Vijay Sales [CPS] IN

Sunday, June 28, 2020

‘सैराट’मधल्या परशासोबतची ही नवी आर्ची कोण?

‘सैराट’मधल्या परशासोबतची ही नवी आर्ची कोण?



सैराट या मराठी चित्रपटापासून आकाश ठोसर हे नाव आता महाराष्ट्रातील घराघरात परिचयाचं झालं आहे.



एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट हिट झाला की त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे गॉसिप रंगू लागतं. त्याच्याबद्दलच्या बातम्या लोक चवीचवीने वाचतात.



आकाशसारखा तरुण आणि हँडसम अभिनेता असेल, तर तरुणींना त्या अभिनेत्या संदर्भातील बातम्यांमध्ये अधिक रस असतो.



पण परशा-आर्ची जोडीतील परशा हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे.



आकाशने एका मुलीसोबतचा आपला फोटो पोस्ट केल्याने अनेक तरुणींच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण ती मुलगी कोण आहे हे कळल्यावर मात्र त्याच्या तमाम चाहत्यावर्गाला हायसे वाटले.


काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल याने रोहित शर्माचा महिला वेषातील एक फोटो पोस्ट केला होता. एका अ‍ॅप च्या साहाय्याने तो फोटो बनवला होता.


तशाच प्रकारच्या अ‍ॅपच्या साहाय्याने आकाशने आपले चार वेगवेगळे महिला वेषातील फोटो बनवले आणि आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.


आहे का कुणी अशी? असेल तर सांगा!! असं कॅप्शन देत आकाशने साऱ्या चाहत्यांना चॅलेंजदेखील दिले आहे.



गेले काही दिवस चेहरा बदलून स्त्रियांचे पुरूषी रूप किंवा पुरूषांचा महिला वेष कसा दिसेल याबद्दलच्या फोटोंचा ट्रेंड आला आहे. त्याचीच आकाशला भुरळ पडल्याचे दिसून आले.


No comments:

Post a Comment