भाजी घ्या भाजी ताजी ताजी चंद्रावरची भाजी.
NASA ने अंतराळात पिकवली भाजी,
टेक्सास अॅग्रिकल्चरल एक्स्परिमेंट स्टेशनवरील शास्त्रज्ञांनी चंद्र व मंगळावरील वातावरणाची नक्कल करून हिरव्यागार लेटय़ूस भाजीची वाढ करण्यात यश मिळविले आहे. ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारी ही भाजी दीर्घकाळ अंतराळ प्रवास करणाऱ्यांची केवळ दैहिक नव्हे तर मानसिक गरजसुद्धा भागवू शकते,
टेक्सास अॅग्रिकल्चरल एक्स्परिमेंट स्टेशनवरील शास्त्रज्ञांनी चंद्र व मंगळावरील वातावरणाची नक्कल करून हिरव्यागार लेटय़ूस भाजीची वाढ करण्यात यश मिळविले आहे. ‘अ’ जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारी ही भाजी दीर्घकाळ अंतराळ प्रवास करणाऱ्यांची केवळ दैहिक नव्हे तर मानसिक गरजसुद्धा भागवू शकते, कारण भोवतालचा हिरवा निसर्ग ही माणसाची भूक असते.
मातीचा अभाव व कमी गुरुत्वाकर्षणाच्या पाश्र्वभूमीवर झाडाझुडपांची वाढ करणे हे एक आव्हान आहे. चंद्रावरील वातावरणात दाब नाही, त्यामुळे तिथे ढग, पावसाचा पत्ता नसतो. तिथले गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एक षष्ठांश आहे. तिथे पंधरा दिवस काळोख व पंधरा दिवस उजेड असतो. शिवाय, प्रकाश-संश्लेषणासाठी (अन्न-निर्मितीसाठी) आवश्यक असलेला कार्बनचा अंश तिथे नाही. याउलट, मंगळ कार्बन डायॉक्साइडने व्यापलेला! तिथला वातावरणीय दाब पृथ्वीच्या एक शंभरांश! तिथला दिवस पृथ्वीच्या २४ तासांपेक्षा मोठा असला तरी तिथे सूर्यप्रकाशाची उपलब्धता कमी असते. तेव्हा, वनस्पतीच्या वाढीसाठी अनुकूल अशा वातावरणाचे कप्पे निर्माण करून त्यात झाडे, रोपटी वाढविण्याचा संशोधकांचा मानस आहे.
विशेष म्हणजे वातावरणाचा दाब कमी असेल तर तो झाडांच्या वाढीसाठी अनुकूल ठरतो, ही बाब संशोधकांना उत्साहवर्धक वाटते आहे. शिवाय, एथिलीनसारख्या वायूच्या सान्निध्यात वनस्पती जोमाने वाढताना आढळलेल्या आहेत. चंद्र आणि मंगळावरील जमिनीत खास प्रकारचे ‘ग्रोथ चेंबर्स’ तयार करून भाजीपाला पिकविता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. फ्लोरिडा विद्यापीठातील डॉ. वाग्नर बेद्राम व त्याचे सहकारी अंतराळात जत्रोफाची लागवड करून जैविक इंधन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जत्रोफाच्या रोपटय़ाचे ‘कल्चर’ अंतराळात पाठवून त्याच्या वाढीवर व त्याच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलावर या संशोधकांचे लक्ष आहे.संशोधकांनी अंतराळात बटाटय़ाच्या कलमाच्या वाढीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे. पृथ्वीपेक्षा अंतराळात वाढलेल्या बटाटा रोपटय़ाच्या मुळात कमी स्टार्च व जास्त साखर आढळली. तसेच, त्या अंतरिक्ष रोपांची मुळे तुलनात्मकदृष्टय़ा अधिक जोमाने वाढली होती. पृथ्वीवर वाढविलेले कलम गुरुत्वाकर्षणाचा अभाव असलेल्या अंतराळात जोमाने वाढतात, हा महत्त्वपूर्ण दुवा या संशोधनातून हाती लागला आहे.



No comments:
Post a Comment