Vijay Sales [CPS] IN

Tuesday, September 1, 2020

Ganesh chaturthi 2018: असे अनोखे मंदिर ज्यात गणपतीची होते स्त्री अवतारात पूजा..

 

Ganesh chaturthi 2018: असे अनोखे मंदिर ज्यात गणपतीची होते स्त्री अवतारात पूजा.. 


असे म्हटले जाते भगवान विष्णूपासून इंद्रापर्यंत आणि अर्जुनापर्यंत सर्वांना काही ना काही कारणासाठी स्त्री रूप धारण करावं लागलं होते. पण हे कमी लोकांना माहिती की गणपतीलाही एकदा स्त्री रूप धारण करावे लागले होते. 


Vinayaki Temple: गणेश चतुर्थीला देशभरातील मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हिंदू धर्मात भगवान गणेशाची कोणत्याही शुभ कार्यापूर्वी पूजा केली जाते. आपल्या देशात बाप्पाचे  अनेक अनोखे मंदिर आहेत, तसेच त्यांच्या अनेक प्राचीन मान्यता आहे. आता आम्ही तुम्हांला अशा अनोख्या गणेशाबद्दल सांगणार आहोत, त्याची स्त्री अवतारात आराधना केली जाते. 
गणेशाच्या या स्त्री अवताराला विनायकी म्हटले जाते. काशी आणि ओडिशामध्ये गणेशाची या रुपात पूजा केली जाते. विनायकी देवी आपल्या एका हातात युद्ध परशू आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड आहे. 


असे म्हटले जाते सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णूपासून इंद्र आणि अर्जून यांना काही ना काही कारणासाठी स्त्री रूप धारण करावं लागलं होते. पण हे कमी लोकांना माहिती की गणपतीलाही एकदा स्त्री रूप धारण करावे लागले होते. 

गणेशाचे विनायकी रूपातील मूर्ती देशातील अनेक मंदिरात आहेत. यात तामिळनाडूतील चिदंबरम मंदिर, जबलपूरजवळील चौसठ योगिनी मंदिरात अशा प्रतिमा दिसतात. 

या शिवाय ओडिशातील रानीपूर झरियालमध्ये अशा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. विनायकी गणेशाची सर्वात जुनी मूर्ती टेराकोटामध्ये बनिली आहे. ही सुमारे २१०० वर्षांपूर्वी राजस्थानात सापडली आहे. 

No comments:

Post a Comment