'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ....'
अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री काजोल स्टारर 'कुछ कुछ होता है' चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर एकेकाळी अधिराज्य गाजवलं आहे. तर त्यामध्ये छोट्या सरदारची भूमिका साकारणाऱ्या परझान दस्तूरने एक वेगळीच छाप उमटवली होती. लहानपणीच चाहत्यांच्या मनावर आपली छाप उमटवणारा सरदार परझान अता विवाह बंधनात अडकणार आहे.
संपूर्ण चित्रपटामध्ये 'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ.' हा डायलॉग बोलणार परझान आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
परझान २०२१ मध्ये गर्लफ्रेंड डेलना श्रॉफ (delna shroff)सोबत लग्न करणार आहे.
परझानने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंड डेलना श्रॉफला प्रपोज करताना फोटो पोस्ट केला आहे. शिवाय आपण २०२१मध्ये लग्न करणार असल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.
परझान एका प्रॉडक्शन हाउसचा मालक आहे. तो नेहमी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.





No comments:
Post a Comment