ही होती सुशांत सिंहची इच्छा, राहिली अपूर्ण
सुशांत सिंह राजपूतला काहीतरी वेगळे समाजासाठी करायचे होते. त्याचा चुलच भाऊ आणि भाजपचा आमदार नीरज सिंह यांनी सांगितले की सुशांतला १०० मुलांना नासाला पाठवायचे होते. तसेच त्याला पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची इच्छा होती.
या वर्षाच्या अखेरस लग्न होणार होते
भाजप आमदार नीरज सिंहने सांगितले की त्याच्या लग्नाच्या बाबतही विचार सुरू होता. या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत लग्न करायचे होते. मात्र आता काय करणार...सगळचं थांबून गेलंय. सुशांत गेल्या वर्षी येथे आला होता. तो बऱ्याच विषयांवर बोलायचा. त्याला सिनेमांव्यतिरिक्त समाजासाठीही काहीतरी करायचे होते.
गरीब मुलांना नासाला पाठवायचे होते
नीरज सिंह पुढे म्हणाले, सुशांत सिंह राजपूतला १०० गरीब मुलांना नासाला पाठवण्याची इच्छा होती. त्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. मी त्याला म्हटले होते माझ्याकडूनही पाठव. तेव्हा सुशांत म्हणाला होता की नावे पाठव. याबाबत त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घ्यायची होती. सिनेमांशिवाय त्याला समाजासाठीही काहीतरी करायचे होते. त्याचे विचार खूप उच्च होते. मात्र तो असे काही करू शकतो याचा आम्ही कधी विचारच केला नाही.
केदारनाथ नंतर बदलले आयुष्य
नीरज सिंह पुढे म्हणले, सुशांतला अध्यात्माचीही आवड निर्माण झाली होती. नुकतेच आम्ही गावाला गेलो होतो. तो मंदिरात जाऊन पुजा वैगरे करत होता. जेव्हा त्याने केदारनाथ सिनेमा केला तेव्हापासून तो भोलेनाथचीच जास्त चर्चा करत असे. तसेच तिथे जायचे असेल तेव्हा सांगितले की एकत्रच जाऊ. मला वाटले होते की खूप पॉझिटिव्ह झाला आहे. धर्माची आवड निर्माण झाली नाही. ही काही वाईट गोष्ट नाही.
सुशांतला पवित्र रिश्ता या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. २०१३ साली आलेल्या काय पो चे या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. त्यानंतर काही कालावधीतच त्याने यात जम बसवला. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, पीके, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे या सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. त्याचा चांगला फॅन फॉलोईंगही होता.

No comments:
Post a Comment