वाळू उपसा करताना नदीपात्रात सापडलं शेकडो वर्ष जुनं शिवमंदिर
पेन्ना नदीच्या पात्रात सुरु होता वाळू उपसा
ओडिशामधील महानदीमध्ये काही दिवसांपूर्वीच एक ५०० वर्ष जुनं मंदिर साडलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथेही एक पुरातन शिवमंदीर सापडलं आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार वाळूच्या उपश्यासाठी खोदकाम करताना पुरातन शिवमंदीराचे अवशेष सापडले आहेत.
नेल्लोमधील पेन्ना नदीच्या पात्रामध्ये मंगळवारी (१६ जून २०२०) वाळूचा उपसा सुरु असताना एक मंदिरासारखे बांधकाम आढळून आलं आहे. वेन्ना नदीच्या काठावर असणाऱ्या पेरुमल्लापडू गावामध्ये वाळूचा उपसा सुरु होता. त्याचवेळी वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये मंदिराचा कळस आणि प्रवेशद्वारासारखे बांधकाम आढळून आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे २०० वर्षांपूर्वीचे शिवमंदीर आहे.
महानदीच्या पात्रात मंदिर सापडलं
ओडिशामधील महानदीच्या मुख्य पात्रामध्ये काही दिवसांपूर्वी एक मंदिर आढळून आलं. अनेक वर्षांमध्ये नदीचा प्रवाह बदलल्याने हे मंदिर पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अॅण्ड कल्चर हेरिटेजच्या (आयएनटीएसीएच) सर्वेक्षणादरम्यान हे मंदिर आढळून आलं आहे. नयाघर येथील बहापूरमधील पदमाबती गावात नदी पात्रात हे मंदिर संशोधकांना अगदी नदीपात्राच्या मध्यभागी दिसून आलं. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ६० फूटांचे हे मंदिर गोपीनाथ देवाचे आहे. गोपीनाथ हा भगवान विष्णूचा अवतार असून १५ व्या आणि १६ व्या शतकाच्या सुरुवातील या मंदिराचा कळस बांधण्यात आल्याचे प्राथमिक पहाणीमधून दिसून येत असल्याचं पुरातत्वशास्त्रज्ञचं म्हणणं आहे.

नदी पात्राच्या अगदी मध्यभागी आहे हे मंदिर
अनेक वर्षांमध्ये नदीचा प्रवाह बदलल्याने हे मंदिर पाण्याखाली गेल्याचे सांगण्यात येत आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ६० फूटांचे हे मंदिर गोपीनाथ देवाचे आहे. गोपीनाथ हा भगवान विष्णूचा अवतार असून १५ व्या आणि १६ व्या शतकाच्या सुरुवातील या मंदिराचा कळस बांधण्यात आल्याचे प्राथमिक पहाणीमधून दिसून येत असल्याचं पुरातत्वशास्त्रज्ञचं म्हणणं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ११ वर्षांपूर्वीही मंदिराचा कळस दिसून आला होता. मात्र आता नदीमधील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुन्हा हा कळस दिसत असल्याचे गावकरी सांगतात.
गाकवऱ्यांनाही आता या मंदिरासंबंधित सरकारने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. शक्य असल्यास हे मंदिर नदीपात्रामधून बाहेर काढावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या मंदिरामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील असं गावकऱ्यांना वाटतं.

No comments:
Post a Comment