विनोदि भूमिका असो किंवा गंभीर भूमिका तितक्याच अभिनय क्षमतेने ज्याने त्या रंगवल्या त्या तुम्हा-आम्हा सर्वांच्या आवडत्या लक्ष्याचा आज १६ डिसेंबर रोजी “स्मृती दिन” आहे . लक्ष्मीकांत बेर्डेचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ साली मुंबई येथे झाला. लहान असतानाच ‘आपण मोठं होऊन बस कंडक्टर बनायचं आणि तिकिटाचे सर्व पैसे आपल्या घरी न्यायचे आणि श्रीमंत बनायचं’ असं त्याला वाटायचं. ‘टूरटूर’ हे त्याचं पाहिलं नाटक तुफान गाजलं. ‘ हसली तर फसली ‘ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट . ‘थरथराट, धुमधडाका, खतरनाक, झपाटलेला’ हे चित्रपट करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. परंतु सरत्या काळात सर्वांचा हा लाडका लक्ष्या काहीसा तुटक वावरू लागला.
काही कालावधीनंतर लक्ष्या” लेले विरुद्ध लेले” या नाटकासाठी दौरे करू लागला. याचदरम्यान लक्ष्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या आजरपणामुळे तो चित्रपटात देखील कमीच वावरू लागला. यादरम्यान तो फारसा कुणाला भेटतहि नसे. पुण्यातील लोणावळा येथील त्याच्या बंगल्यावर कुटुंबासोबत तो आपले आजारपण काढत होता. आजारपणामुळे लक्ष्या फार सडपातळ झाला होता. हि बातमी लक्ष्याने सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आपण लोकांसमोर सदैव हसतखेळताना दिसलो आणि शेवटच्या दिवसातही आपली छवी तशीच राहावी ह्यासाठी त्याने एकांतात राहणे पसंत केले. अखेर १६ डिसेंबरच्या सकाळीच ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ गेल्याची बातमी समाज माध्यमात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी हिंदी मराठी चित्रपटातील खऱ्या विनोदवीराला कायमचा गमावून बसल्याची खंत त्याच्या चाहत्यांनी ढसाढसा रडून व्यक्त केली. यावेळी मराठी हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी एक सच्चा मित्र गेल्याची खंत अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त केली. आज लक्ष्याला जाऊन १४ वर्षे लोटली असली तरी देखील त्याच्या अभिनयाची छाप कायम रसिकजणांच्या मनात घर करून राहील हे निश्चित…


No comments:
Post a Comment