Vijay Sales [CPS] IN

Friday, March 12, 2021

वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न

 

३१ वर्षांनी लहान असणाऱ्या जपानी गर्लफ्रेंडशी केले लग्न


हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे निकोलस. ‘घोस्ट रायडर’ या चित्रपटातून अनेकांच्या मनात घर करणाऱ्या निकोलसचे जगभरात चाहते आहेत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. तो त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. आता निकोलसने वयाच्या ५७व्या वर्षी पाचव्यांदा लग्न केल्याचे समोर आले आहे.
नुकताच निकोलसने पीपल मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सोशल मीडियावर त्याच्या लग्नाविषयी सुरु असलेल्या चर्चांवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘हो हे खरे आहे. मी लग्न केले आहे. आम्ही आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली असून खूप आनंदी आहोत’ असे म्हटले.


निकोलसने पाचव्यांदा लग्न केले आहे. ते ही त्याच्या पेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या जपानी गर्लफ्रेंड रीको शिबाटासोबत. रीको ही २६ वर्षांची आहे. १६ फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाहसोहळा लॉस वेगसमधील एका हॉटेलमध्ये काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. पण निकोलसने त्याच्या लग्नाबाबतची माहिती मीडियाला दिली नव्हती. निकोलसच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी १६ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. म्हणून त्याने याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.

निकोलसने लग्नानंतर एक पार्टी आयोजीत केली होती. या पार्टीला त्याच्या एक्स पत्नी Alice Kimने हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिचा १५ वर्षांचा मुलगा Kal-El देखील हजर असल्याचे म्हटले जाते.

त्या कार्यक्रमात भेट झाली अन्…, जाणून घ्या किरण आणि अनुपम खेर यांची लव्ह स्टोरी

 

जाणून घ्या त्यांची लव्हस्टोरी...


बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणजे अनुपम खेर. वयाच्या २८व्या वर्षी करिअरला सुरुवात करणाऱ्या अनुमप खेर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असतात. ते सतत सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या अनुपम यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या खासगी आयुष्य देखील चर्चेचा विषय ठरतो. अनुपम यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. आज ७ मार्च रोजी अनुपम खेर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आपण जाणून घेऊया त्यांची लव्हस्टोरी..

किरण खेर आणि अनुपम खेर हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीचे नाते होते. प्रेम किंवा लग्न हा विचारदेखील त्यांना स्पर्शून गेला नव्हता. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची मुंबईमध्ये भेट झाली. मात्र, यावेळी दोघांचेही लग्न झाले होते. त्याकाळामध्ये अनुपम खेर आणि किरण खेर दोघेही काम करण्यासाठी स्ट्रगल करत होते. यादरम्यान दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
              स्ट्रगलच्या काळातच अनुपम खेर यांना १९८५ साली ‘सारांश’ हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. विशेष म्हणजे त्यांनी या चित्रपटानंतर आपल्या पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. याचदरम्यान किरण खेर यादेखील त्यांच्या पतीपासून गौतम बेरी यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या.

घटस्फोटानंतरही किरण आणि अनुपम हे आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करुन होते. त्याचवेळी त्यांची पुन्हा एकदा कोलकातामध्ये नादिरा बब्बर यांच्या एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या कार्यक्रमादरम्यान अनुपम यांनी किरण यांना लग्नाची मागणी घातली. ते इतक्यावरच न थांबता त्यांनी किरण यांच्या मुलाला सिकंदरला देखील स्वत:च नाव दिले.

अनुपम खेर यांनी जवळपास ३७ वर्षांच्या कारकिर्दीत ५०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी एकाहून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८९ साली प्रदर्शित झालेल्या राम लखन या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांनी ‘लम्हे’, ‘खेल’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’, ‘विजय’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातंमध्ये काम केले आहे.



जेजुरीमधील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे उघडले; पहा दुर्मिळ फोटो

 


श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा गडावरील गुप्त शिवलिंगाचे दरवाजे बुधवारी मध्यरात्री उघडण्यात आले. वर्षातून फक्त महाशिवरात्रीला ही गुप्त शिवलिंगे उघडली जातात. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार मोजके पुजारी व मानकरी यांच्या हस्ते तिन्ही शिवलिंगावर अभिषेक-पूजा करण्यात आली. शिवलिंगाचे दर्शन घेताना गर्दी होऊ नये म्हणुन यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.


खंडोबाच्या मुख्य उत्सवापैकी महाशिवरात्रीला वेगळे महत्व आहे.त्रिलोकातील दर्शनाचा लाभ यावेळी घेता येतो. मंदिराच्या शिखरातील शिवलिंगाला स्वर्गलोक तर मुख्य मंदिरातील स्वयंभूलिंगाला भूलोक व गाभार्‍यातील भुगर्भात असलेल्या शिवलिंगाला पाताळलोक समजले जाते. (जेजुरी मुख्य मंदिरात असलेले पाताळातील शिवलिंग)


जेजुरीत जमावबंदीचा आदेश लागू केल्याने शुकशुकाट जाणवत होता.पोलिस प्रशासनाने खंडोबागडाकडे जाण्यार्‍या पायर्‍यांवरच लोखंडी कठडे उभारल्याने कोणीही गडावर गेले नाही.


महाशिवरात्रीला त्रिलोकातील दर्शनासाठी हजारो ग्रामस्थ, भाविक रात्रीपासूनच गडावर गर्दी करतात. चार-पाच तास रांगेत उभे राहतात. यंदा मात्र गड भाविकांविना सुनासुना वाटत होता. कोठेही बेल-भंडार्‍याची उधळण नाही की सदानंदाचा येळकोट असा जयघोष नाही अशा वातावरणातच यंदाचा महाशिवरात्री उत्सव पार पडला. (मुख्य मंदिरातील शिवलिंग याला भूलोकीचे शिवलिंग म्हणतात)


शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्री तिन्ही शिवलिंगाचे पूजन होऊन दोन कळसातील व भुगर्भातील शिवलिंग मंदिर बंद करण्यात येणार आहे.शनिवारपासून (दि.१३) भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. (मुख्य मंदिराच्या कळसामध्ये असलेले स्वर्गलोकीचे शिवलिंग)


तुम्हाला माहिती आहेत का रेखापासून शिल्पा शेट्टी पर्यंतच्या अभिनेत्रींची खरी नावे, नसतील माहित तर जाणून घ्या!

 


या लिस्टमध्ये सगळ्यात आधी नाव येतं बॉलिवूडच्या सगळ्यात सुंदर अभिनेत्रीचं रेखाचं. ती आजही तिच्या अदाकारीने लोकांना वेड लावते. रेखाच्या चित्रपटादरम्यान लोकं तिच्यावर जितके प्रेम करायचे तितकेच प्रेम ते आजही तिच्यावर करतात. आजही तिच्या स्टाईलमध्ये आणि सुंदरतेमध्ये काहीच बदल झालेला नाही. तिला संपूर्ण जग रेखा या नावाने ओळखत असलं तरी तिचं खरं नाव 'भानुरेखा गणेशन' आहे.




बॉलिवूडची 'धडकन'गर्ल म्हणजेच शिल्पा शेट्टी ही आपल्या सुंदरतेसाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी तिने तिचे पूर्वीचे नाव 'अश्विनी शेट्टी' बदलले होते. अश्विनीची शिल्पा शेट्टी झाल्यानंतर तिने चांगलीच लोकप्रियता कमावली.



बॉलिवूडची अभिनेत्री कियारा आडवानी चे खरे नाव ऐकूण तुम्ही चकित व्हाल. आपल्या हॉट आणि स्टाईश फोटोसाठी सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या कियारा आडवानीचे खरे नाव आलिया आडवानी होते. परंतु चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सल्मान खानने तिला नाव बदलण्यासाठी सुचविले होते.



बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीती जिंटाने आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरूवात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांत अभिनय करत केली होती. तीने बॉलिवूडमधल्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत काम केले. त्यानंतर तिने तिच्या विदेशी प्रियकर गुडइनफ सोबत गपचूप लग्न केले. प्रीती जिंटाचे खरे नाव प्रीतम सिंह होते. ते बदलून तिने स्वत:च तिचे नाव प्रीती जिंटा केले.



साऊथ आणि बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवींचे नाव आजही लोकांच्या ओठावर आहे. आज त्या या जगात नसल्या तरी काही खास क्षणांत त्यांच्या फॅन्सना त्यांची आठवन येते. श्रीदेवीसारखी अदाकारी कोणाचीच नसते कारण ती काळाला आपलसं करते. आणि दिवसेंदिवस लक्षात राहते. श्रीदेवींचे खरे नाव 'यम्मा यंगर' होते.


Thursday, March 11, 2021

दुनिया की रहस्यमय पेटिंग मोनालिसा से जुड़े 7 राज

 सन 1757 में मोना मोना लिसा पेंटिंग को फ्रांस के Louvre Museum में पाया गया था,लेकिन चौंकाने वाली बात यह है की यह पेंटिंग वह पहुची कैसे या बात आज तक रहस्य । 1951 में एक आदमी ने मोना लीसा की पेंटिंग पर पत्थर फेंका था जिसकी वजह से मोना लीसा के बाएं हाथ की कोहनी के सामने एक स्क्रेच आ गया है ।



दुनिया में कितनी भी मशहूर व अच्छी पेंटिंग बनी हो, लेकिन मोना लिसा पेटिंग के आगे टिक नही पाती है। म्यूजिम में कई पेंटिंग्स क्यों होती, पर सभी की नजर इसी पर होती है। मोनालिसा न केवल एक पेंटिंग है बल्कि अपने आप में एक रहस्य है जिसका पता आज तक कोई नही लगा पाया है। इस रहस्य को जानने के लिए काफी पेंटर्स व लोगों ने इस पर काम किया है लेकिन इस सच का पता नही लगा पाए है। 500 साल पहले पेंटर 'लिओनार्दो डा विन्ची' ने इसे बनाया था। इस पेटिंग की मुस्कान को लेकर कई तरह के रहस्य सामने आए है। कहा जाता है कि इस चेहरे की मुस्कान हर कोने से अलग ही एंगल में दिखाई देती है। पहले यह काफी ज्यादा दिखाई देती है, धीरे धीरे यह फीके पड़ने लगती है, आखिर  में तो यह पूरी तरह से खत्म हो जाती है। मोना लिसा का मतलब माई लेडी होता है। इस पेटिंग के साथ कई तरह के ओर भी रहस्य जुड़े हुए है जिन्हें हम आज आपको बताने जा रहे है। 

 

मोना लिसा के लिए दी थी अपनी जान

 23 जून 1852 को फ्रेंस के एक आर्टिस्ट luc maspero ने पेरिस के होटल की छत से कूद कर अपनी जान दे दी। वह मोनी लिसी की रहस्यमय मुस्कान व सुंदरता के लिए पागल था। उसने अपने  सूसाइड नोट  में लिखा था कि वह मोनालिसा के प्यार में पागल है। उसने कई सालो तक उसका इंतजार किया है। इतना ही नही म्यूजियम में इस पेटिंग को  कई लव लेटर, फ्लावर भी मिलते है। मोना के प्यार में पागल लोग इसके आगे अपने लव लेटर छोड़ कर जाते है।  

रहस्यमय मुस्कान 

माना जाता है कि इस पेटिंग के लिए जिस महिला को चित्रित किया गया है, उसके अंदर कई तरह के राज छुपे हुए थे। इसलिए यह पेटिंग भी इतनी रहस्यमय है। शायद यहीं कारण है कि आज तक इस पेटिंग की मुस्कान भी एक रहस्य है। रिसर्च के दौरान एक डॉक्टर ने कहा था कि मोना लिसा के ऊपरी दो दांत टूटे हुए थे, जिस कारण उनके ऊपरी होंठ अंदर को दबे हुए है। यह कारण है कि हर एंगल से उनकी स्माइल अलग दिखती है। वहीं हार्वेड के न्यूरो साइंटिस्ट डॉ. मार्गेट ने कहा कि मोना की स्माइल नही बदलती है, यह हमारी दिमाग की सोच है। हम जो देखना चाहते है हमें वही दिखाई दिया जाता है।

14 साल में बनी थी पेटिंग

 लिओनार्दो डा विन्ची को इस पेटिंग को बनाने में 14 साल लग गए थे। उन्होंने 1503 में इसे बनाना शुरु किया था, 1517 में इसे पूरा किया। इस पेटिंग में इनके होंठ बनाने में ही 12 साल ही लग गए थे। इस पेटिंग को बनाने के लिए 30 से भी ज्यादा लेयर्स का इस्तेमाल किया गया था। इसमें से कुछ इंसानी बाल से भी बारीक थी।  पेटिंग देखने में बड़ी लगती है लेकिन काफी छोटी है। यह 30 * 21 इंच की है। इसका भार 8 किलोग्राम है। इसे पेपर व केन्वस पर नही पॉपुलर की लकड़ पर ऑयल पेंट के साथ बनाया गया था।  

चोरी के बाद प्रसिद्ध हुई पेटिंग 

यह पेटिंग पहले इतनी प्रसिद्ध नही थी, लेकिन रिस लुब म्यूजियम पेरिस से चोरी होने के बाद यह काफी फेमस हो गई थी। 21 अगस्त 1911 को इतने बड़े म्यूजियम से पेटिंग का चोरी हो जाना बहुत ही बड़ी बात थी। इसके चोरी होने के बाद पहला शक पेंटर पाब्लो पिकासो पर लगा था। उनसे काफी पूछताछ के बाद यह इलजाम उन पर से हटा दिया गया था। इसकी चोरी के बाद एक हफ्ते तक म्यूजियम को बंद कर दिया गया था, कि पेंटिंग शायद म्यूजियम में ही अंदर कही होगी। काफी खोच के बाद पता लगा कि इसे म्यूजियम के ही एक कर्मचारी  वर्कर विन्सेन्जो पेरुगिया ( vincenzo peruggia ) ने चोरी किया था। वह इस पेंटिंग को वापिस इटली लेकर जाना चाहते थे। उनका मानना था कि यह इटली की धरोहर है। इटली में कुछ समय रखने के बाद इसे वापिस म्यूजियम में रख दिया गया था। वहीं विन्सेनजो को इसके लिए 6 महीने की सजा दी गई थी, लेकिन इटली के लोगों ने उनकी देश भक्ति के लिए उनका स्वागत किया था। 

मोना लिसा की जुड़वा पेटिंग्स भी है 

कहा जाता है लिओनार्दो डा विन्ची के ही एक स्टूडेंट फ्रेंसिस्को मेल्जी ने इसकी जुड़वा पेटिंग बनाई थी। जो कि स्पेन की राजधानी मैड्रिड के म्यूसेओ दे प्रादों में रखी गई है। 1514 - 1516 के बीच उनके ही एक स्टूडेंट ने मोना लिसा का एक न्यूड वर्जन भी बनाया था। जिसकी हाथों व बॉडी की पॉजीशन असली पेटिंग की तरह ही है। इसे मोन्ना वान्ना कहा जाता है। कहा जाता है कि शायद यह पेटिंग भी लियो ने ही बनाई थी। 


कौन है यह महिला 

लिओनार्दो डा विन्ची पेंटर होने के साथ खुद एक लेखक भी थे, लेकिन उन्होंने कभी भी इस पेटिंग के बारे में कुछ नही लिखा। न ही कभी बताया है कि  यह महिला कौन है, जिसकी यह पेटिंग बनाई गई है। स्कॉलर्स का मानना है कि यह पेटिंग लिस घेरार्दिनी ( Lisa gherardini ) की है जो कि फ्लोरंस की इटालियन की महिला है। वहीं कुछ लोगो का कहना है कि इस पेटिंग में उन्होंने खुद को एक औरत के रुप में बनाया था। 

लोगों ने पहुंचाया था काफी नुकसान 

दूसरे विश्व युद्ध के दौरान मोना लिसा की पेटिंग को 6 बार अपनी जगह से बदला  गया है। ताकि यह जर्मन लोगों के हाथ न लग जाए। इस बाद पेटिंग को लोगों ने काफी नुकसान पहुंचाने की कोशिश की है। एक बार 1956 में एक टूरिस्ट ने इस पर पत्थर फेंका था, जिससे इसकी बाएं बाजू पर निशान पड़ गया था। उसके बाद इसी ठीक कर दिया गया। इतना ही नही एक व्यक्ति ने इस पर एसिड फेंक दिया था। उसके बाद इसे बुलेट फ्रूफ फ्रेम में रखा गया। उसके बाद भी एक महिला ने इस पर लाल स्प्रे छिड़क दिया था। 




 


अस्सल सौंदर्य! अपूर्वा नेमळेकरचा प्रेमात पाडणारा लूक

 


'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत लोकप्रिय झाली.


अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महिला दिनानिमित्त काही फोटो पोस्ट केले आहेत.


'Behind every successful woman is herself' असे कॅप्शन देत अपूर्वाने हे फोटो शेअर केले आहेत.


घागरा-चोली, त्यावर पारंपरिक दागिने, डोक्यावर पदर असा अपूर्वाचा साज प्रेमात पाडणारा आहे.


अपूर्वाच्या या खास लूकसाठी मनिषा कोळगे यांनी मेकअप केलं आहे.


तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अपूर्वा जितकी मालिकेत मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच सुंदर आहे.


अभिनय क्षेत्रात येणे हीच नियती होती, असे मानणाऱ्या अपूर्वाने या क्षेत्रात येण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता.

राखी सावंतने धारण केला श्रीदेवीचा नागीण अवतार, ‘हा’ मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला येईल हसू…

 

‘बिग बॉस 14’मध्ये धमाका केल्यानंतर एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आता तिच्या मजेदार व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे.




‘बिग बॉस 14’मध्ये धमाका केल्यानंतर एन्टरटेन्मेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आता तिच्या मजेदार व्हिडीओद्वारे प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडत आहे. राखी सावंत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि दररोज ती मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी राखीला चक्क नागीण बनण्याची इच्छा झाली होती. तिने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘नगीना’ या चित्रपटाच्या गाण्यात त्यांच्या जागी स्वतःचा चेहरा मॉर्फ केला आहे. राखीचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना हसू आवरत नाहीय (Bigg Boss 14 fame Actress Rakhin Sawant share Nagin funny video).

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये राखी सावंतने लिहिले, ‘मला श्रीदेवीजी खूप आवडतात. माझा आवडता चित्रपट नागीन आहे. जर हा चित्रपट पुन्हा तयार करायचा झाला, तर मग कोणाला कास्ट करावे? आपली निवड कमेंटमध्ये शेअर करा.’ तिला या रुपात पाहून राखीचे चाहते खूप खुश झाले आहेत. पण, स्वत:ला श्रीदेवीची चाहती असल्याचे सांगणार्‍या राखी सावंतने या चित्रपटाचे नावच चुकीचे लिहिले आहे. हे नागीन नाही तर ‘नगीना’ या चित्रपटाचे हे गाणे आहे.

जावेद अख्तर बनवणार राखीचा बायोपिक?

राखी सावंत यांनी नुकतेच एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना तिच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा होता. इतकेच नव्हे तर, राखीने आपल्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावे हे देखील त्यांना सुचवले होते. राखीच्या या वक्तव्याची सगळेच जन खिल्ली उडवत होते. परंतु, जावेद अख्तरने स्वतः या प्रकरणाचे सत्य सांगितले आहे.

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार, जावेद अख्तर यांनी राखी सावंत जे म्हणत आहे, ते बरोबर असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ‘4-5 वर्षांपूर्वी आम्ही फ्लाइटमध्ये भेटलो होतो आणि तिने मला तिच्या बालपणाबद्दल सांगितले. तेव्हा मीच तिला सांगितले की, एक दिवस मी तिच्या जीवनावर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट लिहीन.’(Bigg Boss 14 fame Actress Rakhin Sawant share Nagin funny video)

वादाच्या भोवऱ्यात राखी सावंत

नुकतेच राखीवर एका व्यक्तीने पैसे लुबाडल्याचा आरोप केला होता. अहवालानुसार राखी सावंत यांच्या जवळच्या स्रोताने सांगितले की, अभिनेत्री यामुळे निराश झाली आहे आणि तिच्यावर होत असलेला हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. शैलेश श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीला ती ओळखत देखील नाही. राखीचा जवळचा मित्र म्हणतो की, बिग बॉस नंतर पुन्हा एकदा राखीच्या कारकीर्दीला वेग आला आहे, अशा परिस्थितीत केवळ तिचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिचे कुटुंब लवकरच या संदर्भात निर्णय घेईल.

सध्या राखी सावंत या प्रकरणी मदतीसाठी बर्‍याच लोकांची भेट घेत आहे आणि आईची काळजीही घेत आहे. तर या प्रकरणावर बोलताना ती म्हणाली की, जर 2017 मध्ये एखाद्याची फसवणूक झाली असेल, तर तो इतके दिवस कशाची वाट पाहत होता? तो कायदेशीर खटला दाखल करण्यासाठी बिग बॉसच्या समाप्तीची वाट पहात होता का? आम्ही या प्रकरणात आता कायदेशीररित्या निर्णय घेणार आहोत.










Tuesday, March 9, 2021

Summer Food | उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात आवर्जून सामील करा ‘हे’ घटक, आजारांपासून राहाल दूर!

 

हवामानातील बदलांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि अन्नामध्येही बदल करावा लागतो.




हवामानातील बदलांमुळे आपल्या जीवनशैलीत आणि अन्नामध्येही बदल करावा लागतो. आता हिवाळ्याचा हंगाम संपला आणि उन्हाळ्याने लवकरच येण्याच्या वाटेवर आहे. यामुळे आपले खाणेपिणेही ऋतूनुसार बदलले पाहिजे. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा आरोग्यावर देखील मोठा परिणाम होतो आणि थोडासाही निष्काळजीपणा आपल्याला या दिवसांत आजारी बनवू शकतो. (Add these foods in your summer diet will keep you healthy).

उन्हाळ्याच्या हंगामात, तळलेल्या आणि मासालेदार पदार्थांपासून थोडेसे दूर राहावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हाळ्यात पाण्याअभावी निर्जलीकरण होऊ शकते. म्हणून या हंगामात रस, फळ, नारळ पाण्याचे सेवन केले पाहिजे. या व्यतिरिक्त अन्नामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असणारे घटक सामील करावेत. चला तर, जाणून घेऊया या हंगामात आपण कोणत्या गोष्टींचे सेवन केल्याने शरीर इतर रोगांपासून दूर राहील…

टोमॅटो



टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा घटक अँटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हितामिन सीने समृध्द आहे. टोमॅटोमध्ये लायकोपीन सारखे फायटोकेमिकल्स असतात, ज्यामुळे गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.

दही



उन्हाळ्यात दही खाणे केव्हाही चांगले. हे खाल्ल्याने तुम्हाला आतून थंडावा वाटतो. यात प्रोबायोटिक्स असतात, जे पाचन प्रणाली मजबूत करण्यास मदत करतात. दह्यामध्ये भरपूर प्रोटीन असते, ज्यामुळे दही खाल्ल्यानंतर आपल्याला बराच वेळ भूक लागणार नाही. भूक न लागल्यामुळे आपण अनहेल्दी पदार्थ खाणे टाळू शकू.

संत्री



संत्र्यामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात शरीरातून निघणाऱ्या घामाद्वारे पोटॅशियम बाहेर सोडले जाते, ज्यामुळे शरीरात कमजोरी होण्याची समस्या वाढते. म्हणून या हंगामात संत्रे खाणे फायद्याचे आहे. संत्र्यामध्ये 80 टक्के रस असतो, जो शरीराला हायड्रेटेड ठेवतो.

ग्रीन टी



उन्हाळ्यात आपण कॉफीऐवजी हर्बल चहा पिऊ शकता. ग्रीन टी आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. जर आपल्याला या हंगामात गरम ग्रीन टी पिणे आवडत नसेल, तर आपण तो थंड करून पिऊ शकतो. हे पेय पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे (Add these foods in your summer diet will keep you healthy).

ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी



बेरी फायबरचा चांगला स्रोत आहेत. आपल्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास ब्लॅकबेरीचे सेवन करावे. त्यात व्हिटामिन सी समृद्ध प्रमाणात आढळतो.

सलाड



उन्हाळ्याच्या काळात आहारात सलाडचा समावेश आवर्जून करावा. सलाडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध प्रमाणात असतात. सलाडमध्ये आपण गाजर, टोमॅटो, द्राक्षे, काकडी इत्यादी वापरू शकता.

कलिंगड



कलिंगड शरीर थंड ठेवण्यास मदत करतो. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. यात लायकोपीन असते, जे त्वचेला सूर्यापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवते.


तिकडे काँगोत सोन्याचा डोंगर, इकडे पिंपरीत सोन्याच्या नाण्यांचा ढिग

 

काँगोत सोन्याचा डोंगर आढळला तर इकडे पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याच्या नाण्यांचा ढिग तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात पुरातन वास्तू आढळल्या आहेत. Gold coin in Pimpari



पिंपरीत सोन्याची नाणी आढळली

काँगोत सोन्याचा डोंगर खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना ताजी आहे. पत्रकार अहमद अल्गोहबारी सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसल्याचं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केलेला. इकडे पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये इतिहासकालीन सोन्याची नाणी पोलिसांनी हस्तगत केलीत. तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात पुरातन वास्तू आढळून आल्या आहेत. (Gold Mountain found in Congo Gold coin found in Pimpri Chinchwad and Historical material found in Kolhapur)

आफ्रिकेच्या काँगोमध्ये ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे. स्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. डोंगरावर सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली गेली. काँगो देशाच्या बर्‍याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याची नाणी हस्तगत

पिंपरी चिंचवड पोलिसांना इतिहास कालीन सोन्याची नाणी हस्तगत करण्यात यश आलंय. दोन किलो 350 ग्रॅमची तब्बल 216 सोन्याची नाणी आहेत. त्यावर राजा मोहंमद शाह यांची मुद्रा असून उर्दू आणि अरबी भाषा कोरलेली आहे. इसवी सन 1720 ते 1750 या कालखंडातील असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केलाय. ही सर्व नाणी चार महिन्यांपूर्वी एका बांधकामाच्या खोदकामात आढळली होती. सद्दाम पठाणचे सासरे मुबारक शेख आणि मेव्हणा इरफान शेख या दोघांना ती आढळली. पण त्यांनी सद्दामच्या घरातच ठेवली. नंतर याची वाटणी करण्यावरून वाद झालं अन याची खबर पोलिसांना लागल्याने त्यांचं बिंग फुटलं. बाजार भावानुसार एका नाण्याची किंमत साठ ते सत्तर हजार रुपये असावी, मात्र याचं ऐतिहासिक महत्व पाहता त्यासाठी अनेकांनी मोठी किंमत मोजली असती. अशी माहिती पोलिसांनी दिली.

अंबाबाई मंदिर परिसरात उत्खननामध्ये जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलय.या कुंडाच्या उत्खनना दरम्यान देवी-देवतांच्या प्राचीन मुर्ती, तत्कालीन नाणी इतकंच नव्हे तर जर्मन मेड रिव्हॉल्वर आणि काडतूस देखील मिळून आली आहेत.गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या उत्खननात आतापर्यंत जवळपास 475 पुरातन वास्तू सापडल्या असून आणखीनही काही ऐतिहासिक वस्तु सापडू शकतात असा दावा देवस्थान समितीने केलाय.

सीसीटीव्हीच्या निंयत्रणाखाली काम सुरु


करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरालाच्या आवारात घाटी दरवाजाला लागून मणकर्णिका कुंड असल्याची असल्याची नोंद इतिहासात सापडते.जवळपास 60 फूट खोल असलेल्या या कुंडात देवीच्या स्नानाचे तसच काही नैसर्गिक झऱ्याचे पाणी येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातन महत्त्व असलेल्या या कुंडाला कोंडाळ्यात स्वरूप आलं आणि त्यानंतर हा कुंड बुजवला गेला. यावर एक बगीचा आणि शौचालय सुद्धा बांधल गेलं होतं.अनेक संघटनांनी हा कुंड खुला करण्यासंदर्भात आंदोलन सुरु केली होती.ही मागणी लक्षात घेत महानगरपालिकेने जानेवारी 2020 ला ही जागा देवस्थानकडे हस्तांतरित केली. यानंतर जून 2020 पासून या कुंडाच्या उत्खननाचे काम सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली सुरू करण्यात आलय. उत्खननाला गती येईल तसा या कुंडाचा ऐतिहासिक ठेवा खुला होतोय.

या कुंडात पाच ओवऱ्या आणि पन्नास वीरगळ असल्याचं आता पर्यत च्या उत्खननातून स्पष्ट झालं आहे. कुंडाच्या चार बाजूचे शिवलिंग आणि सोळा ऐतिहासिक झरे आतापर्यंत खुले झालेत… इतकच नाही तर देवी-देवतांच्या प्राचीन मूर्ती, प्राचीन नाणी, सुरक्षित स्थितीत असलेला काचेचा कंदील,जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर तसंच काडतूसदेखील मिळून आली आहेत. या सगळ्या वस्तू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संग्रही ठेवल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव जाधव यांनी दिली.

मनकर्णिका कुंडात सापडलेल्या रिव्हॉल्वरबाबत उत्कंठा

मनकर्णिका कुंडाच्या उत्खननादरम्यान सापडलेल्या या ऐतिहासिक वस्तू तत्कालीन समाजजीवनाच प्रतिबिंब आहेत. प्राचीन काळात भाविकांनी श्रद्धेने टाकलेली नाणी, त्याचबरोबर इतर वस्तू बाबत लवकरच उलगडा होणार आहे. विशेषता इथे सापडलेल्या जर्मन मेड सहा इंची रिव्हॉल्वर आणि काडतुसाबाबत मोठी उत्सुकता  निर्माण झालीय. एकूणच कुंडाचा कचराकुंडी म्हणून वापर सुरू झाल्यानंतर गुन्हे लपवण्यासाठी ही हत्यारं कुंडात टाकली गेली असावीत असा अंदाज उमाकांत राणींगा, मंदिर अभ्यासक यांनी वर्तवला आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंड जवळपास साठ वर्षानंतर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतेय. लवकरच उत्खननाचे काम पूर्ण होणार आहे.त्यानंतर हा कुंड कोल्हापूरच्या पुरातन वास्तू वैभवात आणखीन भर पाडेल.


Monday, March 8, 2021

Jhimma Teaser Release : ’झिम्मा' घडवणार जिवाची सफर

 

टिझर पाहून तरी 'झिम्मा' हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.



काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' या चित्रपटाचे पोस्टर झळकले होते. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर दिसत होता. पोस्टरवरून काहीतरी भन्नाट असणाऱ्या या चित्रपटात काय पाहायला मिळेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने यावरील पडदा उठला असून 'झिम्मा'चा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच

सिनेमात पाहता येणार आहे.


बायकांच्या मनात काय सुरु आहे, त्या कधी कशा व्यक्त होतील, याचा थांगपत्ता लागणं जरा कठीणच. अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, तीच आपल्याला 'झिम्मा'मध्ये पाहायला मिळणार आहे. 'झिम्मा'च्या टीझरवरूनच कळतंय चित्रपट किती धमाकेदार असणार आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा प्रवास अतिशय रंजक दिसत आहे.

इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी 'झिम्मा' हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, "हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्रीला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून फक्त स्वतःसाठी स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणाऱ्या या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे 'झिम्मा'चा टिझर सर्वांसमोर आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही."

'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' हा सिनेमा येत्या २३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून चित्रपटाला अमितराज यांचे संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा आणि स्वाती खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.



Saturday, March 6, 2021

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

 

नावात काय आहे?,' असं महान नाटककार शेक्सपियर म्हणाला होता. त्यावर नावातच बरंच काही आहे, असाही युक्तिवाद केला जातो.




‘नावात काय आहे?,’ असं महान नाटककार शेक्सपियर म्हणाला होता. त्यावर नावातच बरंच काही आहे, असाही युक्तिवाद केला जातो. काही असो. पण नाव, आडनाव या गोष्टी आजही भारतीय समाजव्यवस्थेत बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात. नाव, आडनावावरून तुमचं स्टेट्सही ठरतं अन् तुमची एक इमेजही तयार होते. आता हेच पाहाना लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचं आडनाव दुसरंच काही असतं तर त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली असती का?… हा झाला गंमतीचा भाग… पण आनंद शिंदे यांचं खरं आडनाव शिंदे नाही, दुसरंच आहे… वाटलं ना आश्चर्य! पण ते खरं आहे… आनंद शिंदे यांचं खरं आडनाव काय? आणि ते कसं बदललं? शिंदे हे आडनाव कसं आलं? त्याचाच हा किस्सा.....
भगवानबाबा आणि भजन

आनंद शिंदे यांच्या आजोबांचं नाव भगवान शिंदे. भगवानबाबा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. शिंदे कुटुंबीयांचं घराणं चोखामेळा परंपरेतील गोसावी घराणं. गाणी गाणं, भजन करणं आणि भिक्षा मागून ऊदरनिर्वाह करणं हे शिंदे घराचं काम. त्या काळात दलित कुटुंबातील प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात हे जगणं होतं. व्यवस्थेनं दिलेलं हे काम शिंदे कुटुंबाकडेही आलं नसतं तर नवलंच. अत्यंत दारिद्रय असल्याने भगवानबाबांनी 1917-18च्या सुमारास मुंबई गाठली. मुंबईत येताच भगवानबाबांनी ‘खवताडे’ हे पूर्वाश्रमीचं आडनाव टाकलं अन् शिंदे आडनाव धारण करून नव्या जीवनाला सुरुवात केली. त्यानंतर घरातील सर्वांनीच खवताडे आडनाव टाकून शिंदे हे नावच धारण केलं. गायनाच्या कार्यक्रमात ओळख देताना असो, शाळा, रेशनचं कार्ड असो की दवाखाना… प्रत्येक ठिकाणी या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शिंदे हेच आडनाव लावलं आणि हेच आडनाव पुढे कायमही झालं. त्यामुळेच भगवानबाबांनी त्यावेळी आडनाव टाकलं नसतं तर ‘आनंद शिंदे’ यांनाही ‘आनंद खवताडे’ हेच नाव घेऊन वावरावं लागलं असतं.

आता मला मरण आलं तरी चालेल…

आनंद शिंदे यांचे अनेक किस्से आहेत. त्यातला एक संस्मरणीय किस्सा त्यांनी सांगितला. हा प्रसंग आजही त्यांना जशाच्या तसा आठवतो. तेव्हा आनंद हे नावारुपाला आले नव्हते. पण गायक म्हणून तयार होत होते. प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांच्या घाटकोपर येथील श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमातील हा किस्सा आहे. म्हशीलकरांना श्रद्धांजली म्हणून गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महाराष्ट्रभरातून अनेक गायक आल्याने प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून प्रत्येक गायकाला गाण्यासाठी पाच मिनिटाची संधी देण्यात आली होती. पाच मिनिटे होताच आयोजक माईक बंद करायचे. आपला पुतण्या आणि प्रसिद्ध संगीतकार, गायक विठ्ठल शिंदे यांना आनंद यांना गाण्याची संधी देण्याची विनंती केली. विठ्ठल शिंदे आनंद यांना संधी द्यायला तयार झाले. पण त्यांनी एक अट घातली. रेकॉर्डिंगच्यावेळी प्रल्हाद शिंदे हजर राहणार असतील तरच आनंदला संधी देतो, असं ते म्हणाले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे प्रल्हाद शिंदेही आनंद यांना सोबत घेऊन रेकॉर्डिंगला गेले. आनंद यांना दोन गाणी गाण्याची संधी देण्याच्या अटीवरून प्रल्हाददादांनी व्हिनसमध्ये रेकॉर्डिंग केली.

पत्र नव्हे समजावी तार, निघा लवकर,
बघाया नाजूक सुकुमार,
धनी गत वर्षीची थकबाकी,
झाली एकदम दोन पोरं… !!!

आणि

दाट गर्दी गं सखे पुनागाडीला….

ही दोन गाणी आनंद यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली. या गाण्यांना विठ्ठल शिंदे यांनीच संगीत दिलं होतं. कॅसेट बाजारात आली, हातोहात खपली. पण आनंद यांना म्हणावी तशी अजूनही प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यांना स्टारडम दिलं ते ‘पोपटा’च्याच गाण्याने.

एक गाणं… ज्यांनी त्यांना चळवळीत आणलं

आनंद शिंदे यांनी अनेक गाणी गायली. लोकगीतं गायली, धार्मिक गाणी गायली, आंबेडकरी गीतं गायली, भारूडं, पोवाडे, सिनेमा गीतं यासह अनेक गाणी गायली. पण त्यांच्या आयुष्यात एक असं गाणं आलं ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

सैनिक व्हा भीमाचे, भीमराज आठवा रे,
चला निळ्या निशाणाखाली, सर्वांनी एक व्हा रे !!

आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा मांडणारं हे गाणं आनंद शिंदेंनी गायलं. आजही प्रत्येक जयंती उत्सवात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. हे गाणं गायल्यानंतर आनंद शिंदे स्वत: अस्वस्थ झाले. आणि त्यानंतर ते ऐक्यवादी बनले. गटातटात विखुरलेली आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात केली. रिपब्लिकन नेते रामदास आठवले, गंगाराम इंदिसे आणि मनोज संसारे यांच्यासोबत राहून त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला. रिपब्लिकन नेते एकत्र यावेत, असं त्यांना आजही वाटत असतं.


मला व्यायामाची काय गरज?

 

मला व्यायामाची काय गरज असा समज सर्वसाधारण गृहिणींचा असतो. घरकाम हा व्यायाम असे त्या मानत असल्या, तरी त्या कामाने दमणूक होत असेल, अधिक थकवा जाणवत असेल, तर त्याला व्यायाम म्हणायचे का?

गेल्या काही वर्षांत आपली जीवनशैली वेगळ्या पातळीवर बदलली आहे. करोना पूर्वकाळात असलेली आणि सध्याची, अशा दोन भागांत आपण आपली जीवनशैली विभागू शकतो. दरम्यानच्या काळात अनेक बदल आपल्या आयुष्यात झाले. यात आपण अनेक गोष्टी शिकलो, आपल्यात बदल झाले आणि त्यातला एक बदल म्हणजे घरातील स्त्रियांच्या आयुष्यात झालेला बदल! 'मला व्यायामाची गरज नाही', 'घरकाम हाच माझ्यासाठी व्यायाम', 'घरासाठी राबता राबता मला कुठे वेळ मिळतो व्यायामासाठी...' अशा अनेक सबबी गृहिणींकडे असतात. मात्र, आरोग्याच्या महत्त्वापुढे या सगळ्या सबबी फोल ठरू लागतात, तेव्हा काही तरी चुकते आहे याची जाणीव होऊ लागते. करोनाने आपल्याकडे किती तरी वर्षे मदतीला ज्या बायका येत होत्या, त्यांना घरात यायला मज्जाव केला आणि इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, त्यामुळे घरातली सर्व कामे आपणच करणे तसेच कुटुंबातील सदस्यांची मदत घेणे, घरातील व्यवस्था एकमेकांच्या सोबतीने, संगतीने चालू ठेवणे असा एक अवघड काळ आपण पार केला.


अजूनही परिस्थिती थोडी फार तशीच असल्याने अनेकांना मदतनीस नाहीत आणि असल्या तरी घरातील स्त्रीकडे घरातील स्त्रियांकडे खूप कामे असतात. अशात व्यायामाची सवय आपले आयुष्य, आरोग्य निरोगी राहायला खूप मदत करते आणि आपले जीवन आनंदीही ठेवते.
वर उल्लेख केल्याप्रमाणे गृहिणींना असे वाटते, की आपण घरात सतत खूप काम करतो आणि त्यामुळे आपल्याला वेगळ्या व्यायामाची काहीच आवश्यकता नाही. व्यायाम करून, निरोगी राहून मला कुठे नोकरी-व्यवसायाला जायचे आहे? राहून राहून घरातच राहणार मी, त्यामुळे कशाला हवा वेगळा व्यायाम, अशीही त्यांची धारणा असते. घरात काम करून बायकांना खूप दमायला होते, त्यामुळे आणखी वेगळा व्यायाम नको असे त्यांना वाटणे हे फारच स्वाभाविक आहे; परंतु तरीही वेगळा व्यायाम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. व्यायाम म्हणजे व्यायाम आणि घरकाम हा व्यायाम नाही त्यामुळे या दोघांमध्ये गल्लत करणे चुकीचे आहे. 
एक आहारतज्ज्ञ म्हणून मला असे वाटते, की आपण आपल्या खाण्यापिण्याकडे प्रचंड दुर्लक्ष करतो. मुळात डाएट म्हणजे कमी खाणे हा चुकीचा समज आहे. त्यातून डाएट म्हणजे विविध ठिकाणच्या विविध पोस्ट वाचून लोक स्वतःवर अनेक प्रयोग करत राहतात, हे प्रयोग बहुतांश वेळा अघोरी ठरतात.

स्लीमट्रीम होण्यासाठी, एखाद्या कार्यक्रमासाठी, स्पर्धेसाठी वाट्टेल ते करून बारीक दिसण्यासाठी जी ओढाताण सतत चाललेली असते, त्याने फायदा होण्याऐवजी अपायच होतो. त्या ऐवजी शॉर्टकट्स मिल रिप्लेसमेंट, उपाशी राहणे आणि लवकरात लवकर रिझल्ट मिळवणे हा प्रकार सगळ्या वर्गामध्ये सर्रास आढळून येतो. चांगले खाणे हे शिकवायला लागते हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. खरी भूक लोक विसरत चालले आहेत. बरेचदा आता वेळ झाली आहे म्हणून किंवा आपल्याला अचानक काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली म्हणून खाल्ले जाते. एखादी जाहिरात, कुणाचे तरी सांगणे किंवा व्हॉट्स अॅप, फेसबुकवरील रेसिपी हा 'ट्रिगर फॅक्टर' होतो आणि आपल्याला ते खाण्याची इच्छा होते; परंतु जे चवीचे पदार्थ खाल्ले जातात ते बरेचदा अति शर्करायुक्त; शिवाय अति तेलकट असतात. ते आपल्याला केवळ आणि केवळ स्वाद देतात. जिभेला संतुष्ट करतात, त्यामुळे आपल्याला क्षणभर आनंद होतो. हे पदार्थ आपल्याला कॅलरीही देतात; परंतु लक्षात घ्या, की हे पदार्थ आपल्याला पोषणमूल्ये द्यायला बरेचदा असमर्थ असतात. इतकेच नव्हे, तर हे पदार्थ आपल्याला त्यातील रसायने, कृत्रिम स्वाद, अत्यंत प्रमाणात असलेले मीठ, साखर, मैदा आणि इतर अनेक घटकांमुळे फायदेशीर ठरण्यापेक्षा नुकसान अधिक करतात.
      लॉकडाउनमध्ये असे चमचमीत खाणे जास्त झाल्याने गृहिणींचेही वजन अनपेक्षितरीत्या वाढलेच. त्यामुळे घरकाम हाच व्यायाम असा समजही त्यांचा चुकीचा ठरला. म्हणजेच कमी पोषकमूल्ये आणि त्यातून घरातील काम पडल्यामुळे आपण अजूनच शारीरिक आणि मानसिकरीत्या दमतो, हे लक्षात घ्यायला हवे. पोषण उत्तम नसल्यामुळे प्रत्येक स्त्रीला असे वाटते, की आपण खूपच दमतोय आणि आपल्याला वेगळ्या व्यायामाची गरज नाही; परंतु तसा विचार करणे म्हणजे अनारोग्य आणि पुढील आरोग्याच्या समस्या व तक्रारी यांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.
         मी असे म्हणेन, की व्यायाम करणे हे प्रत्येकालाच अनिवार्य आहे; परंतु व्यायामाची पहिली पायरी म्हणजे स्वतःचा आहार अशा पातळीवर आणून ठेवणे, की ज्यामुळे व्यायाम, घरातील कामे, आपली दैनंदिन व्यवहारातील कामे यामुळे आपल्याला थकवा जाणवण्याचे काहीच कारण नाही; उलट व्यायामाने आपला थकवा दूर होतो आणि दिवसभर उत्साही वाटते. घरकाम करून तुम्ही दमत असाल, थकवा जाणवत असेल, तर काही तरी चुकते आहे हे वेळीच लक्षात घ्या. म्हणजे घरकाम हाच तुम्हाला व्यायाम वाटत असेल, तर त्याने तुमची दमणूक होता कामा नये, थकवाही जाणवता कामा नये, उलट उत्साही वाटायला हवे. तसे होत नसेल, तर घरकाम हा व्यायाम कसा काय झाला?

व्यायाम का करावा?

१. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात. काम करण्याचा वेग वाढतो आणि थकवा जाणवत नाही.

२. वेट ट्रेनिंगसारखा व्यायाम केला, तर हाडांना कॅल्शियम पोहोचू शकते.

३. व्यायामाने शरीराची लवचीकता वाढते. त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात होतो.

४. व्यायामाच्या रोजच्या सवयीमुळे चांगले हॉर्मोन्स स्त्रवतात. त्यामुळे आनंदी वाटते आणि मानसिक ताणही कमी होतो.

५. झोप चांगली लागते, त्यामुळे मानासिक ताण कमी होतो. भूक लागणारे हॉर्मोन जसे, की लॅपटीन आणि घर्लिन यांचे काम नीट सुरू राहून भुकेवर नियंत्रण राहते.

६. व्यायामामुळे आत्मविश्वास वाढीस लागतो. स्वतःबद्दल प्रेम वाटते आणि उत्तम आहाराबद्दल आस्थाही आपोआप वाढते.

७. घामावाटे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडून रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहते. रक्ताभिसरण वाढून त्वचा छान राहते.

८. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

९. व्यायामाच्या रोजच्या सवयीमुळे आपल्याला कॅल्शियम, आयर्न, प्रोटिन यांची मात्रा किती असायला हवी हे कळते, त्यानुसार आहार वाढतो.

Tuesday, March 2, 2021

भारतात नाही तर या देशात आहे गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती


 

गणपतीचं आगमन झाल्यामुळे घराघरात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव एवढ्या दिमाखात साजरा करता येत नाहीये, त्यामुळे मूर्तींच्या उंचीवरही निर्बंध आले आहेत. गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 


थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.


गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे.

थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.


थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचं शहर १५४९ मध्ये वसवण्यात आलं होतं. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं. यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरूवात केली. 


चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवलं आहे. स्थानिक इतिहासाचं संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आलं. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृतीही नांदत आहे. 


मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झालं आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाली. 


गणपतीची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे. गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे.