घटस्फोट घेणं हा कुणासाठीच आनंदाचा निर्णय नसतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुखावलं जातं, उद्ध्वस्त होऊ शकतं. पण म्हणून आयुष्यभर स्वत:ची फरफट करून दु:खी आयुष्य ओढत नेणं हे आता अनेकजण टाळू लागले आहेत. मराठी कलाविश्वातील कोणत्या कलाकारांनी घटस्फोट घेतला ते पाहुयात..
सई ताम्हणकर- अमेय गोसावी सई ताम्हणकरने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. २०१५ मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला.
पियुष रानडे - शाल्मली तोळ्ये 'अस्मिता' फेम अभिनेता पियुष रानडे व शाल्मली तोळ्ये हे लग्नापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. २०१० मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली पण लग्नाच्या चार वर्षांनंतर २०१४ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पियुषने नंतर २०१७ मध्ये अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न केलं.
रेशम टिपणीस - संजीव सेठ रेशम टिपणीसने वयाच्या विसाव्या वर्षी संजीव सेठशी लग्न केलं होतं. त्यावेळी संजीव ३२ वर्षांचा होता. ११ वर्षांच्या संसारानंतर २००४ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
नंतर संजीवने २०१० मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील सहअभिनेत्री लता सभरवालशी लग्नगाठ बांधली. रेशम आणि संजीवला दोन मुलं आहे.
स्वप्निल जोशी - अपर्णा जोशी मराठी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट बॉय अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीने २००५ मध्ये अपर्णाशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर २००९ मध्ये ते विभक्त झाले. नंतर स्वप्नीलने २०११ मध्ये लीना आराध्येशी लग्न केलं.
तेजश्री प्रधान - शशांक केतकर 'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या सेटवर तेजश्री प्रधान व शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१४ मध्ये दोघांनी लग्न केलं पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
नंतर शशांकने प्रियांका ढवळेशी लग्न केलं.
गिरीश ओक 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते गिरीश ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना गिरीजा ओक ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर गिरीश यांनी पल्लवी ओकशी दुसरं लग्न केलं.






















































