


तेजस्विनी पंडित- 'तेजाज्ञा' हा कपड्यांचा ब्रँड अभिज्ञा भावे आणि तेजस्विनीने मिळून लाँच केला. तरुणांमध्ये हा ब्रँड चांगलाच लोकप्रिय आहे.


शशांक केतकर- श्री या नावाने घराघरात ओळखला जाणारा अभिनेता शशांक केतकर याचं पुण्यात एक रेस्टॉरंट आहे. 'आईच्या गावात' असं या रेस्टॉरंटचं नाव आहे.


आरती वडगबाळकर- अभिनेत्री आरतीचाही कपड्यांचा व्यवसाय आहे. आरती गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि यशस्वी डिझाइनरसुद्धा आहे. अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ चांदेकर यांसारखे मराठी कलाकार तिच्या कपड्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट करताना दिसतात.


क्रांती रेडकर- अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर तिच्या भन्नाट विनोदी व्हिडीओमुळे चर्चेत असते. क्रांतीचाही कपड्यांचा व्यवसाय आहे. यासोबतच तिने नुकतंच ज्वेलरी ब्रँडसुद्धा लाँच केलं आहे.


पराग कान्हेरे- 'बिग बॉस मराठी २' फेम पराग कान्हेरे हा सेलिब्रिटी शेफ आहे. परागने नुकतंच एक रेस्टॉरंट सुरू केलं असून त्या विविध प्रकारचे वडापाव ही त्या रेस्टॉरंटची खासियत आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याने हा नवीन व्यवसाय सुरू केला. खर्डा वडापाव, चुरा वडापाव असे भन्नाट वडापावची चव त्याच्या रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळते.


अपूर्वा नेमळेकर- 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ज्वेलरी डिझाइनरसुद्धा आहे. अपूर्वा तिचे अनेक डिझाइन्स सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.


निवेदिता सराफ- 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत आसावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा साड्यांचा व्यवसाय आहे. 'हंसगामिनी' असं त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे.


Sunday, September 27, 2020

वजन 1.2 किलो, लंबाई 70 सेंटीमीटर, ये है गोल्ड मेडलिस्ट चूहा, कारनामा जानकर रह जाएंगे हैरान

 अपने मेडल के साथ मगावा। मगावा को पीडीएसए गोल्ड मेडल दिया गया। 




लंदन, न्यूयॉर्क टाइम्स न्यूज एजेंसी। आमतौर पर लोगों की जिंदगी बचाने का काम सेना के जवानों और सुरक्षाकर्मियों के ही जिम्मे माना जाता है मगर जब यही काम कोई बेजुबान और छोटा सा जानवर करता है तो वो इनाम का हकदार हो जाता है। बेजुबान जानवरों से ऐसी उम्मीद भी नहीं की जाती है कि वो किसी की जान बचाने जैसा जोखिम भरा काम कर सकते हैं मगर लंदन में ऐसा एक मामला सामने आया है जिसने सभी का ध्यान अपनी ओर खींच लिया है। ये बेजुबान जानवर एक छोटा चूहा है।

बारूदी सुरंग और विस्फोटक सामग्री का पता लगाया 

मगावा नामक चूहे को पीडीएसए गोल्ड मेडल से नवाजा गया है। यह मेडल पशुओं को बहादुरी के लिए दिया जाता है। मगावा 39 से ज्यादा बारूदी सुरंग और अन्य विस्फोटक सामग्री का पता लगा चुका है। बारूदी सुरंग के बारे में पता चलने पर वह जमीन को खोदना शुरू कर देता है, जिससे उसकी देखभाल करने वालों को विस्फोटक पदार्थ की मौजूदगी का पता चल जाता है।

मगावा को बेल्जियम के गैर लाभकारी संगठन एपोपो ने प्रशिक्षित किया है। यह संगठन वर्ष 1990 से बारूदी सुरंगों का पता लगाने के लिए जानवरों का इस्तेमाल कर रहा है। संगठन के मुताबिक, मगावा का वजन कम है। यदि वह किसी बारूदी सुरंग के ऊपर भी पहुंच जाता है तब भी उसमें विस्फोट नहीं होता। वह टेनिस कोर्ट जितने बड़े मैदान को जांचने में 20 मिनट का वक्त लेता है।

क्यों दिया गया पुरस्कार 

ब्रिटेन की एक चैरिटी संस्था ने अफ्रीकी नस्ल के एक विशाल चूहे को बहादुरी के लिए गोल्ड मेडल से नवाजा है। इस चूहे ने कंबोडिया में बारूंदी सुरंगें हटाने में मदद की थी। वह इस पुरस्कार को जीतने वाला पहला चूहा है। इस अफ्रीकी जाइंट पाउच्ड चूहे का नाम मागावा है और वह सात साल का है। उसने सूंघकर 39 बारूदी सुरंगों का पता लगाया। इसके अलावा उसने 28 दूसरे ऐसे गोला बारूद का भी पता लगाया जो फटे नहीं थे। शुक्रवार को ब्रिटेन की चैरिटी संस्था पीडीएसए ने इस चूहे को सम्मानित किया।

15 लाख वर्गफीट इलाके को बारूदी सुरंग से मुक्त बनाया 

मागावा ने दक्षिण पूर्व एशियाई देश कंबोडिया में 15 लाख वर्ग फीट के इलाके को बारूदी सुरंगों से मुक्त बनाने में मदद की। इस जगह की तुलना आप फुटबॉल की 20 पिचों के बराबर से कर सकते हैं। यह बारूदी सुरंगें 1970 और 1980 के दशक की थीं जब कंबोडियो में बर्बर गृह युद्ध छिड़ा था। कंबोडियो के माइन एक्शन सेंटर (सीएमएसी) का कहना है कि अब भी 60 लाख वर्ग फीट का इलाका ऐसा बचा है जिसका पता लगाया जाना बाकी है। 



कैसे लगाया बारूदी सुरंगों का पता 

चूहों को सिखाया जाता है कि विस्फोटकों में कैसे रासायनिक तत्वों को पता लगाना है और बेकार पड़ी धातु को अनदेखा करना है। इसका मतलब है कि वे जल्दी से बारूदी सुरंगों का पता लगा सकते हैं। एक बार उन्हें विस्फोटक मिल जाए तो फिर वे अपने इंसानी साथियों को उसके बारे में सचेत करते हैं। उनकी इस ट्रेनिंग में एक साल का समय लगता है। बारूदी सुरंग हटाने के लिए काम कर रहे गैर सरकारी संगठन हालो ट्रस्ट का कहना है कि इन बारूंदी सुरंगों के कारण 1979 से अब तक 64 हजार लोग मारे जा चुके हैं जबकि 25 हजार से ज्यादा अपंग हुए हैं।

वजन मात्र 1.2 किलो, लंबाई 70 सेंटीमीटर 

मागावा का वजन सिर्फ 1.2 किलो है और वह 70 सेंटीमीटर लंबा है। इसका मतलब है कि उसमें इतना वजन नहीं है कि वह बारूदी सुरंगों के ऊपर से गुजरे तो वे फट जाए। वह आधे घंटे में टेनिस कोर्ट के बराबर जगह की तलाशी ले सकता है। इंसानों को इतने बड़े इलाके को मेटल डिटेक्टरों के सहारे साफ करने के लिए चार दिन चाहिए।

अब होगा रिटायर 

सात साल की उम्र पूरी करने के बाद अब मागावा अपने रिटायरमेंट के करीब है। कैलिफोर्निया के सैन डिएगो चिड़ियाघर का कहना है कि जाइंट अफ्रीकी पाउच्ड चूहों की औसत उम्र आठ साल होती है। पीडीएसए के महानिदेशक जैन मैकलोगलिन ने ब्रिटेन के प्रेस एसोसिएशन के साथ बातचीत में कहा कि मागावा ने उन पुरुषों, महिलाओं और बच्चों की जिंदगी बचाई है जो इन बारूदी सुरंगों से प्रभावित होते हैं।  

Friday, September 25, 2020

स्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवा, अंधश्रद्धा नको

 

स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश, शिकवण समाजासाठी नेहमीच मार्गदर्शन आणि दिशादर्शन करणारी असते. स्वामी समर्थ महाराजांचे शिकवण आणि उपदेश कालातीत असून, आजच्या काळातही ते तंतोतंत लागू पडत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतल्याचे सांगितले जाते.



भारतीय परंपरा आणि संस्कृती श्रद्धेला अधिक महत्त्व देणारी आहे. एखादी व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते. कोणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी देवावर श्रद्धा ठेवतो. तर कोणी दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवतो. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. जवळपास सर्वच संतांनी थोतांड, चुकीच्या चालिरिती यांवर जोरदार प्रहार केला. समाजाला उपदेश करताना सत्कर्म करण्यासह चुकीच्या गोष्टींना तिलांजली देण्याचे आवाहन केले. पुरोगामी विचार गेल्या अनेक वर्षांपासून रुजवण्याचे काम केले जात आहे. स्वामी समर्थ महाराजांचा महिमाही अगाध आहे. स्वामी समर्थांनी वेळोवेळी विविध घटनांतून समाजाला योग्य दिशा देणारे उपदेश, शिकवण दिली. या घटनेत नेमके काय घडले? जाणून घेऊया...

स्वामी समर्थ महाराजांचा उपदेशः सद्गुरुशी नेहमी एकनिष्ठ असावे.

एकदा गणपतीबुवा स्वामींच्या दर्शनाला आले होते. मात्र, स्वामींनी त्यांना हाकलवून दिले. स्वामींच्या या कृतीचे गणपतीबुवांना फार वाईट वाटते. त्याच वेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णास्वामी येतात. आपण साक्षात कृष्णाचा अवतार असल्याचे कृष्णास्वामी लोकांना भासवायचे. कृष्णास्वामीच्या गोड बोलण्याला गणपतीबुवा अगदी भूलले आणि त्यांच्या आहारी गेले.

स्वामी समर्थांचा उपदेश: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

सावधगिरी बाळगा. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊ नका, असे स्वामी नेहमी सांगत. मात्र, स्वामींची शिकवण गणपतीबुवा विसरले आणि कृष्णास्वामीच्या आहारी गेले. इथेच गणपतीबुवा चुकले. कालांतराने गणपतीबुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला. कृष्णास्वामीवर अगाध श्रद्धा असल्याने गणपतीबुवांनी मुलाला वैद्यांकडेही नेले नाही. एकदा कृष्णास्वामीचे प्रबोधन सुरू असताना स्वामी समर्थ तिथे येतात. कृष्णास्वामी त्यांचा अपमान करतो. आपल्यासमोर स्वामी काहीच नाही, असा आविर्भाव मिरवतात. स्वामींनी आपल्याशी शास्त्रार्थ करावे, असे आवाहनही करतात. पण स्वामी काही न बोलता मुकाट्याने तिथून निघून येतात.

स्वामी समर्थ शिकवण: आत्मोन्नती हेच शत्रूस सर्वश्रेष्ठ शासन

गावकरी कृष्णास्वामीचा जयजयकार करतात. हा सर्व प्रकार पाहून गणपतीबुवाची कृष्णास्वामीवरची श्रद्धा वाढते. कृष्णास्वामी गावकऱ्यांना भूल घालायला लागले होते की, तुम्ही मला धन, संपदा दान करा. त्याबदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल, असे सांगत फिरतात. गावकरीही त्यांच्या आहारी जायला लागले होते. दुसरीकडे काही केल्या गणपतीबुवाच्या मुलाचा आजार बरा होत 
नव्हता. उलट परिस्थिती गंभीर बनत जाते. चोळप्पा कळकळीनी त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात. गणपतीबुवा चोळप्पाला ढकलून देतात. चोळप्पा पडणार तितक्यात मागून स्वामी समर्थ त्याला सांभाळतात.

स्वामी समर्थांची शिकवणः सत्कर्माचा अहंकार कधीही करू नये
स्वामी गणपतीबुवाला खूप रागवतात आणि म्हणतात की, अरे माणसा, अजून तुला अक्कल आलेली नाही. इतके अनुभव घेऊनही चांगल्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतोस? मात्र, गणपतीबुवा तरीही काही ऐकायला तयार नसतात. मग स्वामी म्हणतात की, बघ तुझा कृष्णास्वामी काय करतो आहे?, असे सांगून आपल्या साधनेच्या बळावर सर्व लोकांना समोरच्या भिंतीवर कृष्णास्वामींचे कृष्ण-कृत्य दाखवतात. त्यात सर्वांना कृष्णास्वामी स्त्री शिष्यांसोबत नृत्य करतात. मद्यपान करतात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर मौज करताना दिसतात.

स्वामी समर्थ शिकवणः स्वार्थासाठी निसर्गाची विटंबना करू नका

ती दृश्ये पाहून गणपतीबुवांसकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाडकन उघडतात. गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. कृपासिंधु स्वामी गणपतीबुवांच्या मुलाला खडखडीत बरा करतात. दुसरीकडे, इकडे सर्व गावकरी कृष्णास्वामीला चोप देतात. कृष्णास्वामी पळत स्वामींना  शरण येतो. स्वामी त्याला गाव सोडून जाण्याची आज्ञा करतात. कृष्णास्वामी शरमेने मान खाली घाऊन गाव सोडून निघून जातो. स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की, श्रद्धा जरूर ठेवा. पण अंधश्रद्धा ठेऊ नका.

Why do we say Om कोणत्याही मंत्राचा प्रारंभ ॐ ने का करतात? वाचा, 'हे' अद्भूत रहस्य

 

ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. या बीजाक्षरात गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे. ओमकाराचे महत्त्व, पौराणिक दाखले, धर्मग्रंथातील उल्लेख आणि मंत्राचा महिमा यांबाबत जाणून घेऊया...


ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. या बीजाक्षरात गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे. हे बीजाक्षर सगळ्या बीज मंत्रांचा शिरोमणी आहे, असे मानले जाते. एका ॐ मध्ये तीन अक्षरांचा समावेश होतो. ते म्हणजे 'अ', 'ऊ' आणि 'म'. ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहेत. विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्म देवाने १२ वर्षे ओमकार करून तपश्चर्या केली. ब्रह्माचे हे १२ वर्ष म्हणजे पृथ्वीची ३७,३२,४८० कोटी वर्षे. ओमकाराच्या गूढ आवाजाने आणि त्याच्या आत्म्याने आपण राहतो ती सूर्यमाला उत्पन्न केली, अशी लोकमान्यता आहे.

कोणत्याही मंत्रांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तो जेवढा लघु आणि सूक्ष्म असतो, तितका म्हणायला सोपा आणि अधिक ताकदीचा असतो. तो छोटा असल्यामुळे म्हणताना मनाची एकाग्रता वाढते आणि मंत्र जास्त परिणामकारक होतो. हा प्रवास 'जड'कडून सूक्ष्मतेकडे जाणारा असतो. म्हणून ओमकाराने आपल्या सर्व शरीरात प्रेरणेचा संचार होतो, असे म्हटले जाते. ओमकाराचे महत्त्व, पौराणिक दाखले, धर्मग्रंथातील उल्लेख आणि मंत्राचा महिमा यांबाबत जाणून घेऊया...

ॐ काराची रचना




एका ॐ अक्षरामध्ये तीन अक्षरांचा समावेश होतो. 'अ', 'ऊ' आणि 'म' ही अक्षरे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानली गेली आहेत. म्हणूनच कोणत्याही मंत्राच्या आधी ओंकार लावला, तर त्या मंत्राची शक्ती कितीतरी पटीने वाढते, अशी मान्यता आहे. ओमकार हा साडे तीन मात्रांचा बनलेला असतो. 'अ', 'ऊ', 'म' आणि अनुस्वाराची अर्ध मात्रा. त्याच्या पुढे १६ मात्रा होतात आणि प्रत्येकीचे चार भाग पडतात. प्रत्येक भाग पुरुष आणि प्रकृती यामध्ये विभागले जातात. यानंतरचे भाग आपल्या संवेदनावाहक मज्जातंतुंशी तंतोतंत जुळतात, असे सांगितले जाते. यामुळे ओमकाराचा उच्चार केल्याने हे मज्जातंतू स्फुरण पावतात आणि सशक्त होतात.

गीता आणि कठोपनिषद




श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेतील उल्लेखानुसार, ॐ उच्चारणाऱ्या व्यक्तींना पुण्यप्राप्ती होते. ईश्वरी कृपेने ॐ मंत्रोच्चार करणाऱ्याला परम गती प्राप्त होते, असे सांगितले गेले आहे. कठोपनिषदात सांगितल्यानुसार, ॐ हा वेदांचे सार आहे. तपस्वी आणि योगिमुनींच्या ज्ञानाचा ओमकारात समावेश आहे. म्हणून कोणत्याही मंत्रोच्चारापूर्वी ॐ कार लावल्याने या सर्वांची शक्ती त्या मंत्रापाठी भक्कमपणे उभी राहते, असे सांगितले जाते. हा मंत्र 'अ', 'ऊ' आणि 'म' या वेगवेगळ्या अक्षरांनी तयार झाला असला तरी, ही तिन्ही अक्षरे कुठेही न थांबता सलगपणे म्हणावी, असे सांगितले जाते.

माण्डूक्य उपनिषद



माण्डूक्य उपनिषदातही ॐ काराचा महिमा वर्णन करण्यात आला आहे. कोणत्याही मंत्राचे उच्चाकरण ॐ काराने करणे आवश्यक आहे, असे सांगितले आहे. तर, ओंकाराचा अर्थ 'अनुज्ञा' म्हणजेच स्वीकृती, असा केला गेला आहे. जो ओंकाराचा स्वीकार करणे समजतो, तो समृद्ध होतो. शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरु, गुरु नानकदेव यांनीही 'इक ओंकार सतनाम' म्हणजेच ॐ कार हेच खरे सत्य असे नाव आहे, अशी त्याची व्याख्या केली आहे.

ॐ काराचे महत्त्व



अनेक धार्मिक ग्रथांमध्ये ॐ काराचे महत्त्व वर्णन करण्यात आले आहेत. कोणत्याही मंत्राआधी ॐ कार जोडणे हे शुद्ध आणि शक्ती संपन्न मानले गेले आहे. कोणत्याही देवी, देवता, ग्रह किंवा ईश्वरी मंत्राचा जप करताना त्याआधी ॐ कार लावणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. एखाद्या मंत्राचा कितीही जप केला, तरी ॐ काराशिवाय कोणताही मंत्र फलदायी ठरत नाही, अशी मान्यता आहे. जैन दर्शनमध्येही ॐ काराचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे. तर महात्मा कबीर यांनी ॐ काराचे महत्त्व जाणून त्यावर 'साखियां' रचल्या आहेत. 

उच्चार आणि धार्मिक मान्यता




ॐ कारातील 'अ' या अक्षराच्या उच्चाराने ओठ उघडले जातात. यातून ब्रह्मदेवाचे स्मरण होते. 'उ' या वर्णाच्या उच्चाराने ओठाचा चम्बू होतो. यातून सृष्टीचा पालनहार श्रीविष्णूचे स्मरण होते व सृष्टीच्या चक्राचा प्रारम्भ होतो. म् उच्चारतांना ओठ बंद होतात. हे सृष्टीच्या लयाचे प्रतीक आहे. त्यातून शिवाचे स्मरण होते. ॐ कारातील आद्य स्वर स्वर उच्चारल्यास आपणास मूलध्वनीचा आभास होतो. 'उ' हा मुखोत्पन्न सर्वाधिक तीव्र स्वर आहे. ही तीव्र शक्ती आहे, ती आपणास संकटाप्रसंगी शरीराला ऊर्जा प्रदान करते. 'म' प्राथमिक अनुनासिक असून, ते उच्चारले असता त्याआधील ध्वनीचा लोप होतो व वातावरण शांत होते. हा उच्चार आपणास परमतत्त्व शिवाचा आभास घडवतो. अशाप्रकारे, ॐ कार परमतत्त्व प्रदर्शक आहे, असे सांगण्यात आले आहे.

सिद्धिविनायक मंदिर से जुड़ी ये अनसुनी बातें जानते हैं आप

 

नि:संतान की मुराद पूरी होती है सिद्धिविनायक मंदिर में

भारत की आर्थिक राजधानी मुंबई शहर का सिद्धिविनायक मंदिर भारत ही नहीं बल्कि विदेशों में भी गणपति बप्पा के प्रसिद्ध मंदिरों में से एक है। गणपति बप्पा के दर्शन के लिए यहां भारी संख्या में देश-विदेश से श्रद्धालु और सैलानी आते हैं। यह लोगों की आस्था का प्रमुख केंद्र है। गणेश उत्सव में यहां बप्पा के दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ उमड़ती है, देश ही नहीं विदेशों से लोग इस उत्सव को देखने आते हैं। बप्पा की भव्य मूर्ति के दर्शन के साथ इस मंदिर से जुड़ी कई दिलचस्प बातें हैं जिसके बारे में कम लोग जानते हैं आइए आज हम आपको इस मंदिर के बारे में कई महत्वपूर्ण बातें बताते हैं।

क्यों कहते है सिद्धिविनायक


सिद्धिविनायक, भगवान गणेश जी का सबसे लोकप्रिय रूप है, जिसमें उनकी सूंड दाईं और मुडी होती है, जानकारी के अनुसार गणेश की ऐसी प्रतिमा वाले मंदिर सिद्धपीठ कहलाते हैं, और इसलिए उन्हें सिद्धिविनायक मंदिर की संज्ञा दी जाती है। माना जाता है सिद्धिविनायक सच्चे मन से मांगी गई भक्तों की मुराद अवश्य पूरी करते हैं।

स्वामी समर्थ द्वारा भविष्यवाणी के रूप में अंत्येष्टि के 21 साल के बाद मंदार पेड़ की अपनी शाखाओं में एक स्वयम्भू गणेश की उस स्थान पर वृद्धि हुई.
          ये मंदिर बनने के पीछे कारण ये था की गणपति निसन्तान महिलाओं को बच्चे होने का अनुदान करे. रामकृष्ण जम्भेकर महाराज, ने हिंदू संत अक्कलकोट स्वामी समर्थ के एक शिष्य ने अपने गुरु के आदेश पर मंदिर के इष्टदेव के सामने दो दिव्य मूर्तियों को दफन कर दिया.


मंदिर की बनावट

मंदिर के बारे में बताया जाता है कि सिद्धिविनायक मंदिर की मूल संरचना पहले काफी छोटी थी। साथ ही मंदिर की प्रारंभिक संरचना सिर्फ ईटों की बनी हुई थी, जिसका गुंबद आकार का शिखर भी था। बाद में इस मंदिर का पुननिर्माण कर आकार को बढ़ाया गया।

कैसे हुआ निर्माण


गणपति बप्पा के सिद्धिविनायक मंदिर का निर्माण 19 नवंबर 1801 को एक लक्ष्मण विथु पाटिल नाम के एक स्थानीय ठेकेदार द्वारा किया गया था। बहुत कम लोग इस बात को जानते हैं कि इस मंदिर के निर्माण में लगने वाली धनराशि एक कृषक महिला ने दी थी, कहा जाता है कि उस महिला के कोई संतान नहीं थी, उस महिला ने बप्पा के मंदिर के निर्माण के लिए मदद करने की इच्छा जताई थी। वह चाहती थी कि मंदिर में आकर भगवान के आर्शीवाद पाकर कोई महिला बांझ न रहे, सबको संतान प्राप्ति हो।

सबके लिए खुले हैं द्वार


इस मंदिर की विशेषता यह है कि इस मंदिर के द्वार हर धर्म के लोगों के लिए खुले रहते हैं यहां किसी तरह की कोई मनाही नहीं है। सिद्धि विनायक मंदिर में मंगलवार को होने वाली आरती बहुत प्रसिद्ध है जिसमें श्रद्धालुओं की लाइन 2 किलोमीटर तक लंबी होती है।

कैसा है मूर्ति का स्वरूप


गणेश जी की मूर्ति काले पत्थर से बनाई गई है जिसकी सूंड दाई तरफ है। यहां भगवान गणेश अपनी दोनों पत्नी रिद्धि और सिद्धि के साथ विराजमान हैं। ये प्रतिमाएं देखने में काफी आकर्षक लगती हैं। मंदिर के दर्शन शुभ फलदायी माने गए हैं।

गणपति का रूप



गणपति यहां चार हथियार एक कमल, एक कुल्हाड़ी, एक लड्डू और मोतियों की माला, उनकी पत्नियों सिद्धि और रिद्धि से घिरे हुए दिखाए गए है.

             

अमीर मंदिर


सिद्धिविनायक मंदिर की गिनती भारत के सबसे अमीर मंदिरों में की जाती है, जानकारी के अनुसार, यह मंदिर हर साल 100 से मिलियन से 150 मिलियन धनराशि दान के रूप में प्राप्त करता है। इस मंदिर की देखरेख करने वाली संस्था मुंबई की सबसे अमीर ट्रस्ट है।

नवसाचा गणपति


सिद्धिविनायक को नवसाचा गणपति या नवसाला पावणारा गणपति के नाम से भी बुलाते हैं। दरअसल बप्पा को मराठी भाषा में इस नाम से पुकारते हैं जिसका अर्थ होता है कि जब भी कोई भक्त सिद्धिविनायक की सच्चे मन से प्रार्थना करता है तो बप्पा उसकी मनोकामना अवश्य पूरी करते हैं।

चांदी के चूहे


मंदिर के अंदर चांदी से बने चूहों की दो बड़ी मूर्तियां भी हैं मान्यता है कि जो भी श्रद्धालु उनके कानों में अपनी मनोकामनाएं बताते हैं तो चूहे आपका संदेश भगवान गणेश तक पहुंचाते हैं। इसलिए यह धार्मिक क्रिया करते हुए आपको बहुत से श्रद्धालु मंदिर में दिख सकते हैं।