Vijay Sales [CPS] IN

Tuesday, September 22, 2020

नगर- पुणे मार्गावर धावली पहिली बस,

 

HBD ST BUS: नगर- पुणे मार्गावर धावली पहिली बस, प्रवास भाडे होते फक्त अडीच रुपये


पुणे- प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन धावणारी आजची लालपरी 1 जून 1948 मध्ये प्रथम नगर-पुणे या मार्गावर धावली. लाकडी बॉडी आणि आजूबाजूला कापडी कव्हर लावलेली ही बस बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशनची (बीएसआरटीसीची) होती. विशेष म्हणजे त्या काळातही अवैध वाहतूक होती. त्यामुळे एसटीवर हल्ला होण्याची शक्यता होती. पोलिस बंदोबस्तात माळीवाडा ते पुणे अशी पहिली बस धावली. या एसटीचे पहिले चालक किसन राऊत तर वाहक लक्ष्मण केवटे होते.


प्रवास भाडे होते फक्त अडीच रुपये...

सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली ही बस पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचे प्रवासी भाडे केवळ अडीच रुपये होते. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी बसला थांबवून लोक प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. शिवाजीनगरला कार्पोरेशनजवळ बसचा शेवटचा थांबा होता. ही बस माळीवाडा वेशीपासून ते पुणेपर्यंत पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली.



सुवासिनींनी केले पहिल्या एसटीचे स्वागत
पहिली बस रस्त्यावर धावत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह होता. ठिकठिकाणी बसचे स्वागत करण्यात येत होते. सुवासिनींनी देखील नगर ते पुणे या मार्गावर विविध ठिकाणी एसटीचे पूजन केले. तो दिवस आजही माझ्या स्मरणात आहे, असेही केवटे यांनी सांगितले.



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना...

भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.


'लाल डबा' हे आवडीचे नाव....

'लाल डबा' हे लोकांचे तसे आवडीचे नाव. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर कुठेही जायचे असेल तर मुंबईत प्रायव्हेट बसगाडय़ांची काही कमतरता नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीने ‘गडया...अपुला लाल डबाच बरा!’ असे म्हणत मुंबईकर एसटीलाच प्राधान्य देतो.



महामंडळाचे मुंबईत मोठी तीन आगारे आहेत. मुंबई सेंट्रल, दुसरा परळ आणि तिसरा कुर्ला आगार. कुर्ला आगार बाकीच्या दोन आगारांच्या तुलनेत मोठा असला तरीही ज्या ठिकाणी डेपो असलेले मोठे आगार म्हणजे मुंबई सेंट्रल होय.


साडेपंधरा हजार बसेसचा ताफा...
साडेपंधरा हजार बसेसचा ताफा, दररोज 17 हजार मार्गांवर 70 हजार प्रवाशांना सेवा, अगदी खेड्यापाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुमारे एक हजार थांबे, 247 आगारे आणि वर्षाकाठी फायदा झालाच तर जेमतेम पाच कोटी रूपयांचा महाराष्ट्रातील विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या राज्य परिवहन मंहामंडळाची म्हणजेच सर्वसाधारण भाषेतील ‘एसटी‘ची ही बोलकी आकडेवारी आहे. महाराष्ट्रातील 80 टक्के जनता अद्यापही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर म्हणजेच एसटीवर अवलंबून आहेत.



एसटीची बस राज्याच्या अगदी दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांपासून ते थेट नगरे-महानगरांपर्यंत पोहोचते. एसटीचे हे भक्कम आणि विस्तीर्ण जाळेच लाल डब्याच्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण आहे. शासकीय म्हणून भरवशाची सेवा, माफक दर आणि विनम्र कर्मचारी ही सुद्धा एसटीची वैशिष्टे म्हटली पाहिजेत. एस टी च्या स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत 'एसटी'च्या ज्या समस्या आहेत त्या कायम आहेत . 'एसटी'ला  ना स्वायतता , ना  ही कुठल्या प्रकारच्या सवलती, उलट एस टी  विविध सवलती प्रवासांना देते आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. स्पर्धेत बाजी मारण्यासाठी संपूर्ण राज्यभर असलेले विस्तीर्ण जाळे ही एसटीची महत्त्वपूर्ण जमेची बाब आहे.



No comments:

Post a Comment