Vijay Sales [CPS] IN

Monday, October 12, 2020

देव माणूस मधली डींपी ( डिंमपला सिंपल राहायला आवडतं नाही ) अस्मिता देशमुख

 


डिंमपला सिंपल राहायला आवडतं नाही, असे सारखे म्हणणारी डींपी  महणजे अस्मिता देशमुख देव माणूस या मालिकेतील डिंपीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. डिंपी हे पात्र अभिनेत्री अस्मिता देशमुख साकारत आहे. तर आज आपण अभिनेत्री अस्मिता देशमुख हीच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री अस्मिता देशमुखचा जन्म २९ जून रोजी पुण्यामध्ये झाला आहे. स्मिता लहानाची मोठी देखील पुण्यात झाली. अस्मिताच्या वडिलांचे नाव शरद देशमुख असे आहे. अस्मिताने आपले शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा हायस्कूलमधून पूर्ण केले असून, पुण्यातील एस एम डी टी कॉलेजमधून बीएससी मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

अस्मिताला एक बहीण आहे.  तिच्या आईला कधीच खंत व्यक्त केली नाही,  की मला मुलगा नाही याची. ती आजहि सगळ्यांना सांगते. कि " म्हारो छोरी छोरोसे कम नहीं ..."

अस्मिताच्या दृष्टीने तिचे आई आणि  वडील हे दोघे देवमाणुस आहे. 

मध्यमवर्गीय कुटुंबात अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी मुलींना परवानगी नसते.  त्यामुळे त्यांच्या स्वप्नं ना मुरड घालावी लागते. मात्र आई सारखे देवमाणुस आणि वडीलांचा पाठींबा मिळाला. म्हणुन मी आकाशात उंच भरारी घेवु शकले. 




अस्मिताला अभिनयाची आवड असल्यामुळे यापूर्वी तिने काही म्यूजिक अल्बम आणि नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

देवमाणूस ही अस्मिताची पहिलीच मालिका आहे. देवमाणूस या मालिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. या मालिकेतील डिंपी हे पात्र ती साकारत आहे. आता या मालिकेत पुढे काय काय होणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


तर मित्रांनो अस्मिताने साकारलेलं डिंपी हे पात्र तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.

No comments:

Post a Comment