Vijay Sales [CPS] IN

Thursday, October 15, 2020

आता आवाज घुमणार कारभा-यांचा, नवी मालिका ‘लयभारी कारभारी’!

 लॉकडाऊननंतर नव्या मालिका सुरु होण्याचा जणू काही ट्रेंडच सुरु झाला आहे. अनेक वाहिन्यांनी नवीन मालिकेची घोषणा केली आहे. यामध्ये झी मराठी कशी बरं मागे राहील? झी मराठीनेही एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. ‘कारभारी लयभारी’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. यामध्ये एक युवा नेता जोशपुर्ण भाषण करताना दिसतो आहे. याशिवाय स्वत: कारभारी होण्याबाबतही सांगताना दिसतो आहे.


पाठमो-या दिसणा-या या युवा नेत्याच्या भूमिकेत कोण असेल याबाबत प्रेक्षकांनी तर्क लावायला सुरुवात केली आहे. अनेकांना या नेत्याच्या भूमिकेत निखिल चव्हाण असेल असं वाटत आहे तर अनेकांनी आदिनाथ कोठारेचं नाव घेतलं आहे. आता या मालिकेत नक्की कोण आहे हे लवकरच कळेल अशी आशा करायला हरकत नाही.


भर पावसात एक नेता सभेला संबोधित करत आहे. 'अरे ही माणसं आमची आहेत. हा महाराष्ट्र आमचा आहे. मग सत्ता पण आमची. आम्ही का जायचं त्यांच्या दारात; ते येतील आमच्या दारी. आम्ही इथले कारभारी.... ' असे या भाषणातील बोल आहे. 


या प्रोमोची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 'कारभारी लयभारी' ही मालिका राजकीय वर्तुळावर भाष्य करेल का? असा प्रश्न देखील काही प्रेक्षकांना पडला आहे. एवढंच नव्हे तर या मालिकेतील ही भूमिका कोणता कलाकार साकारत आहे? यावर देखील प्रेक्षकांनी आपली मत मांडली आहे. 

यात सध्या झी मराठीवरील (Zee Marathi) चर्चेत आलेल्या आगामी मालिका 'कारभारी लयभारी' (Karbhari Lay Bhari) चा प्रोमो मुळे या मालिकेत कोण कलाकार असणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र काल त्या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून या मालिकेत हिरोचा चेहरा दिसला. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून निखिल चव्हाण (Nikhil Chavan).



निखिलच्या नव्या लुकमुळे हा कलाकार नेमका कोण आहे याचा अनेकांना अंदाज आला नसेल. याआधी झी मराठीवर लोकप्रिय झालेली मालिका 'लागिर झालं जी' मधील हा अभिनेता आहे. या मालिकेत जरी मुख्य भूमिकेत नसला तरीही त्याने बरीच लोकप्रियता मिळवली होती. लागिर झालं जी या मालिकेत विक्याची भूमिका साकारली होती. जो भारतीय सैन्य दलात असतो. ऐकून धक्का बसला ना, पण हे खरे आहे निखिलच्या या नव्या लूकमुळे प्रोमो मधून अनेकांना अंदाज आला नसेल.



कारभारी लय भारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणाची झिंग आणि प्रेमाचा रंग आता दोन्ही बी लढणार असे म्हणत झी मराठीने हा प्रोमो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. निखिलच्या या लूक लोक प्रचंड पसंत करत आहे. मात्र ही मालिका कोणत्या मालिकेची जागा घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'माझ्या नव-याची बायको' या मालिकेतील वळण पाहता या मालिकेची जागा निखिलची ही नवी मालिका घेऊ शकते.

अलीकडे आलेल्या अॅट्रॉसिटी या चित्रपटात देखील काम केले होते. त्याचबरोबर स्त्रीलिंग-पुल्लिंग या वेब सीरीज मध्ये आणि वीरगती या वेब शोमध्ये देखील त्याने काम केले होते. त्यामुळे कारभारी लय भारी या मालिकेत देखील तो राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसत आहे. लेटेस्टली मराठी कडून निखिलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

No comments:

Post a Comment