Vijay Sales [CPS] IN

Tuesday, December 29, 2020

आपल ठेवायच झाकुन, दुसऱ्याच बघायच वाकुन

 

आपल ठेवायच झाकुन, दुसऱ्याच बघायच वाकुन

आपले झांकी अवगुण । 
पुढिलांस बोले कठिण । 
मिथ्या गुणदोषेंविण । 
गुणदोष लावी ।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।



राठी मधे एक वाक्यप्रयोग वारंवार होताना दिसतो मला सुद्धा तो हल्लीच माहिती झाला तो असा - आपल ठेवायच झाकुन, दुसऱ्याच बघायच वाकुन - यातील चांगला वाईट भाग जो असेल तो क्षणभर बाजुला ठेवा आणि भावार्थ पहा, तो असा की दुसऱ्यामधील दोष पहायचे आणि सहज दिसले नाहीत तर ते शोधुन काढायचे आणि एवढ्यावरच थांबायचे नाही तर त्या दोषांचा जगभर डांगोरा पिटायचा हा मानवी स्वभाव आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्वभावात हा गुण आहेच. हा गुण संसारात आणि परमार्थात देखील आपल्या प्रगतीच्या मार्गात मोठा अडथळा ठरतो. साधे उदाहरण पहा, आपल्या घरचे लाईट(वीज) गेले तर आपण प्रथम घरात काय असेल ते कंदील, मेणबत्ती लावायला पाहिजे की नाही? ते आपण करत नाही. आपण प्रथम काय करतो तर घराच्या बाहेर येऊन पहातो की आपलेच गेले आहेत दिवे की इतरांचे देखील गेले आहेत. इतरांचे देखील दिवे गेले आहेत हे पाहिले की मग आपले दिवे गेल्याचा आपल्याला त्रास होत नाही. बरोबर आहे ना ? थोडक्यात काय? दुसऱ्याचे वाईट गुण पाहिले की आपल्यातील दुर्गुण आपल्याला टोचत नाहीत. वास्तविक समर्थ शिकवण अशी की आपली सफ़ाई आपण करावी इतरांची सफ़ाई करायला जावु नये. पण ते काही अजुन तुमच्या आमच्या सारख्याला जमत नाही.थोडा प्रयत्न करन पहा. बघुयात समर्थ प्रयत्नांना कधी यश देतात ते....
ll जय सदगुरू ll

Sunday, December 27, 2020

नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करताय, तर ‘ही’ आहेत औरंगाबादजवळची मोठी ठिकाणं…

 

नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करताय, तर ‘ही’ आहेत औरंगाबादजवळची मोठी ठिकाणं…


नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराला नक्की भेट दिली पाहिजे.


महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य आहे. सध्या कोरोनामुळे फार लांब सहलीच्या योजना आखल्या जात नसतील, तरी महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणी आहेत. मुळातच महाराष्ट्र मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इथल्या प्रत्येक शहरात माहिती मिळण्यासाठी तसेच निसर्गाचा आनंद लुटण्यासारखी बरीच ठिकाण आहेत. नव्या वर्षाच्या सुट्टीचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ या शहराला नक्की भेट दिली पाहिजे (Vacation Trip In Aurangabad must visit these place).

              महाराष्ट्रातील औरंगाबाद हे शहर पूर्वी फतेहनगर आणि संभाजीनगर म्हणून ओळखले जायचे. औरंगाबाद हे नाव मुघल शासक औरंगजेब याच्या नावाने प्रेरित आहे, ज्याचा शब्दशः अर्थ ‘सिंहासन बांधले’ असा आहे. लोकसंख्येत, औरंगाबाद हे महाराष्ट्रातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे. या शहरात अनेक भव्य आणि बारीक कोरीव काम असलेले दरवाजे स्थित आहेत. जसे की दिल्ली गेट, काळा दरवाजा, रंगीत दरवाजा, पैठन गेट. नेत्रदीपक, शानदार आणि सुंदर दरवाज्यांमुळे हे शहर ‘सिटी ऑफ गेट्स’ म्हणून देखील ओळखले जाते. औरंगाबादमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही आपल्या सुट्ट्या एन्जॉय करू शकता…

वेरूळ लेणी-कैलास मंदिर




औरंगाबादपासून जवळपास 33 किलोमीटर अंतरावर वेरूळची लेणी आहे. इंग्रजांनी वेरुळला एलोरा असे नाव दिले. पुढे या लेण्या एलोरा नावानेच जगप्रसिद्ध झाल्या. येथे एकूण 34 लेणी आहेत. या लेणी तीन धर्माचे प्रतिनिधित्व करतात. यातील 1 ते 10 लेणी बौद्ध धर्माची, 13 ते 20 हिंदू धर्माची तर, 30 ते 34 जैन धर्माची आहेत. यात 16व्या क्रमांकावर कैलास लेणे आहे. डोंगराच्या वरच्या बाजूने सुरवात करुन खालपर्यंत पूर्ण केलेले हे लेणे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. याची लांबी 164 फुट, रुंदी 109 फुट व उंची 96 फुट आहे. हे कैलास मंदिर बांधण्याचे कामं तीन पिढ्यांनी इ.स. 578मध्ये पूर्ण केले. एलोरा जागतिक वारसा स्थान असून, भारतीय रॉक-कट वास्तुकलेचे प्रतीक आहे.

घृष्णेश्वराचे मंदिर




एलोरा लेणीपासून एक किमी लांब पल्ल्यावर, 18व्या शतकात बांधलेले, महाराष्ट्रातील भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ‘घृष्णेश्वर’ मंदिर आहे. हे शिवमंदिर असले तरी येथे पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. घृष्णेश्वराचे मंदिर हे अहिल्यादेवींनी उभारले असून, पूर्वाभिमुख आहे (Vacation Trip In Aurangabad must visit these place).

बीबी का मकबरा



बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहालाची जणू प्रतिकृतीच आहे. या महालात औरंगजेबाची पत्नी दिलरासबानू बेगमची (राबीया-उद-दुर्रानी) कबर असून, ती मुघल बादशाह औरंगजेबाच्या काळात बनवण्यात आली होती. परंतु, हा मकबरा मलिकाचा मुलगा शहजादा आजम शाहकडून सन 1651 ते 1661 या काळात आईच्या स्मरणार्थ बांधला गेला, असे इतिहासात आढळते. या कबरीवर दिवसा सूर्यकिरणे व रात्री चंद्राचा प्रकाश पडतो. येथे औरंगजेब व त्याची बेगम यांच्या वापरात येणाऱ्या वस्तू जसे चटई, भांडे, लाकडी फर्निचर, वस्त्र याचे जतन करण्यात आले आहे. बीबी-का-मकबरा स्थापत्य शास्त्रातील अप्रतिम वास्तू असून, मकबऱ्याची भव्यता आणि सौंदर्य ताजमहालासारखे आहे.

अजिंठा लेणी



औरंगाबाद शहरापासून 99 किमीच्या अंतरावर वसलेल्या अजिंठा लेणी पर्यटन आणि वारसा क्षेत्राचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसा प्रदर्शनांच्या यादीत या लेणींनी स्थान प्राप्त केले आहे आणि जर तुम्ही औरंगाबादमध्ये असाल तर या लेणीला नक्की भेट दिली पाहिजे. सुमारे 700 वर्षे वापरात असलेल्या अजिंठा लेण्या काही कारणांमुळे अशाच सोडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुमारे 1000 वर्षाहून अधिक काळ लेण्या अज्ञात राहिल्या. ब्रिटिश लष्करी अधिकारी जॉन स्मिथ 1839मध्ये शिकारीसाठी निघाला होता. यावेळी त्याला या लेण्या दिसून आल्या. बरीच स्वच्छता केल्यावर त्या लोकांसाठी खुल्या करण्यात आल्या.

दौलताबादचा किल्ला




दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव देवगिरी असे आहे. हा प्रसिद्ध किल्ला यादवांनी बांधला होता. सन 1296मध्ये रामदेवरावांच्या काळात तो अल्लाउद्दीन खिलजीने जिंकला. किल्ल्याभोवती खंदक असून, भुयारी मार्गाने आत जावे लागते. किल्ला चढतांना मध्यभाग संपूर्ण अंधाराने व्यापलेला आहे. पूर्वीच्या काळी शत्रुला मारण्यासाठी येथे एक गरम तवा ठेवलेला असे. किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट, शिल्पसंग्रह, बुरुज, हाथीहौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, हेमाडपंथी मंदिर, कालकोट चीनी महाल, मेढा तोफ, खंदक, भुयारी रस्ता, गणेश मंदिर, बारादरी, जनार्दन स्वामींच्या पादुका, दुर्गातोफ अशा कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या आहेत.

          

सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित ‘हे’ विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणे

 

सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित ‘हे’ विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणे


पोटासंबंधित विकारही कोरोनाचे लक्षणं असू शकतात, अशी माहिती समोर आली आहे (Bad digestive system also symptoms of Corona)



मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात तर कोरोनाबाधितांचा आकडा थेट 97 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनाचे दररोज वेगवेगळे लक्षणे समोर येत आहेत. ताप, कोरडा खोकला, अंगदुखी, घशात खवखव हे कोरोनाचे सर्वसामान्य लक्षणं आहेत. मात्र आता पोटासंबंधित विकारही कोरोनाचे लक्षणं असू शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

भारतात अशा काही केसेस समोर आल्या आहेत, ज्यामध्ये कोरोनाबाधितांना पोटाशी संबंधित आजार असल्याचं समोर आलं. अमेरिकन जनरल ऑफ एमर्जन्सी मेडिसिनने याबाबत दावा केला आहे (Bad digestive system also symptoms of Corona).

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी न्यूयॉर्क शहरातील कोरोना रुग्णालयांमधील 12 हजार रुग्णांचा अभ्यास केला. यामध्ये जवळपास 51 टक्के रुग्ण हे पोटाच्या विकारा संबंधित तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांना गॅस, डायरिया सारख्या आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती अभ्यासात समोर आली.

भारतातही अनेक रुग्ण

भारतातही अशाचप्रकारचे रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हा रुग्णालयात जवळपास 20 टक्के कोरोनाबाधित सुरुवातीला पोटाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, त्यांची चाचणी केल्यावर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. अशा रुग्णांना लिव्हरशी संबंधित त्रासही असल्याचं समोर आलं आहे (Bad digestive system also symptoms of Corona).

कोरोनाचे दिवसेंदिवस वेगवेगळे लक्षणे समोर येत आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांपुढे हे एक मोठं आव्हान आहे. दरम्यान, सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशनने ऑगस्ट महिन्यात कोरोनाच्या नव्या लक्षणांबाबत माहिती जारी केली होती. यामध्ये सर्दी, थंडी वाजणे, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसा दुखणे, गंध आणि चव जाणे यांचा समावेश होता. नॅशनल हेल्थ सर्विसने सप्टेंबर महिन्यात डोळ्यांसंबंधित आजार आणि त्वचेचा रंग बदलणे यांनादेखील कोरोनाचे लक्षणे असल्याचं सांगितलं होतं.

Saturday, December 26, 2020

अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची पुरातन मूर्ती

 

अबब! दौंड येथील भीमा नदीत आढळली शंकराची १ टन वजनाची मूर्ती 

आणखी अवशेष सापडण्याची शक्यता




दौंड : येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे. मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे.

दौंड-नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे. या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही मूर्ती सापडली. कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे. स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे. मात्र, मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही. ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली. मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेषही सापडण्याची शक्यता आहे.

पुरातनकालीन मूर्ती दौंड परिसरातलीचपाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला तरी १ टन दगडाच्या वजनाची मूर्ती दूरवरुन वाहून येऊ शकत नाही. फार तर इकडे तिकडे जवळ अंतरावर या मूर्तीची हालचाल पाण्याच्या प्रवाहामुळे होऊ शकते. गेल्या दोन वर्षात भीमा नदीला जोराचा पाण्याचा प्रवाह असलेला पूर आलेला नाही. त्यामुळे ही पुरातनकालीन मूर्ती या ठिकाणचीच असण्याची शक्यता आहे.

Thursday, December 24, 2020

राजगडावर सापडला चोर दरवाजा

 

 राजगडावर सापडला चोर दरवाजा


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याची पहिली राजधानी राहिलेल्या राजगडावर नुकताच एक चोर दरवाजा सापडला आहे. गडाच्या पाली दरवाजाच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या बुरुजात अनेक वर्षे हा दरवाजा दगड-मातीने पूर्णपणे मुजला होता. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या मावळ्यांनी हा चोर दरवाजा पूर्ववत खुला केला.



स्वराज्याचा प्राथमिक कारभार तब्बल २५ वर्षे शिवछत्रपतींनी राजगडावरून चालवला. राजगडाचा राजमार्ग राहिलेल्या पाली दरवाजाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या भक्कम बुरुजात असणारा छोटेखानी चोर दरवाजा कालौघात पूर्णपणे मुजला होता. बुरुजाच्या ७ ते ८ मोठ्या दगडांनी व मातीने तो झाकून गेला होता. गडाचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्या सह्याद्रीच्या मावळ्यांना तो दिसला. मग काय, दुर्गसेवक मावळ्यांनी दगड-माती बाहेर काढून दरवाजा तत्काळ पूर्ववत खुला केला.

दरबाजाची उंची ३फूट आणि रुंदी २ फूट असून, त्याला केवळ दोन टप्पे आहेत. तेथून खाली उतरण्यासाठी किमान दोन ठिकाणी दोरखंडाचा वापर केला जात होता. मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठान पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या मावळ्यांचा सहभाग होता. हा दरवाजा प्रथमच प्रकाशात आल्याची माहिती दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर, मिलिंद पराडकर, राहुल नलावडे यांनी दिली.

Wednesday, December 23, 2020

जाणून घ्या, Google ला कशी सापडतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

 

जाणून घ्या, Google ला कशी सापडतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं


गुगल नेमकी आपल्या प्रश्नांची उत्तरं कसं शोधतं आणि त्याची सर्व उत्तरं योग्यच असतात का, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला तर मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी गुगलकडे न जाता खालील माहिती वाचूया.



एखादा असा प्रश्न, ज्याचं उत्तर देण्यासाठी आपणही असमर्थ असतो त्यावेळी आधार घेतला जातो तो म्हणजे एका खात्रीशीर मदतीचा, तंत्रज्ञानाचा. Google या नावानं हे तंत्रज्ञान, अर्थात हे सर्च इंजिन असंख्य प्रश्नांची उत्तरं देत, कित्येक गोष्टींबाबतची माहिती देत तुमच्या आमच्या शंकांचं निरसन करत असतं. त्यामुळं प्रश्न कोणताही असो, उत्तर देण्यासाठी गुगल आहे ना असं म्हणत आपण मात्र निर्धास्त असतो.
           गुगल नेमकी आपल्या प्रश्नांची उत्तरं कसं शोधतं आणि त्याची सर्व उत्तरं योग्यच असतात का, हा प्रश्न तुम्हाला पडलाय का? चला तर मग या प्रश्नाच्या उत्तरासाठी गुगलकडे न जाता खालील माहिती वाचूया.

Google असं देतं तुमच्या प्रश्नांची उत्तरं...

Crawling

कोणत्याही विषयाबाबत जेव्हा आपण गुगलवर जाऊन माहिती शोधतो, तेव्हा Google सर्वप्रथन वेब पेजवर त्या विषयाशी निगडीत माहिती उपलब्ध आहे का हे तपासतं. या प्रक्रियेला Crawling असं म्हणतात. क्रॉलिंगसाठी Google bot चा वापर केला जातो. ज्यामध्ये Google पेजेसना क्रॉ़ल करत नव्या पेज इंडेक्समध्ये जोडतं. Google bot हे एक वेब क्रॉलर्स सॉफ्टवेअर आहे. क्रॉलर्स एकमेकांकडून माहिती मिळवून ती Googleच्या सर्व्हरपर्यंत आणतात.

Indexing

Crawlers च्या माध्यमातून वेबपेज मिळण्यानंतर Google ची सिस्टीम वेगवेगळ्या पेजवरील माहिती तपासतं. यामध्ये फोटो, व्हिडीओ आणि वेब कंटेंटचा समावेश असतो. क्रॉल केलेले पेज Google पडताळून पाहतं. यामध्ये किवर्ड्स आणि वेबसाइट कंटेंटवर भर दिला जातो. याशिवाय वेबसाइट कंटेंटमध्ये कितपत नावीण्य आहे, माहिती क़ॉपी -पेस्ट तर नाही ना याचीही माहिती घेतली जाते. एकसारखाच कंटेंट असल्याच ती रद्द करण्यात येते. ही सर्व माहिती Google Index मध्ये साठवली जाते.

Serving result

आपण गुगलवर कोणतीही माहिती शोधल्यास गुगल आपल्याला त्याच्याशी निगडीत प्रश्न आणि उत्तरही सुचवतं. यामध्ये सर्वात वर सर्च पेज रँक असतं. या पूर्ण प्रक्रियेशिवायही गुगल आपल्या इंटरनल प्रोसेसरचीही मदत घेतो. ज्यानंतर Google तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदातच देतं.

Friday, December 18, 2020

दृष्ट न लागो! मराठी कलाकारांच्या देखण्या जोड्या

 

दृष्ट न लागो! मराठी कलाकारांच्या देखण्या जोड्या


        प्रसाद ओक आणि मंजिरी ओक



   रश्मी अनपट आणि अमित खेडेकर


     प्रिया बापट आणि उमेश कामत


'शुभमंगल ऑनलाइन' फेम अभिनेत्री                   अर्चना निपाणकर


प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर


   सखी गोखले आणि सुव्रत जोशी


       सई लोकूर आणि तीर्थदीप रॉय


        उर्मिला आणि आदिनाथ कोठारे


     अभिजीत खांडकेकर आणि सुखदा


सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर


सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर


    श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर

Thursday, December 17, 2020

सोनाली कुलकर्णी ते सई ताम्हणकर.. पाहा मराठी कलाकारांचे भावंडांसोबतचे फोटो

 

सोनाली कुलकर्णी ते सई ताम्हणकर.. पाहा मराठी कलाकारांचे भावंडांसोबतचे फोटो


अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर बहीण किंवा भाऊसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी निवडक कलाकारांचे त्यांच्या भावंडांसोबतचे फोटो पाहुयात..



अभिजीत खांडकेकर व त्याची बहीण


अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि तिचा भाऊ अभिजीत



भाऊ सचिन गुरवसोबत सई ताम्हणकर अनेकदा फोटो पोस्ट करते. सचिनने अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या पोस्टर्ससाठी काम केलंय.



शशांक केतकर आणि त्याची छोटी बहीण


सोनाली कुलकर्णी आणि तिचा छोटा भाऊ अतुल कुलकर्णी



संजय जाधव आणि सुकन्या कुलकर्णी हे जरी खरे भाऊ-बहीण नसले तरी या दोघांचं नातं खूप खास आहे. सुकन्या प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीज संजय जाधव यांच्यासोबत साजरा करतात.

मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!

 

मिठाई खायची इच्छाय, पण शुगरचा प्रॉब्लेम? नो टेन्शन ही फळं ट्राय करा!



मुंबई : बर्‍याच लोकांना गोड पदार्थ खाणे आवडते. गोड गोष्टी पाहिल्याबरोबर लोकांचा जीभेवरील ताबा सुटतो, ते स्वत:ला थांबवू शकत नाहीत आणि गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारतात. परंतु, साखर आपल्या जीवनात ज्या प्रकारे स्वतःचे स्थान निर्माण करत आहे, त्याचप्रमाणे ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारकदेखील ठरत आहे. साखरेचे अधिक सेवन केल्याने तुम्हाला बर्‍याच गंभीर समस्या उद्भवू शकतात (These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health).

वजन वाढवण्याबरोबरच, साखर आपल्या शरीरातील अनेक प्रकारच्या क्रियांवर देखील परिणाम करते. जर, आपण स्वत:ला मिठाई खाण्यापासून रोखू शकत नसाल तर, आम्ही तुम्हाला अशा काही खाद्यपदार्थाबद्दल सांगणार आहोत जे खाल्ल्यानंतर तुमच्या आरोग्याची काळजीही घेतली जाईल आणि तुमची गोड खाण्याची इच्छा देखील कमी होईल. हे पदार्थ आपल्या आरोग्यास कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवणार नाहीत.

  1. फळं

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी तुमच्या आरोग्यासाठी कधीही हानिकारक ठरत नाही. याउलट ती आवश्यक पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला गोड खावे वाटेल, तेव्हा आपण मिठाईला पर्याय म्हणून हंगामी फळे खाऊ शकता. परंतु, अशावेळी फळांचा रस पिणे टाळावे. कारण, रस करताना त्यातील फायबर निघून गेल्याने पोषक घटक देखील कमी होतात (These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health).

  1. बेरी


गोड पदार्थांना अथवा मिठाईला, बेरीज हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. रंगीबेरंगी बेरी आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. या बेरीजमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. बेरीमध्ये कॅलरी कमी, तर फायबर जास्त आहे. त्यामुळे पचन क्रिया देखील सुधारते.

  1. मिंट                                                                             

                                                                                  एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, च्युइंगगम किंवा मिंटच्या गोळ्या (पुदीना) साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. जर तुम्हाला गोड खावे वाटत असेल तर मिंट आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे. परंतु, मिंट घेताना त्यामध्ये जराही साखर नसावी, हे आपण तपासले पाहिजे. तसेच, त्यात कृत्रिम रंग वापरलेला असू नये आणि त्यामध्ये किती कॅलरी आहेत, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे (These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health).

  1. फळांसह दही

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतात. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर तुम्ही फळांसह एक कप ताजे दही खाऊ शकता. फळांसोबत दही खाणे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

  1. शेक आणि स्मूदी

गोड खाण्याच्या तलफेला, शेक आणि स्मूदी एक चांगला पर्याय आहे. आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही फळापासून शेक आणि स्मूदी तयार करू शकता. परंतु, शेक किंवा स्मूदी बनवताना त्यात साखर अजिबात मिसळू नका. यात टॉपिंग म्हणून सुकामेवा घालू शकता.

(These 5 fruits rather than sweets this will improve your immunity and health)





धक्कादायक! जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन विकत होता Maruti Suzuki चा डिलर, लायसन्स झालं रद्द

 

धक्कादायक! जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन विकत होता Maruti Suzuki चा डिलर, लायसन्स झालं रद्द



मारुती सुझुकी या कार कंपनीची देशाच्या वाहन क्षेत्रातील प्रमुख आणि विश्वासार्ह कंपन्यांमध्ये गणना होते.



पण, आता मारुतीच्या जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन नवीन कार म्हणून ग्राहकांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


विशेष म्हणजे मारुती सुझुकीच्या एका अधिकृत डिलरकडूनच अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक सुरू होती.
           हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता त्या डिलरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे.



आसाममध्ये मारुती सुझुकीच्या एका डिलरचं लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. आसामच्या परिवहन विभागाने या डिलरचं ट्रेड लायसन्स रद्द केलं.

        हा डिलर कंपनीच्या जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन शोरुममधूनच विकून ग्राहकांची फसवणूक करत होता.

एका व्यक्तीने या डिलरविरोधात फसवणुकीबाबतची तक्रार परिवहन आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.



"ग्राहकाकडून तक्रार आल्यानंतर गुवाहाटी येथील पोद्दार कार वर्ल्डच्या शोरूममध्ये छापा मारण्यात आला. छाप्यामध्ये जुन्या गाड्या विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे पुरावे सापडले", अशी माहिती जिल्हा परिवहन अधिकारी गौतम दास यांनी दिली.
               छापा पडल्यावर शोरुमच्या अधिकाऱ्यांनी अनावधानाने जुन्या गाडीची विक्री झाल्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं कारण न पटल्याने आसामच्या परिवहन विभागाने संबंधित डिलरचं ट्रेड लायसन्स रद्द केलं.



लोकं विश्वास ठेवून शोरुममधून कार खरेदी करतात, पण मारुती सारख्या प्रतिष्ठित कंपनीच्या अधिकृत शोरुममधून जुन्या गाड्यांना रंगरंगोटी करुन नवीन गाडी म्हणून विकल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Wednesday, December 16, 2020

Flashback - जानिए अब किस हाल में हैं 80 के दशक की मशहूर चाइल्ड आर्टिस्ट बेबी गुड्डू

 

Flashback - जानिए अब किस हाल में हैं 80 के दशक की मशहूर चाइल्ड आर्टिस्ट बेबी गुड्डू



80 के दशक में ज्यादातर फिल्मों में बाल कलाकार का रोल करने वाली बेबी गुड्डू आपको याद है। बेबी गुड्डू उस दौर की सबसे मशहूर चाइल्ड एक्टर थी। बेबी गुड्डू का असली नाम शाहिंदा बेग था। वो फिल्म मेकर एम एम बेग की बेटी हैं। बेबी गुड्डू ने औलाद, समुदर,परिवार, घर-घर की कहानी, मुल्जिम, नगीना और गुरू समेत करीब 32 फिल्मों में काम किया था। 



करीब 3 साल की उम्र में बेबी गुड्डू ने हिंदी फिल्मों में काम करना शुरू किया। एक्ट्रेस किरण जुनेजा बेबी गुड्डू को बॉलीवुड में लेकर आई। उन्हें बाल कलाकार के तौर पर फिल्में दिलवाई। देखते ही देखते बेबी गुड्डू बहुत मशहूर हो गई । 80 के दशक में हर दूसरी फिल्म में वो नजर आने लगी थी। बेबी गुड्डू ने श्रीदेवी, जया प्रदा, अमिताभ बच्चन, जितेन्द्र और मिठुन समेत उस दौर के सभी बड़े एक्टर्स के साथ काम किया। 


1984 में बेबी गुड्डू की पहली फिल्म आई थी पाप और पुण्य। बेबी गुड्डू को पहली ही फिल्म में खूब पसंद किया गया। उस दौर में टूथपेस्ट और सॉफ्ट ड्रिंक के एड में काम किया। फिल्मों और विज्ञापनों की वजह से वो घर-घर में मशहूर हुईं। बेबी गुड्डू को उन दिनों बॉलीवुड के सितारे खूब लाड़ प्यार देते थे। राजेश खन्ना को बेबी गुड्डू इतनी पसंद थी कि उन्होंने बेबी गुड्डू के लिए एक टेलीफिल्म बनाई। बेबी गुड्डू के लीड रोल वाले उस फिल्म का नाम था आधा सच आधा झूठ।



एक बाल कलाकार के रूप में उनकी आखिरी फिल्म 1991 में आई घर परिवार थी। 11 साल की उम्र के बाद बेबी गुड्डू ने फिल्मों में काम करना छोड़ दिया। बेबी गुड्डू इसके बाद अपने पढ़ाई लिखाई पर ध्यान देने लगी 



बेबी गुड्डू अब दुबई में रहती हैं। वहां वो अमीरात एयरलाइंस के साथ काम करती हैं। बेबी गुड्डू की अब शादी हो चुकी है। लेकिन बॉ़लीवुड में उनका जो बचपन बीता उसे वो कभी नहीं भूल पाएंगी।



Tuesday, December 15, 2020

धर्मेन्द्र की दोनों बेटियां अजीता और विजेता कहां रहती हैं ? बेटियों ने क्यों नहीं किया बॉलीवुड में काम ?

 

धर्मेन्द्र की दोनों बेटियां अजीता और विजेता कहां रहती हैं ? बेटियों ने क्यों नहीं किया बॉलीवुड में काम ?



सारिका स्वरुप- बॉलीवुड के मशहूर एक्टर धर्मेन्द्र ( Dharmendra) की 86 साल के हो चुके हैं, फिल्मों में वो कम नजर आते हैं लेकिन फैंस का उन्हें जबरदस्त प्यार मिलता हैं। धरम पाजी सोशल मीडिया पर भी खूब एक्टिव रहते हैं । बॉलीवुड के गरम धरम की निजी जिंदगी के किस्से भी उनकी फिल्मों की तरह मशहूर हैं। धर्मेन्द्र ने दो शादियां की। उनकी पहली शादी तो तभी हो गई थी जब वो 19 साल के थे। 

धर्मेंद्र की पहली पत्नी से उन्हें 4 बच्चे हैं। 




पहली पत्नी से दो

 बेटे सनी देओल और बॉबी देओल  और दो बेटियां अजिता और विजेता हैं। 


वहीं 2 मई 1980 को उन्होंने हेमा मालिनी से दूसरी शादी की थी। धर्मेंद्र की दूसरी पत्नी हेमा मालिनी से भी उन्हें दो बेटियां ईशा और आहना देओल हैं।



धर्मेन्द्र की दो  बेटियों ईशा और आहना देओल को तो हर कोई जानता है । दोनों हमेशा लाइमलाइट में रहती है और अक्सर अपने पिक्चर्स सोशल मिडिया पर शेयर कर फैन्स से जुड़ी रह्ती है। ईशा देओल ने तो कुछ फिल्मे भी की है  तो वही दूसरी तरफ उनकी बेटियां अजिता और विजेता के बारे में कोई नहीं जानता ? वो कैसी दिखती है क्या करती हैं,कहां रह्ती हैं ये भी किसी को नहीं पता। आपको बता दें उनकी दोनों बेटियां अजीता और विजेता सनी देओल से छोटी और बॉबी देओल से बड़ी हैं। 



धर्मेन्द्र के दोनों बेटे तो बॉलीवुड में आए लेकिन बेटियां 

अजीता और विजेता लाइमलाइट से काफी दूर रहती हैं। सनी की बड़ी बहन अजिता की शादी किरण चौधरी से हुई  है जो की '1000 Decorative Design From India' नाम की बुक के लेखक रह चुके हैं । उनकी बड़ी बेटी अजीता का निक नेम लल्ली है। 



धरम पाजी की दोनों बेटियां अमेरिका के कैलिफोर्निया में  रहती हैं । धर्मेन्द्र ने बेटी विजेता के नाम पर ही अपना  प्रोडक्शन हाउस खोल रखा है। विजेता फिल्म के बैनर तले उन्होंने कई फिल्में बनाई। 




बता दे कि, अजीता और विजेता को कभी भी उनके परिवार के साथ नहीं देखा गया। इन चारों भाई-बहन और उनके माता-पिता की कुछ तस्वीरें ही सोशल मीडिया पर हैं। जो की काफी पहले कि है, जिनमें ये पूरी फैमिली एक साथ नज़र आ रहे हैं। यहां तक कि हेमा मालिनी की बेटियों ईशा और अहाना देओल की शादी में भी दोनों बहनों को नहीं देखा गया था।




इस साल जनवरी में बॉबी देओल अमेरिका गए थे  और वहां बड़ी बहन अजीता से मिलें थे। उन्होंने अपनी बहन के परिवार की कई तस्वीरें सोशल मीडिया पर शेयर की थीं। वहीं विजेता की हालिया तस्वीर सोशल मीडिया पर नहीं है और ना ही उनकी शादी किससे हुई है इस बारे में कोई खबर है।