Vijay Sales [CPS] IN

Monday, November 30, 2020

'मोदी' या नावाच्या करिश्म्यामुळे लागली एवढी मोठी बोली

 

‘मोदी’ नावाच्या बकऱ्यासाठी लागली लाखोंची बोली; पण मालकाला हवेत दीड कोटी




एखाद्या बकऱ्याला बाजारात लाखोंची बोली लागल्याचं तुम्ही कधी ऐकलतं का? ऐकलं नसेल तर हे खरं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या बकऱ्याच्या मालकाने कोट्यवधी रुपयांची बोली लावली होती. या बकऱ्याच्या ‘मोदी’ या नावाच्या करिश्म्यामुळे एवढी मोठी बोली लागली आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीच्या प्राण्यांच्या बाजारातील ही घटना आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प झालं असल्याने आटपाडीतील प्राण्यांच्या बाजारालाही मोठा फटका बसला. प्राणी विक्रेत्यांना यामुळे मोठ्या नुकसानीला समोरं जावं लागलं. मात्र, आता इथली परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा प्राण्यांची मागणी वाढली आहे.

दरम्यान, प्रसिद्ध असलेल्या आटपाडीच्या या प्राण्यांच्या बाजारात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणावर शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आल्या होत्या. यांपैकी एका बकऱ्याला तब्बल ७० लाखांची बोली लागली. सांगोला तालुक्यातील चांदोळवाडीचे शेतकरी बाबुराव मेतकरी यांचा हा बकरा असून त्यांना तो दीड कोटी रुपयांना विकायचा होता.

तुम्ही म्हणालं या बकऱ्यामध्ये असं काय विशेष आहे. तर या बकऱ्याचं नाव ‘मोदी’ असं ठेवण्यात आलं असून त्याच्या मालकाने तब्बल दीड कोटी रुपयांची बोली लावली होती. खरेदीदारानं त्यांना जास्तीत जास्त ७० लाख रुपयांतच व्यवहार होईल असं सांगितलं. मात्र, मेतकरी यांना ते मान्य झालं नाही त्यामुळे हा बकरा अद्यापही विकला गेला नाही.

Sunday, November 29, 2020

वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घ्या संपूर्ण माहिती !

 

वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात, समजून घ्या संपूर्ण माहिती !



एखाद्या मुलीचे लहान वयातच लग्न झाले आणि लग्नानंतर तिच्या नवऱ्याने आणि तिच्या सासरकडच्या मंडळीनी तिचा छळ केला आणि त्यात ती मुलगी कोठेही कमवत नसेल तर तिचे पूर्ण आयुष्य बेकार ठरते. मग अश्यावेळी मुलीची समजूत काढून वेळ मारून नेण्यापलिकडे काही उरत नाही. तसेच त्यात आणखी भर म्हणून त्या मुलीचे आई वडील देखील त्या मुलीस मदत करण्यास तयार नसतील आणि भाऊ पण वडिलांच्या संपत्तीचा एक तुकडादेखील द्यायचा तयार नसेल तर अशा बिकट परिस्थितीत त्या मुलीने काय करावे? स्वतःचा खर्च कसा भागवावा ? हा प्रश्न पड़ने स्वाभाविक आहे. चला तर मग पाहुयात याबद्दल थोडस.

         बर्यााच वेळा लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, लग्न झालेल्या मुलीचा तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर हक्क असतो का? याबद्दल थोड्याच लोकांना माहिती आहे. बर्या च लोकांना याबद्दलची कायदेशीर तरतूद माहित नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत विवाहित मुलीचा कायदेशीर हक्क आहे हे आम्ही आज सांगणार आहोत.



मुलींना पितृ संपत्तीत समान वाटा देण्यासाठी २००५ मध्ये हिंदु उत्तराधिकार कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता. वडिलांच्या संपत्तीच्या बाबतीत आता मुलीच्या जन्माबरोबरच वाटा असतो, तर मुलीने स्वतः कमवलेली मालमत्ता तिच्या इच्छेच्या तरतुदीनुसार वाटप केली जाते. वडील मरण पावले आणि त्याच्या इच्छा नसताना देखील त्यांच्या मालमत्तेवर मुलगा व मुलगी यांचा समान हक्क राहतो.

२००५ मध्ये यासंबधिचा कायदयात बदल करण्यात आला. हिंदू वारसा कायदा १९५६ च्या तरतुदीनुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क दिले गेले नव्हते. परंतु ही असमानता दाखवणारा कायदा ९ सप्टेंबर २००५ रोजी हिंदु उत्तराधिकार कायद्यात सुधारित करून नव्याने तयार करण्यात आला. ज्या अंतर्गत हिंदूंमध्ये मुलामुलींच्या मध्ये मालमत्ता समान विभागली जाऊ शकते.

१) वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर :- हिंदू कायद्यातील मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली आहे – वडिलोपार्जित आणि स्वयंरोजगारीत . वडिलोपार्जित मालमत्तांमध्ये पूर्वजांपासून ताब्यात असलेल्या मालमत्तेचा समावेश असतो, ज्यात जन्माधीच्या ४ पिढी आधीपासून असलेली मालमत्ता यात समविष्ट असते. अशा मालमत्तेवर मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो, मग ते मुलगा किंवा मुलगी. मात्र २००५ पूर्वी, अशा मालमत्तेवर फक्त मुलाचा हक्क असायचा. तथापि, २००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील त्यांच्या मनमानी अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. म्हणजेच वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार देऊ शकत नाही. आता कायदानुसार मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो.


२) वडिलांनी स्वत: कमवलेली मालमत्ता :- वडिलांच्या स्वत: च्या मालकीच्या मालमत्तेच्या बाबतीत, मुलींची बाजू कमकुवत असते कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, घर स्वतः बांधले असेल किंवा स्वत: च्या पैशाने विकत घेतले असेल तर ते ही मालमत्ता ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात. स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजेच, जर वडिलांनी मुलीला स्वत: च्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीच करू शकत नाही.

३) मृत्यपत्र (वसियात) लिहायच्या आधीच वडिलांचा मृत्यू झाल्यास :- मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास, सर्व कायदेशीर वारसांना त्यांच्या मालमत्तेवर समान हक्क असतो. हिंदू उत्तराधिकार कायदा पुरुष वारसांना चार वर्गांमध्ये वर्गीकृत करतो आणि वडिलांच्या मालमत्तेवरचा पहिला हक्क पहिल्या वर्गाच्या वारसांचा आहे. यामध्ये विधवा पत्नी , मुली आणि मुले तसेच इतरांचा समावेश असतो. प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समान हक्क असतो. याचा अर्थ असा की एक मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो.


४) मुलगी विवाहित असल्यास :- २००५ च्या पूर्वी हिंदू उत्तराधिकार कायद्यात मुलींकडे हिंदू अविभाजित कुटुंबाचे सदस्य म्हणून पाहिले जात होते. म्हणजेच लग्नानंतर कागदोपत्री ती तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग नाही असे मानले जायचे. २००५ च्या तरतुदीनंतर हा कायदा बदलण्यात आला.

५) जर मुलीचा जन्म २००५ पूर्वी झाला असेल आणि त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर :- ९ सप्टेंबर २००५ पासून हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा लागू झाली. कायद्यानुसार असे म्हटले आहे की या तारखेच्या आधी किंवा नंतर मुलगी जन्माला आली असली तरी तिच्या भावाला व तिला वडिलांच्या संपत्तीत तिला समान वाटा असेल. दुसरीकडे, ९ सप्टेंबर २००५ रोजी वडील जिवंत असतानाच मुलगी आपल्या वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळवू शकते. या तारखेपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असता, मुलीला पितृत्वाच्या मालमत्तेवर कोणताही हक्क नाही आणि वडिलांनी स्वत: कमवलेली मालमत्तेची त्याच्या इच्छेनुसार विभागणी केली जाते.

..आणि बघता बघता मंचावर रक्त सांडू लागलं!

 

..आणि बघता बघता मंचावर रक्त सांडू लागलं!


तलवारबाजीवेळी पॅडीच्या बोटाला पातं लागून बोट कापलं. पण सादरीकरण करण्याच्या नादात पॅडीला काहीच कळलं नाही. हळूहळू त्यातून रक्ताचे थेंब मंचावर पडू लागले.



माणसाची दोन आयुष्य असतात असं म्हणतात. एक त्याचं व्यक्तिगत आयुष्य.. म्हणजे यात तो कुटुंबात, मुला-बाळात रमतो असं म्हणतात. त्याला खासगी आयुष्य असंही म्हणतात. तर दुसरं आयुष्य असतं ते प्रोफेशनल. म्हणजे त्याच्या उदरनिर्वाहाचं. स्त्री असो वा पुरुष या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना ही मंडळी वेगवेगळी असतात. ज्याला हे वर्गीकरण जमत नाही त्याचा बावचा होतो. पण सर्वसाधारणपणे असे दोन भाग असतात. कलावंतही त्याला अपवाद नाहीत. मंचावर चढण्यापूर्वी अत्यंत सामान्य वाटणारा कलावंत प्रकाशमान झालेल्या मंचावर चढला की तो 'तो' उरत नाही म्हणतात. कारण रंगदेवता त्याला आपल्या कवेत घेत असते. असाच काहीसा किस्सा घडला हास्य जत्रेच्या सेटवर. बघता बघता मंचावर लाल भडक रक्त सांडू लागलं.. पण त्याची तमा न बाळगता तो कलाकार सादरीकरण करत राहीला.. ते प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येईपर्यंत.
हा किस्सा आहे हास्यजत्रेच्या सेटवरचा. हास्यजत्रेतले कलाकार नेहमीच सर्वांना हासवत असतात. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो समीर चौघुले, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळी आदींचा. सगळीच मंडळी फार उत्तम सादरीकरण करतात. पण कधी कधी हसवता हसवता टचकन डोळ्यात पाणीही आणतात. असंच काहीसं घडलं ते एका स्किटच्या सादरीकरणावेळी. हे सादरीकरण होतं पंढरीनाथ कांबळेचं. पॅडीच्या या स्किटचा विषय होता 'युद्ध पाहिलेला माणूस' विषय तसा संवेदनशील होता. आणि कलाकार जेवढा व्यक्त होईल तितका तो विषय प्रेक्षकांपर्यंत पोचणार होता. पॅडी कांबळे आणि त्याचा साथीदार सादरीकरण करू लागले. आधी तलवारबाजी सुरू होती. याच तलवारबाजीवेळी पॅडीच्या बोटाला पातं लागून बोट कापलं. पण सादरीकरण करण्याच्या नादात पॅडीला काहीच कळलं नाही. हळूहळू त्यातून रक्ताचे थेंब मंचावर पडू लागले. हे थेंब पॅडीच्या लक्षात आले. त्याला वाटलं साथीदाराचं बोट कापलं की काय.. पण त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की हे बोट तर त्याचंच कापलं होतं. पण पॅडीने सादरीकरण थांबवलं नाही. परफॉर्मन्स चोख झाला. आणि उपस्थितांच्या डोळ्यात पाणीही आलं.
      हा किस्सा अभिनेत्री आणि या शोमधली कलाकार विशाखा सुभेदारने फेसबुकवर शेअर केला आहे. तिने केलेली पोस्ट अशी,
Paddy Kamble♥️♥️ मुद्दामून share करतेय हे.. जे आम्ही अनुभवले ते काल रसिकांनी अनुभवले..! तेव्हा ही रडले आणि काल ही रडले.. यां अप्रतिम अनुभवाबद्दल खूप खूप धन्यवाद.
काल हास्यजत्रेतील.. युद्ध पाहिलेला माणूस Prasad Khandekar♥लिहिलेले हे स्किट अनेक सर्वोत्तम प्रहसना च्या यादीत नोंदवले जाईल. ह्या बद्द्ल शंका नाही. मंडळीनो हे स्किट जेव्हा परफॉर्म होत होतं तेव्हा एक तलवार बाजीच्या moment ला पॅडीच्या हाताला लागल.. बोट कापलं गेले, पण ते त्याच्या लक्षात ही नाही आलं.. आणि आम्ही इतके मुग्ध झालो होतो की आमच्यापुढ्यातलं रक्ताचे थेंब.. (भरपूर )आम्हाला दिसलेच नाहीत..आणि त्याला लक्षात आल जेव्हा त्याने एका क्षणी खाली बघितलं..रक्ताचे थेंब दिसतायत, आपल्या सहकालाराला लागलं का?असा विचार मनात आला.. तोवर त्याच्या ध्यानी आल की हे रक्त माझ्याच हातातुन येतंय.. पण तरीही परफॉर्मन्स थांबवला नाही.
आमच्याही जवळ संपता संपता आमच्या लक्षात आलं.कारण डोळ्यात फक्त आसवं होती.. त्या दिवशी भारावल्या सारखा झालं होता हास्यजत्रा चा मंच..! पॅडी समीर प्रसाद... कमाल आहात तुम्ही, i love u ऑल. हास्यजत्रा टीम ????????????????????

Friday, November 27, 2020

Photos: पुण्यात मेट्रोच्या खोदकामदरम्यान सापडले अवाढव्य हाडांचे अवशेष ; गूढ कायम

 

Photos: पुण्यात मेट्रोच्या खोदकामदरम्यान सापडले अवाढव्य हाडांचे अवशेष ; गूढ कायम


पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोच्या मार्गाचे खोदकाम सुरु आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले आहे.



हे अवशेष काही शतकांपूर्वीचे असावेत असा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. तर काहींच्या मते हे दोन हजार वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता आहे.



चाचण्या आणि संशोधनानंतर या अवशेषांचा काळ शोधता आल्यास यापूर्वी पुण्याचा कधीच समोर न आलेल्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.



बुधवारी या ठिकाणी कामगारांनी खोदकाम सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मीटर अंतरापासून प्राण्यांची हाडं सापडू लागली. त्यानंतर कामगारांनी काळजीपूर्वक खोदकाम करत अनेक अवशेष बाहेर काढले.


मंडई येथे सापडलेल्या हडांचा आकार सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हडांपेक्षा मोठा आहे. प्रथम दर्शनी ही हाडं हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


माणसाच्या हाताएवढ्या आकाराची काही हाडं आहेत.



ज्या ठिकाणी ही हाडं सापडली त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी आज (गुरुवारी) भेट दिली.


या हडांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यांचे रहस्य उलगडण्यास मदत होईल असं सांगितलं जातं आहे.
          काही इतिहास तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दोनशे वर्षांपूर्वी सध्याचा मंडई परिसर हा मैदानी भाग होता. येथे सर्कशीचे तंबू लावले जायचे. त्यामुळे या हाडांचे नक्की वय काय आहे, ती कधीपासून येथे आहेत याचा शोध लागल्यानंतरच हाडांबद्दल ठोसपणे सांगता येईल.



सध्या तरी ही हाडं पुरातत्वविभागाकडे सोपवण्यात आली आहेत.
मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलेल्या या हाडांच्या आकारामुळे या हडांबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Thursday, November 26, 2020

'कुछ कुछ होता है' फेम सरदार अडकणार विवाह बंधनात

'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ....'

'कुछ कुछ होता है' फेम सरदार अडकणार विवाह बंधनात

'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ....' 


भिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल स्टारर 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर एकेकाळी अधिराज्य गाजवलं आहे. तर त्यामध्ये छोट्या सरदारची भूमिका साकारणाऱ्या परझान दस्तूरने एक वेगळीच छाप उमटवली होती. लहानपणीच चाहत्यांच्या मनावर आपली छाप उमटवणारा सरदार परझान अता विवाह बंधनात अडकणार आहे.


 
संपूर्ण चित्रपटामध्ये  'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ.' हा डायलॉग बोलणार परझान आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.



परझान २०२१ मध्ये गर्लफ्रेंड डेलना श्रॉफ (delna shroff)सोबत लग्न करणार आहे. 



परझानने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड डेलना श्रॉफला प्रपोज करताना फोटो पोस्ट केला आहे. शिवाय आपण २०२१मध्ये लग्न करणार असल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.



परझान एका  प्रॉडक्शन हाउसचा मालक आहे. तो नेहमी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 

Monday, November 23, 2020

‘कलिंगड’ कापल्याशिवाय ते गोड आहे की नाही हे ‘कसे’ ओळखाल? जाणून घ्या या 5 टिप्स…

 

‘कलिंगड’ कापल्याशिवाय ते गोड आहे की नाही हे ‘कसे’ ओळखाल? जाणून घ्या या 5 टिप्स…



उन्हाळा सुरू झाला की आपण थंड पदार्थ जास्त खात असतो. त्यात आपल्याला उन्हाळ्यात एखाद्या वरदानपेक्षा कमी नाही ते कलिंगड. उन्हाळ्यात कलिंगड खाणे सर्वांनाच आवडत असते. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आपल्याला शरिराला होत असतात.

उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि आपल्याला उष्माघाताचा धोका कमी होतो. हे कारण अनेकांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही ते देखील आवडीने कलिंगड खातात.

पण अनेक वेळा जेव्हा आपण कलिंगड खरीदी करतो तेव्हा ते बाहेरून दिसायला तर छान असते आणि आपल्याला ही असे वाटते की हे आतून लाल आणि गोड निघणार पण असे होत नाही. यामध्ये कित्येकदा आपली फसवूनक होत असते.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कलिंगड खरीदी करताना तुम्ही कोणती दक्षता घेतली पाहिजे जेणेकरून तुमचे कलिंगड आतून लालमलाल आणि गोड निघेल किंवा तुमची फसवणूक होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया.

कलिंगड न कापता गोड आहे की नाही हे ओळखण्याच्या काही पद्धती आहेत त्या खालीलप्रमाणे.

१.कलींगडावरील डाग

काही कलिंगडवर पांढरे डाग असतात,काहींवर पिवळे तर काहींवर केशरी – पिवळे डाग म्हणजे ज्यावेळी कलिंगड काढून ठेवले जातात ते या डागांच्या ठिकाणी खाली ठेवले जातात.पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये. शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड घ्यावा.खूप गोड असतो.

२.कलिंगडावरील जाळी


ही जाळी म्हणजे पोलीनेशन प्रक्रिये वेळी माशांनी जास्तीत जास्त वेळा फुलांना स्पर्श केला आहे. जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड.

३.मुलगा की मुलगी


तुम्हांला नक्कीच प्रश्न पडला असेल की, ही काय भानगड आहे. पण यावरही कलिंगड किती गोड आहे की त्यात पाण्याचा अंश जास्त आहे हे समजते. उंच कलिंगड म्हणजे “मुलगा” असे समजावे. यात पाण्याचा अंश जास्त असतो. गोल कलिंगड म्हणजे “मुलगी” असे समजावे. हे खूप गोड असत.

४.आकार

कलिंगडाचा आकार जास्त मोठा नको किंवा जास्त छोटा ही नको. मधल्या आकाराचा कलिंगड गोड लागतो. त्यामुळे कलिंगड घेताना मध्यम आकाराचा घ्या.

५.देठ

देठ जर हिरवा असेल तर कलिंगड लवकर काढले आहे म्हणजे ते पिकण्या अगोदर काढले आहे. हे जास्त गोड नसते, देठ जर सुकलेला असेल तर गोड कलिंगड, आणि पूर्ण पिकलेले आहे.

म्हणून कलिंगड खरीदी करताना या गोष्टी लक्षात असू द्या आणि या उन्हाळ्यात त्याचा आस्वाद घ्या.


Friday, November 20, 2020

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का?

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र ठाऊक आहे का?

...म्हणून दिवाळीत बनवले जातात करंजी, चकली, चिवडा अन् लाडू


नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

आदिती दिवाळीच्या सुट्टीला गावी गेली होती. गावी सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते. आदितीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते.. आई, मामा, आत्या सर्वाना प्रश्न विचारून विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा? करंज्या अशा कशा दिसतात? लाडू गोलच का करतात? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का? तिच्या या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते. मामाला थोडंफार येत होतं, पण आज त्याला आदितीच्या आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते. 
     असो. तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:। ..  महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असतान जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.
आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ  होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ  असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.

लाडू…


उदाहरणार्थ आपण लाडूचे पांचभौतिक महत्त्व जाणून घेऊ यात. लाडू हा पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान असा पदार्थ आहे. त्यामुळे तो अत्यंत पौष्टिक व बलवर्धक आहे. लाडूचे प्रकार जरी अगणित असले तरी त्याचा आकार मात्र गोलच असतो. पृथ्वीसारखा स्थिर व आप महाभूतासारखा गोल आकार धारण करतो. मुळात पृथ्वीसारख्या त्याच्या दीर्घकाळ टिकण्याच्या गुणामुळे लाडू करण्याची पद्धत निर्माण झाली असावी. पूर्वीच्या काळी प्रवास मोठे असत. वाटेत आताच्यासारखी हॉटेल नसत. म्हणून खूप दिवस टिकणारा व प्रवासात नेता येणारा, सर्व लहान मुलांना आवडणारा, खाताना हात येणारा आणि यासोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नसणारा, स्वादिष्ट व गोड असल्याकारणाने पटकन तरतरी आणून देणारा, खाताच पोट भरलेल्याची जाणीव करून देणारा, असा हा मजेशीर पदार्थ म्हणजे लाडू.

लाडूचे प्रकारही असंख्य आहेत. विविध डाळी, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून विविध प्रकारचे लाडू बनविता येतात. बदाम, काजू, मनुके यांमुळे लाडू अधिकच पौष्टिकहोतात. तुपामुळे त्यांमध्ये स्निग्धपणा आलेला असतो. आपल्याकडे रव्याचे लाडू, हरभरा डाळीचे लाडू, बेसनाची जाड शेव तयार करून तिचे तुकडे गुळाच्या पाकात पाडून तयार केलेले शेवकांडीचे लाडू, फक्त चुरमुरे व गुळाचा पाक यांपासून बनविलेले लाडू असे अनेक प्रकार आहेत. मधुमेहाचे रुग्ण सोडले तर बाकी सर्वाना विशेषत: लहान मुलांना तर पोषक असा दिवाळीचा एक परिपूर्ण आहारीय पदार्थ म्हणजे लाडू. यापैकी दिवाळीत फारसा न केला जाणारा मात्र लहान मुलांसाठी अत्यंत वृष्य, बलदायक व पौष्टिक असा लाडू म्हणजे फक्त खजूर व गुलकंद वापरून तूप लावून केलेला लाडू. ज्यांनी केला नसेल त्यांनी या दिवाळीत हा आवर्जून करावा. मुले फार खूश होतात. तसेच गुलकंद पित्तशामक असल्याने याने फार उष्णताही वाढत नाही. मुलांना चॉकलेटपेक्षा हाच लाडू जास्त आवडतो. तसेच स्त्रियांनी या दिवाळीत हटकून ठरवून स्वत:साठीसुद्धा एक आयुर्वेदिक केश्य लाडू बनवावा. अहळीव, खोबरे, तीळ, बडिशेप, बाळंतशेप, डिंक, गोडांबी, बदाम, तूप, गूळ यांपासून बनविलेला हा लाडू उत्तम केश्यवर्धक, हाडांना बळकटी देणारा, केसांची वाढ करणारा व केसांना प्राकृत कृष्ण वर्ण प्रदान करणारा आहे.

करंजी


आता आपण करंजीबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ यात. करंज या वृक्षाच्या बिया या करंजीप्रमाणे दिसतात. म्हणून यास करंजी असे म्हणतात. करंजी ही अर्धचंद्राकृती असते. अर्थातच वायू महाभूताचे अधिक्य यामध्ये असते. म्हणून करंजी जेवढी वायूने अधिक भरलेली असेल तेवढी छान लागते. दिसायलाही भरलेली खुसखुशीत कारंजी छान दिसते. म्हणून करंजी बनविताना याची काळजी घ्यावी लागते.

चकली


वर्तुळाकृती व अर्धचंद्राकृती आणखी एक पदार्थ म्हणजे चकली. यामध्ये आकाश व वायू महाभूताचे आधिक्य असते. म्हणूनच ती त्या त्या महाभूताचा आकारही धारण करताना दिसतात. यामध्ये आपण जेवढे तिखट मिसळू तेवढे त्याचे तेज तत्त्व वाढते. त्याचबरोबर तिच्यावर अग्निसंस्कार किती झाला आहे यावरून चकलीचे रूप ठरते. म्हणून चकलीची भाजणी उत्तम व्हावी लागते. तसेच ती तळणे हे सुद्धा एक अत्यंत कौशल्याचे काम आहे. चकली कमी तापलेल्या तेलात टाकली तर तिचे महाभूत संघटन बिघडते व ती मऊ  होते. तिचा बाहेरील भाग कडक होत नाही. म्हणून योग्य प्रमाणात तापलेल्या तेलातच चकली तळली तर तिच्यातील संघटन उत्तम बनते व चकली कडक व खुसखुशीत बनते. यावरून आपल्याला एखाद्या पदार्थाच्या निर्मितीतील पंचमहाभूतांचे महत्त्व चटकन समजते.

चिवडा

तिखट पदार्थामधला आपल्या सर्वाचा आवडता आणि आकाश व वायू महाभूत प्रधान असा आणखी एक पदार्थ म्हणजे चिवडा. बहुतेक घरांमध्ये पातळ पोहय़ांचा चिवडा बनविला जातो. पोहे हा शब्दच मुळी ‘पृथु’ या शब्दापासून निर्माण झाला आहे. लाहय़ांना चपटे केले, पृथु केले की त्यास पोहे असे म्हणतात. त्यामुळे काही ठिकाणी लाहय़ांचा चिवडा केला जातो तर काही ठिकाणी त्याच लाहय़ांपासून बनविलेल्या पोहय़ांचा चिवडा केला जातो. लाहय़ांमधील आकाश महाभूत काढून टाकले व त्यास ‘पृथु’ करून त्यातील पर्यायाने अल्प पृथ्वी महाभूत वाढवले की झाले पोहे. मात्र या पोहय़ांमध्ये भरपूर प्रमाणात छिद्रे असल्याने यात वायू महाभूताधिक्य हे असतेच. म्हणून पोहे, भेळ, लाहय़ा असे पदार्थ खाल्ले की आपला वात वाढतो. असो. म्हणून पोहे नुसतेच जर कढईत भाजायला घेतले तर उष्णता जास्त असल्याने पोहय़ांमध्ये जागा व्यापलेल्या हवेचे प्रसरण होऊन ती बाहेर निघून जाते व पोहे आक्रसतात. म्हणून पातळ पोहय़ांचा चिवडा करताना ते आधी भाजू नयेत. फोडणी झाल्यावर त्यावर पोहे टाकून परतले की तेलाचे सूक्ष्म आवरण त्या पोहय़ांवर चढते. हवेची जागा तेलाचे सूक्ष्म रेणू घेतात. म्हणून पोहे अशा प्रकारे परतले की आक्रसत नाहीत. मंद विस्तवावर परतले की त्यातील अंगभूत पाण्याचा अंश निघून जातो. त्यामुळे तेलाचे रेणू आतपर्यंत जाऊ  शकतात आणि पोहे कुरकुरीत होतात. दगडी पोहय़ांसारखे जाड पोहे असल्यास ते तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करतात. तसेच काही ठिकाणी भाजक्या पोहय़ांचाही चिवडा करतात. ते आधीच भाजके  असल्याने कुरकुरीतच असतात. त्यामुळे ते तळावे लागत नाहीत किंवा जास्त भाजावेही लागत नाहीत. तर थोडक्यात हा सर्व खेळ त्या पोहय़ांमध्ये दडलेल्या आकाश आणि वायू महाभूताचा आहे. त्यावर अग्नी महाभूताचा आपण संस्कार करतो व त्यास अधिकच रुचकर बनवतो.

अनारसे

अनारसे बनवताना मात्र जल महाभूताच्या संतुलनाला  महत्त्व असते. म्हणून अनारशासाठी तांदूळ तीन दिवस भिजवून मगच कुटले जाते. तीन दिवस भिजल्याने त्यामध्ये आंबवण्याची क्रिया आधीच झालेली असते. त्यामुळे त्या पिठात वायू महाभूतही वाढलेला असतो. अर्थात या ठिकाणी हा वायू महाभूत म्हणजे आंबविण्याच्या क्रियेत तयार झालेला कार्बन डायॉक्साइड. त्यामुळे अनारसा तुपात टाकला की वायू व अंगीभूत पाण्याची वाफ बाहेर येऊ  लागते. म्हणून अनारशावर तूप उडवीत राहिले कीत्या छिद्रांमधून ते आतपर्यंत जाऊ  शकते आणि अनारशाला जाळी पडते. उष्ण तत्व योग्य प्रमाणात मिळाल्यास त्यास छान सोनेरी रंगही प्राप्त होतो.

अशा प्रकारे आपल्याकडे दिवाळीच्या फराळामध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थामागे काही तरी शास्त्र दडलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्याकडे प्रत्येक सणाला बहुतांशी वेगवेगळा पदार्थ वर्णन केला आहे. त्यामुळे संक्रांत, दिवाळी, दसरा, कोजागरी, नवरात्र, श्रावण या प्रत्येक काळात आहारीय पदार्थ वेगवेगळे सांगितले आहेत. आपण मात्र एकसाखेच वागून किंवा त्यांचे चुकीचे अनुसरण करून आजार वाढवून घेतो. दिवाळीच्या काळात निसर्ग आपल्याला बल द्यायला सुरुवात करतो. बाहेर थंडी सुरू झालेली असते. त्यामुळे त्वचेवरील रोम रंध्रे बंद होऊ  लागतात व अग्नी शरीरात कोंडला गेल्याने तो अधिकच वाढू लागतो. त्यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. म्हणून ही भूक भागविण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पचनशक्तीचा अंदाज घेऊन स्वत:च्या शरीराचे पांचभौतिक संघटन ओळखून दिवाळीतील पदार्थाचा आनंद घ्यावा.


Thursday, November 19, 2020

Online shopping & Entertainment

 लाइमलाइट से दूर रहते हैं अमिताभ बच्चन के भाई, देश-विदेश में कमाया खूब नाम, जानिए इनके बारे में सबकुछ


पिछली सदी के महानायक कहे गए अमिताभ बच्चन को सिनेमा में 50 साल से ज्यादा का समय हो गया है। बिग बी आज भी फिल्मों में एक्टिव हैं। बच्चन परिवार के बारे में तो आप सभी जानते ही होंगे। अमिताभ अपने पूरे परिवार पत्नी जया बच्चन, बेटे अभिषेक, बहू ऐश्वर्या और पोती आराध्या के साथ मुंबई के एक आलीशान बंगले 'जलसा' में रहते हैं।



आज हम आपको बच्चन परिवार के एक और शख्स के बारे में बताने जा रहे हैं। वो शख्स हैं बिग बी के छोटे भाई अजिताभ बच्चन। अजिताभ अमिताभ से पांच साल छोटे हैं। उनका जन्म 18 मई, 1947 को इलाहाबाद में हरिवंश राय बच्चन और तेजी बच्चन के घर में हुआ था। 



अपने बड़े भाई अमिताभ की तरह उन्होंने भी नैनीताल के शेरवुड कॉलेज से पढ़ाई की है। अजिताभ बच्चन भारत के जाने-माने बिजनेसमैन हैं। इससे पहले वो 15 साल तक लंदन में रहकर बिजनेस करते थे। उन्हें लाइमलाइट में रहना पसंद नहीं है।



अजिताभ की शादी रमोला से हुई है। वो एक सोशलाइट और बिजनेसवुमन हैं। उन्हें साल 2014 में एशियन ऑफ द ईयर का अवॉर्ड दिया गया था। लंदन में उन्हें पार्टियों की शान कहा जाता था। साल 2007 में अजिताभ का परिवार भारत शिफ्ट हो गया। अजिताभ और रमोला के 4 बच्चे (बेटा भीम, तीन बेटियां नीलिमा, नम्रता, नैना) हैं। अजिताभ के बेटे भीम पेशे से एक इन्वेस्टमेंट बैंकर हैं। बेटी नैना ने साल 2015 में एक्टर कुणाल कपूर से शादी की है।



अमिताभ और अजिताभ सालों तक एक-दूसरे से दूर रहे लेकिन दोनों अपने-अपने काम में काफी बिजी रहते हैं। लेकिन दोनों में बेहद प्यार और दोस्ती का रिश्ता है। कमाई की बात करें तो अजिताभ भी बिग बी से पीछे नहीं हैं। बॉलीवुड के शहंशाह की तरह वे भी लग्जरी लाइफ जीते हैं। लंदन में रहकर उन्होंने खूब दौलत और शोहरत कमाई है।

याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...

 

याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...

Viral News in Marathi : त्याच्या घरावर आकाशातून जणू खजिनाच कोसळला. त्यामुळे जोसुआ तब्बल  १० कोटींचा मालक झाला आहे. 



उपरवाला देता है तो छप्पर फाड के! असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.  खऱ्या आयुष्यात सुद्धा असं घडतं. यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण  इंडोनेशियातील ३३  वर्षांचा माणूस  काही मिनिटांतच करोडपती झाला आहे. जोसुआ हुतागलुंग असं या माणसाचं नाव आहे.  त्याच्या घरावर आकाशातून जणू खजिनाच कोसळला. त्यामुळे जोसुआ तब्बल  १० कोटींचा मालक झाला आहे. 

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार जोसुआ उत्तर सुमात्रातील कोलांगमध्ये असलेल्या आपल्या घराच्या आजूबाजूला काम करत होता. त्यावेळी त्याच्या घरावर काहीतरी कोसळल्याने मोठा आवाज आला. यामुळे फक्त त्याचं घरच नाही तर आजूबाजूची घरंही हादरली. कारण खूप मोठा आवाज त्यावेळी झाला होता.


ज्यावेळी जोसुआनं  नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या छताकडे पाहिलं तेव्हा त्याच्या छताला मोठ होल पडला होता. एक मोठा दगड त्याच्या घरावर कोसळला आणि यामुळे जमिनीवर १५ सेंटीमीटर खड्डा झाला. जोसुआनं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा त्यानं जमिनीतून हा दगड बाहेर काढला तेव्हा तो खूप गरम होता आणि थोडा तुटलाही होता.

या दगडाचं वजन  २.१ किलो होतं. नंतर लक्षात आले की, हा दगड साधासुधा नाही तर आकाशातून कोसळलेली एक दुर्मिळ उल्कापिंड आहे.  ही उल्कापिंड खूप जुनी असल्याचं सांगितलं जातं आहे. आकाशातून हा दगड छतावर पडला असावा.


विशेष म्हणजे ही उल्कापिंड खूप मौल्यवान आणि दुर्मिळ आहे. याची किमंत जवळपास  ८५७ डॉलर असावी. रिपोर्टनुसार जोसुआनं खड्डा खणून ही अनमोल उल्कापिंड बाहेर काढला, ज्यामुळे तिच्यावर त्याचा मालकी हक्क होता. या अनमोल दगडाच्या बदल्यात जोसुआला  १४ लाख पाउंड म्हणजे तब्बल १० कोटी रुपये मिळाले.



जोशुआने माध्यमांशी बोलताना सांगितले की, '' अनेक वर्षे काम करून मला पगार मिळाला नाही, तितका पैसा आपल्याला या दगडामुळे मिळाला. मला तीन मुलं आहे. या पैशातून मी आपल्या समाजासाठी घरं बांधण्याचा विचार करत आहे.''  

साल में एक बार ही दर्शन देती हैं इस मंदिर की मां अन्‍नपूर्णा

साल में एक बार ही दर्शन देती हैं इस मंदिर की मां अन्‍नपूर्णा



 हे माता अन्नपूर्णा मंदिर जे मूळ सोन्याची मूर्ति असलेलं आहे, हे फक्त दिवाळीचे 3 दिवसच किंवा जास्तीत जास्त 4 दिवसच उघडतात.

काशीवासी व यात्रेकरू यांची प्रचंड रांग लागते ह्या विग्रहाच्या दर्शनासाठी. तर हे दर्शन पहिल्यांदाच छायचित्र रूपाने मिळतं आहे. मला तरी यापूर्वी ह्या विग्रहाचं छायाचित्र कुठेही आधी पाहायला मिळालेलं नाही..

तरी सर्व सदस्यांनी कृपया हे दर्शन अत्यंत अमूल्य व दुर्लभ तसेच महाकृपेने प्राप्त झालंय हे लक्षात घेऊन संग्रहीत करा. योग्य व्यक्तीला अवश्य पाठवा.

माता अन्नपूर्णेचं नित्य दर्शन जे काशीला आपण घेतो तो विग्रह चांदीचा आहे. उपरोक्त दर्शन हे मात्र सुवर्ण विग्रहाचं आधी म्हटल्याप्रमाणे दीपवाळीत 3 ते 4 दिवसच मिळतं तेही महत्प्रयासाने..

बनारस में है मां का मंदिर

बनारस में काशी विश्‍वनाथ मंदिर से कुछ ही दूर माता अन्‍नपूर्णा का मंदिर है। इन्‍हें तीनों लोकों में खाद्यान्‍न की माता माना जाता है। कहते है कि माता ने स्‍वयं भगवान शिव को खाना खिलाया था। इस मंदिर की दीवारों पर ऐसे चित्र बने हुए हैं। एक चित्र में देवी कलछी पकड़ी हुई है। इस मंदिर में साल में केवल एक बार अन्नकूट महोत्सव पर मां अन्नपूर्णा की स्वर्ण प्रतिमा को सार्वजनिक रूप से एक दिन के लिऐ दर्शनार्थ निकाला जाता है। तब ही भक्त इनकी अद्भुत छटा के दर्शन कर सकते हैं। 

यहीं की शंकराचार्य ने अन्नपूर्णा स्त्रोत् की रचना

अन्नपूर्णा मंदिर के प्रांगण में कुछ अन्‍य मूर्तियां स्थापित है, जिनके दर्शन सालभर किए जा सकते हैं। इन मूर्तियों में मां काली, शंकर पार्वती और नरसिंह भगवान के मंदिर में स्‍थापित मूर्तियां शामिल हैं। बताते हैं कि अन्नपूर्णा मंदिर में ही आदि शंकराचार्य ने अन्नपूर्णा स्त्रोत् की रचना कर के ज्ञान वैराग्य प्राप्ति की कामना की थी। ऐसा ही एक श्‍लोक है अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरप्राण बल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्धर्थं भिक्षां देहि च पार्वती। इस में भगवान शिव माता से भिक्षा की याचना कर रहे हैं। 



मंदिर से जुड़ी कहानी 

इस मंदिर से जुड़ी एक प्राचीन कथा यहां बेहद चर्चित है। कहते हैं एक बार काशी में अकाल पड़ गया था, चारों तरफ तबाही मची हुई थी और लोग भूखों मर रहे थे। उस समय महादेव को भी समझ नहीं आ रहा था कि अब वे क्‍या करें। ऐसे में समस्‍या का हल तलाशने के लिए वे ध्‍यानमग्‍न हो गए, तब उन्हें एक राह दिखी कि मां अन्नपूर्णा ही उनकी नगरी को बचा सकती हैं। इस कार्य की सिद्धि के लिए भगवान शिव ने खुद मां अन्नपूर्णा के पास जाकर भिक्षा मांगी। उसी क्षण मां ने भोलेनाथ को वचन दिया कि आज के बाद काशी में कोई भूखा नहीं  रहेगा और उनका खजाना पाते ही लोगों के दुख दूर हो जाएंगे। तभी से अन्‍नकूट के दिन उनके दर्शनों के समय खजाना भी बांटा जोता है। जिसके बारे में प्रसिद्ध है कि इस खजाने का पाने वाला कभी आभाव में नहीं रहता। 

Wednesday, November 18, 2020

‘हे’ अवघड कोडे वाचून तुमच्याही मेंदूचा होईल भुगा, फक्त बुद्धिमान लोकच याची उत्तरे देऊ शकतील….

 

‘हे’ अवघड कोडे वाचून तुमच्याही मेंदूचा होईल भुगा, फक्त बुद्धिमान लोकच याची उत्तरे देऊ शकतील….




आपण बऱ्याच काळापासून वेगळी वेगळी कोडी सोडवत आलो आहोत. काही कोडी इतकी सोपी असतात की लहान मुलगा देखील त्याचे उत्तर पट दिशी देऊन टाकतो. परंतु अशी काही कोडी असतात की त्यांचे उत्तर शोधता शोधता चांगल्या बुद्धिवान लोकांचे मेंदूचा भुगा होतो.पण अती हुशार लोकही या दुनियेत कमी नाही.

असे काही लोक हुशार असतात की त्यांच्यासमोर कोणतेही कोडे ठेवा त्याच अचूक उत्तर ते कोणताही वेळ वाया जाऊ न देता देतात. काही लोकांना मात्र सर्वसाधारण कोड्यांची उत्तर देण्यास बरेच दिवस निघून जातात. कोडीची उत्तरे शोधणे प्रत्येकाला आवडते. कोडीचे उत्तर देणेचे काही फायदे देखील आहेत.

सर्वप्रथम त्यात त्यांचा वेळ जातो आणि दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे उत्तर शोधत असताने मेंदूचा चांगलाच व्यायाम होतो. जो स्मार्ट आणि शार्प बुद्धीसाठी खूप महत्वाचा आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच काही कोडे घेऊन आलो आहोत, उत्तर सोपे नाही. पण उत्तर देण्याचा एकदा तरी प्रयत्न करून पहा.

1) अशी कोणती जागा आहेत जिथे 100 लोक गेले तर 99 लोकच माघारी येतात ?
उत्तर: – स्मशानभूमी
2) असा कोणता इंग्रजी शब्द आहे जो इंग्रजीत नेहमी Incorectly स्पेल करत असतो ?
उत्तर: – Incorectly.

3) काही महिने 31 दिवसाचे असतात तर मग किती महिने 28 दिवसाचे असतात ?
उत्तरः प्रत्येक महिन्यात 28 दिवस असतात.

4) समजा की तुम्ही एका बस मधून प्रवास करत आहात जीच्यातून अजून 10 प्रवासी प्रवास करत आहे. पहिल्या स्टॉप वर 2 प्रवासी उतरून 4 प्रवासी बसमध्ये चढतात. दुसऱ्या स्टॉप वर 5 प्रवासी उतरतात व 2 प्रवासी बसमध्ये चढतात. तिसऱ्या स्टॉप वर 2 प्रवासी उतरतात व 3 प्रवासी बसमध्ये चढतात. आता सांगा बसमधून एकूण किती प्रवासी प्रवास करत आहे ?
उत्तर: – 11 (10 प्रवासी 1 आपण)




Monday, November 16, 2020

हिंदू-मुस्लीम विवाह : ब्राह्मण घरात वाढलेल्या रुपाला आई म्हणाली, ‘तो तुला तलाक, तलाक, तलाक बोलून घराबाहेर काढेल’

 

हिंदू-मुस्लीम विवाह : ब्राह्मण घरात वाढलेल्या रुपाला आई म्हणाली, ‘तो तुला तलाक, तलाक, तलाक बोलून घराबाहेर काढेल’



भारतात जात किंवा धर्माबाहेर लग्न हे वादाचं कारण ठरू शकतं. भारतीय समाजात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना सहसा मान्यता मिळत नाही.

मात्र, इन्स्टाग्रामवर सध्या एक मोहीम सुरू आहे. प्रेमाला जात, धर्म, वंश आणि लैंगिकतेच्या वर स्थान देणाऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या गोष्टी इथं वाचायला मिळतात.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला रुढीवाद्यांचा कायम विरोध राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत देशात कट्टरता वाढली आहे.

काही दिवसांपूर्वीच 'तनिष्क' या दागिने बनवणाऱ्या कंपनीची एक जाहिरात आली होती. या जाहिरातीत एक मुस्लीम कुटुंब दाखवण्यात आलं होतं. ते आपल्या हिंदू सूनेसाठी डोहाळ जेवणाचा कार्यक्रम ठेवतात आणि हे सरप्राईज बघून ती खूश होते.

मात्र, या जाहिरातीलाही मोठा विरोध झाला. अखेर त्यांना जाहिरात मागे घ्यावी लागली.

या जाहिरातीच्या माध्यमातून धार्मिक एकोपा जपण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, जाहिरातीवर टीका करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

दुसरीकडे या जाहिरातीच्या माध्यमातून 'लव जिहाद'ला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं जाहिरातीचा विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं. विरोध करणाऱ्यांमध्ये कट्टर हिंदुत्त्वावाद्यांचा भरणा होता.

धर्मपरिवर्तनाच्या उद्देशाने मुस्लीम मुलं हिंदू मुलींशी लग्न करतात, असा एक समज आहे आणि त्याला 'लव्ह जिहाद' म्हणण्यात आलं आहे.

तनिष्कची जाहिरात आल्यानंतर तनिष्कवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं आणि ट्विटरवर तो टॉप ट्रेंडही झाला. वाद वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा बघता आपण जाहिरात मागे घेत असल्याचं कंपनीने सांगितलं.

इंडिया लव्ह प्रोजेक्ट

तनिष्कच्या वादानंतर पत्रकार समर हलरंकर, त्यांच्या पत्रकार पत्नी प्रिया रमानी आणि त्यांच्या पत्रकार-लेखक मैत्रीण निलोफर व्यंकटरमन यांनी इंस्टाग्रामवर 'इंडिया लव्ह प्रोजेक्ट' सुरू केला.

या प्रोजेक्टचं एक इंस्टाग्राम अकाउंट आहे. सामाजिक बंधन मोडून प्रेम आणि लग्न करणारी जोडपी या अकाउंटवर आपली कहाणी शेअर करतात.

या द्वेषपूर्ण वातावरणात आंतरधर्मीय आणि आंतरजातीय प्रेम आणि लग्न सेलिब्रेट करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू केल्याचं समर हलरंकर सांगतात.

बीबीसीशी बोलताना समर हलरंकर म्हणाले, "या प्रोजेक्टवर आम्ही गेल्या वर्षभरापासून विचार करत होतो. तनिष्कच्या जाहिरातीवरून वाद सुरू झाल्यावर हा प्रोजक्ट सुरू करण्यासाठीची ही सर्वोत्तम वेळ असल्याचं आम्हाला वाटलं."

"प्रेम आणि आंतरधर्मीय लग्नाविषयी जो दुष्प्रचार सुरू होता त्याची आम्हाला काळजी वाटत होती."

"प्रेमाचा अस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचा दुष्प्रचार सुरू होता. आम्ही अशा एकाही व्यक्तीला ओळखत नाही ज्याने प्रेम सोडून इतर कुठल्या कारणासाठी लग्न केलं."

ते म्हणतात, "आपली कहाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हाच इंडिया लव्ह प्रोजेक्टचा उद्देश आहे."

रोज एक प्रेम कहाणी

28 ऑक्टोबर रोजी निलोफर व्यंकटरमण यांच्या पारसी आई बख्तावर मास्टर आणि हिंदू पिता एस. व्यंकटरमण यांच्या प्रेमकहाणीने या प्रोजेक्टची सुरुवात झाली. आता या अकाउंटवरून रोज एक प्रेमकहाणी शेअर होते.

या अकाउंटला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं समर हलरंकर सांगतात. ते म्हणतात, "रोज अनेक लोक संपर्क करतात आणि स्वतःची, आई-वडिलांची, आजी-आजोबांची कहाणी शेअर करण्याची इच्छा असल्याचं सांगतात."

नीलोफर यांनी आपल्या आई-वडिलांची प्रेमकहाणी सांगितली.

"प्रतिसाद इतका जास्त आहे की सांभाळणं अवघड आहे. यावरून भारतात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न नवीन नसल्याचंही कळतं. फार पूर्वीपासून भारतात अशी लग्न होत आहेत. असं असलं तरी आज या विषयी बोलणं कधी नव्हे इतकं महत्त्वाचं आहे."

भारतात 90% लग्न अरेंज्ड असतात. अशा अरेंज्ड मॅरिजमध्ये लोक आपल्याच जीत-धर्मातलं स्थळ शोधतात.

भारतीय मानव विकास सर्व्हेनुसार आंतरजातीय लग्नाचं प्रमाण केवळ 5% आहे आणि आंतरधर्मीय लग्नाचं प्रमाण तर अजूनही कमी आहे. एका सर्व्हेनुसार भारतात आंतरधर्मीय लग्नाचं प्रमाण 2.2% इतकं कमी आहे.

जे या सीमारेषेच्या पलिकडे जाऊन लग्न करतात त्यातल्या बहुतेक लोकांना हिंसेचा सामना करावा लागतो.

हळूहळू विचार परिवर्तन


गेल्या काही वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात आंतरधर्मीय विवाहांना विरोध वाढल्याचं दिसलं. विशेषतः हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा असेल तर अशा लग्नांना तर हमखास विरोध होतो.

समर हलरंकर म्हणतात,"फेब्रवारी महिन्यात कायद्यात 'लव्ह जिहाद'चा उल्लेख नसल्याचं आणि सरकारी संस्थांनाही अशी कुठली प्रकरणं आढळली नसल्याचं सरकारने संसदेत म्हटलं होतं. मात्र, लोकांना अजूनही असं वाटतं. गेल्या काही दिवसात भाजप शासित कमीत कमीत चार राज्यांना या 'सामाजिक किडी'ला आळा घालण्यासाठी कायदा बनवणार असल्याची घोषणा केली आहे."

इंडिया लव्ह प्रोजेक्टमध्ये लोक 150 शब्दांत प्रेम आणि आनंदाने आपली कहाणी सांगतात. मानवनिर्मित बेड्या प्रेमाच्या आड येऊ शकत नाहीत, हेच त्यांच्या अनुभवांवरून स्पष्ट होतं.

रुपा हिंदू ब्राह्मण आहेत. आपल्याला रझा अब्दी नावाचा मुस्लीम मुलगा आवडत असल्याचं जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती, "तो तुला तलाक, तलाक, तलाक म्हणून घराबाहेर काढेल."

रुपाच्या आईला इस्लाममधल्या तीन तलाक पद्धतीची चिंता होती. मात्र, सध्या भारतात घटस्फोटाची ही पद्धत अमान्य आहे.


रुपा आणि राझ अब्दी यांच्या लग्नाला तीस वर्षं झाली आहेत.

रुपा सांगतात, "मात्र, माझे आई-वडील रझाला भेटल्यावर ते व्यक्ती म्हणून किती उत्तम आहेत, याची प्रचिती त्यांना आली. माझ्या आई-वडिलांच्या सर्व शंका दूर झाल्या."

रुपा आणि रझा यांच्या लग्नाला 30 वर्षं झाली आहेत. ईद आणि दिवाळी हे दोन्ही सण ते उत्साहात साजरे करतात.

दहीभात विरुद्ध मटण बिर्याणी

सलमाशी झालेल्या लग्नाविषयी सांगताना पत्रकार टी. एम. वीरराघव म्हणतात, "माझ्या घरात धर्म 'दहीभात विरुद्ध मटण बिर्याणी' एवढा महत्त्वाचा नाही."

ते म्हणतात, "मी शाकाहारी आहे. ती मटण आवडीने खाते. आमचा मुलगा एनिशला या दोन्ही जगातल्या सर्वोत्तम गोष्टी मिळत आहेत. एनिश हिंदू आहे की मुस्लीम हे घरात स्वयंपाक काय बनलाय त्यावर ठरतं."



तनवीर एजाज आणि त्यांच्या हिंदू पत्नी विनिता शर्मा त्यांची मुलगी कुहू हिचं नाव ठेवण्यावेळी काय-काय घडलं ते सांगितलं आहे.

कुहू नाव हिंदू आहे की मुस्लीम आणि तुमची मुलगी मोठी झाल्यावर ती कोणता धर्म स्वीकारेल, अशी विचारणा त्यांना करण्यात आली.

केरळच्या मारिया मंजिल खुल्या विचारसरणीच्या कॅथलिक कुटुंबातून येतात. मारिया मांसाहारी आहेत. त्यांनी उत्तर भारतात राहणारे शाकाहारी संजय जैन यांच्याशी लग्न केलं. संदीप यांचं कुटुंब रुढीवादी विचारसरणीचं आहे.

त्यांनी लग्नाच्या 22 वर्षांत त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्याविषयी लिहिलं आहे. मात्र, संदीपशी लग्न करण्याचा निर्णय अगदी योग्य होता, असं त्यांचं ठाम मत आहे.


मारिया मंजिल आणि संदीप जैन

त्या लिहितात, "मी त्यांचा प्रामाणिकपणा, बौद्धिक समानता आणि माझ्याप्रती असलेला स्नेह हे बघून त्यांची निवड केली. ते दुसऱ्या ईश्वराची पूजा करतात किंवा दुसरी भाषा बोलतात, फक्त एवढ्या कारणावरून मी त्यांना सोडू शकत नव्हते."

अशा कहाण्या भारत आणि जगाविषयी तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करत असल्याचं समीर हलरंकर यांना वाटतं.

ते म्हणतात, "या सर्व भारताच्या अद्वितीय वास्तवाच्या सुंदर कथा आहेत. प्रेमासाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. यातून भारत म्हणजे नेमकं काय, हे कळतं."