काँगोत सोन्याचा डोंगर आढळला तर इकडे पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याच्या नाण्यांचा ढिग तर कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात पुरातन वास्तू आढळल्या आहेत. Gold coin in Pimpari
पिंपरी चिंचवडमध्ये सोन्याची नाणी हस्तगत
पिंपरी चिंचवड पोलिसांना इतिहास कालीन सोन्याची नाणी हस्तगत करण्यात यश आलंय. दोन किलो 350 ग्रॅमची तब्बल 216 सोन्याची नाणी आहेत. त्यावर राजा मोहंमद शाह यांची मुद्रा असून उर्दू आणि अरबी भाषा कोरलेली आहे. इसवी सन 1720 ते 1750 या कालखंडातील असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केलाय. ही सर्व नाणी चार महिन्यांपूर्वी एका बांधकामाच्या खोदकामात आढळली होती. सद्दाम पठाणचे सासरे मुबारक शेख आणि मेव्हणा इरफान शेख या दोघांना ती आढळली. पण त्यांनी सद्दामच्या घरातच ठेवली. नंतर याची वाटणी करण्यावरून वाद झालं अन याची खबर पोलिसांना लागल्याने त्यांचं बिंग फुटलं. बाजार भावानुसार एका नाण्याची किंमत साठ ते सत्तर हजार रुपये असावी, मात्र याचं ऐतिहासिक महत्व पाहता त्यासाठी अनेकांनी मोठी किंमत मोजली असती. अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंबाबाई मंदिर परिसरात उत्खननामध्ये जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या आवारात असलेल्या मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आलय.या कुंडाच्या उत्खनना दरम्यान देवी-देवतांच्या प्राचीन मुर्ती, तत्कालीन नाणी इतकंच नव्हे तर जर्मन मेड रिव्हॉल्वर आणि काडतूस देखील मिळून आली आहेत.गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या उत्खननात आतापर्यंत जवळपास 475 पुरातन वास्तू सापडल्या असून आणखीनही काही ऐतिहासिक वस्तु सापडू शकतात असा दावा देवस्थान समितीने केलाय.
सीसीटीव्हीच्या निंयत्रणाखाली काम सुरु
या कुंडात पाच ओवऱ्या आणि पन्नास वीरगळ असल्याचं आता पर्यत च्या उत्खननातून स्पष्ट झालं आहे. कुंडाच्या चार बाजूचे शिवलिंग आणि सोळा ऐतिहासिक झरे आतापर्यंत खुले झालेत… इतकच नाही तर देवी-देवतांच्या प्राचीन मूर्ती, प्राचीन नाणी, सुरक्षित स्थितीत असलेला काचेचा कंदील,जर्मन बनावटीची रिव्हॉल्वर तसंच काडतूसदेखील मिळून आली आहेत. या सगळ्या वस्तू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने संग्रही ठेवल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव जाधव यांनी दिली.
मनकर्णिका कुंडात सापडलेल्या रिव्हॉल्वरबाबत उत्कंठा
मनकर्णिका कुंडाच्या उत्खननादरम्यान सापडलेल्या या ऐतिहासिक वस्तू तत्कालीन समाजजीवनाच प्रतिबिंब आहेत. प्राचीन काळात भाविकांनी श्रद्धेने टाकलेली नाणी, त्याचबरोबर इतर वस्तू बाबत लवकरच उलगडा होणार आहे. विशेषता इथे सापडलेल्या जर्मन मेड सहा इंची रिव्हॉल्वर आणि काडतुसाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालीय. एकूणच कुंडाचा कचराकुंडी म्हणून वापर सुरू झाल्यानंतर गुन्हे लपवण्यासाठी ही हत्यारं कुंडात टाकली गेली असावीत असा अंदाज उमाकांत राणींगा, मंदिर अभ्यासक यांनी वर्तवला आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला अंबाबाई मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंड जवळपास साठ वर्षानंतर पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतेय. लवकरच उत्खननाचे काम पूर्ण होणार आहे.त्यानंतर हा कुंड कोल्हापूरच्या पुरातन वास्तू वैभवात आणखीन भर पाडेल.

No comments:
Post a Comment