Vijay Sales [CPS] IN

Wednesday, June 10, 2020

अभिनेत्री श्रुती मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता, दिसायला आहे खूपच हँडसम

अभिनेत्री श्रुती मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता, दिसायला आहे खूपच हँडसम

तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली.


मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.


श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुतीचा पतीदेखील एक प्रसिद्ध  अभिनेता आहे. श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकरसोबत लग्न केले आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.



गौरव घाटणेकर मराठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील एक नावाजलेले नाव आहे. छोट्या पडद्यावरील ‘तुज विन सख्या रे’ या मालिकेतून गौरव घराघरांत पोहोचला होता. मराठी सिनेमा आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. श्रुती गौरवसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.





No comments:

Post a Comment