Vijay Sales [CPS] IN

Thursday, June 25, 2020

‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत प्रेक्षकांची दाद अनुभवता येणार नाही”

‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत प्रेक्षकांची दाद अनुभवता येणार नाही”

प्रेक्षकांशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे, असं श्रेया बुगडे म्हणाली.


झी मराठीवर चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. वेळप्रसंगी कान धरलं आणि पाठ थोपटून भरपूर कौतुकही केलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. ‘सध्या लॉकडाउनमध्येही चला हवा येऊ द्या मुळे आमचा वेळ मजेत जातो’ असं सांगणारे 
अनेक फोन आणि मेसेजेस या कार्यक्रमातील कलाकारांना येतात. प्रेक्षकांच्या या आवडत्या कार्यक्रमाचं शूटिंग देखील लवकरच चालू होईल. पण या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात प्रेक्षकांना सहभागी होता येणार नाही.

याबद्दल बोलताना कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, “येत्या काळात ‘न्यू नॉर्मल’मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळ्या प्रकारची स्किट्स आम्ही सादर करू. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवानी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची मी खात्री देते.”
लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिने शूटिंग बंद होतं. आता अटी-शर्तींवर शूटिंग सुरु होणार असलं तरी कलाकारांना बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे.




No comments:

Post a Comment