अक्षय कुमारचा जन्म 9 सप्टेंबर 1967 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता. अक्षयचे वडील हरी ओम भाटिया हे सैनिकी अधिकारी आणि आईचे नाव अरुणा भाटिया आहे. अक्षयला एक बहिण आहे तीच नाव अलका भाटिया आहे.
खूपच कमी लोकांना माहित असेल की अक्षयकुमारच खर नाव राजीव भाटिया आहे, पण चित्रपटांमध्ये त्याने अक्षय कुमार या नावानेच आपली ओळख बनवली. अक्षयला सुरुवातीपासूनच फिटनेस आणि नृत्याची आवड होती. आपल शिक्षण संपल्यानंतर अक्षयने बँकॉक मधून मार्शल आर्टही शिकला आणि अक्षयने बँकॉकमध्ये शेफ म्हणूनही काम केले होते.
त्यानंतर मुंबईत परत आल्यावर अक्षयने मार्शल आर्ट्स शिकवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी छायाचित्रकार असलेल्या अक्षयच्या एका विद्यार्थ्याने त्याला मॉडेलिंग करायचे सुचवले. त्या विद्यार्थ्याने त्याला एका छोट्या कंपनीत मॉडेलिंगची नेमणूक ही दिली.
अक्षयने १९९१ मध्ये बॉलिवूडमध्ये ‘सौगंध’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती पण त्याचा पहिला हिट चित्रपट १९९२ साली आलेला ‘खिलाडी’ हा होता. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अक्षयने प्रथम अॅक्शन चित्रपटातील आपली पकड मजबूत केली.
अक्षयने ‘खिलाडी’ मालिकेच्या सर्व चित्रपटांमध्ये आणि ‘मोहरा’, ‘सपूत’, ‘अंगारे’ सारख्या अॅक्शन चित्रपटात काम केले. पण काही काळानंतर अक्षयने रोमँटिक आणि विनोदी चित्रपटांतही आपली पकड मजबूत केली.
१९९७ मध्ये, यश चोप्राच्या दिल तो पागल है या हिट चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड नामांकन प्राप्त झाले.
१९९९ मध्ये कुमार यांना ‘संघर्ष’ आणि ‘जानवर’ या चित्रपटातील भूमिकांबद्दल त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जानवर’, ‘अंदाज’, ‘धडकन’ आणि ‘नमस्ते लंडन’ ते ‘मुझसे शादी करोगी’, ‘भूल भुलाईया’, ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’ आणि ‘भागम भाग’, ‘हे बेबी’, ‘ वेलकम’ सारखे सर्व चित्रपट सुपरहिट आहेत. २००२ मध्ये ‘अजनबी’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वात्कृष्ट खलनायक म्हणून पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.





No comments:
Post a Comment