Vijay Sales [CPS] IN

Wednesday, July 22, 2020

पतीशी घटस्फोट घेऊन तिने स्वत:च्या सावत्र मुलाशीच केलं लग्न

पतीशी घटस्फोट घेऊन तिने स्वत:च्या सावत्र मुलाशीच केलं लग्न



लग्नागाठ ही स्वर्गात बांधली जाते असं सांगतात. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातली कायम लक्षात राहणार गोष्ट असते. मात्र काही जोड्या या अगदीच अनपेक्षितपणे आणि अनाकलनिय अशा असतात. अशीच एक जोडी सध्या इंटरनेटवर चांगलीच चर्चेत आहे ती म्हणजे ३५ वर्षीय मरिना बालमासेवा आणि २० वर्षीय अ‍ॅलेक्से. या दोघांच नुकतचं लग्न झालं. आता तुम्ही म्हणाल की वयाचं अंतर फार आहे मात्र अशी लग्न जगभरात होतात. मात्र अ‍ॅलेक्से हा मरिनाचा सावत्र मुलगा आहे. 




मागील आठवड्यामध्ये मरिना आणि अ‍ॅलेक्सेने नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन लग्नाची नोंदणी केली. 



मरिनाने पती अ‍ॅरेपासून घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर मरिना आता अ‍ॅरेचा मुलगा अ‍ॅलेक्सेबरोबर लग्न बंधनात अडकली आहे.


मरिना ही कॅरान्सोदर केराज या प्रांतातील आहे. तिचे अ‍ॅरेबरोबर लग्न झालं तेव्हा अ‍ॅलेक्से हा १० वर्षांचा होता.


अ‍ॅरे आणि मरिनाचा नुकताच घटस्फोट झाला. त्यानंतर मरिनाने अ‍ॅलेक्सेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.



मरिना ही आज ३५ वर्षांची असून अ‍ॅलेक्से २० वर्षांचा आहे. तर मरिनाचा घटस्फोटीत पती आणि अ‍ॅलेक्सेचे वडील अ‍ॅरे ४५ वर्षांचे आहेत


मरिनानेच अ‍ॅलेक्सेबरोबरच्या लग्नाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.


मरिना ही इन्स्टाग्राम इन्फ्ल्यूएन्सर आहे. म्हणजेच तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यामुळेच तिने ही पोस्ट टाकल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.


मरिना आणि अ‍ॅलेक्से हे २०२० च्या सुरुवातीलाच लग्न करणार होते. मात्र करोनाच्या साथीमुळे त्यांचे लग्न लांबवणीवर पडले. 


अ‍ॅलेक्सेबरोबर लग्न केल्याची माहिती मरिनाने सोशल मिडियावरुन दिली आहे. तिने लग्नाचे काही फोटो, व्हिडिओ आणि कागदपत्रांचे फोटो पोस्ट केले आहेत.



"रजिस्टर लग्न केल्यानंतर आम्ही पारंपारिक पद्धतीचे कपडे परिधान करुन स्थानिक हॉटेलमध्ये एक छोटं रिसेप्शन केलं," अशी कॅप्शन मरिनाने एका फोटोला दिली आहे.



मरिनाने सध्या तिचा आणि अ‍ॅलेक्सेचा अ‍ॅरेशी कोणताही संबंध नसल्याची माहिती दिली आहे.


मध्यंतरी मरिनाने अ‍ॅरेसोबतचा जुना फोटो पोस्ट करत, "आमच्यात जे घडलं ते त्याला बहुदा आवडलेलं दिसत नाही," असं म्हटलं होतं.


मरिना ही गर्भवती असून लवकरच हे नवविवाहित दांपत्य मोठ्या शहरामध्ये राहण्यासाठी जाणार आहे. 



काही वर्षांपूर्वी मरिना एका डॉक्युमेन्ट्रीमध्ये दिसली होती. यामध्ये तिने तिचा वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर ती रशियामध्ये बरीच लोकप्रिय झाली होती.

No comments:

Post a Comment