झी मराठी वाहिनीवरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. आसावरी, अभिजीत राजे, शुभ्रा, सोहम, प्रज्ञा यांसोबतच मॅडीनेही प्रेक्षकांची मनं जिंकलीआहेत
अभिनेत्री भक्ती रत्नपारखी मॅडीची भूमिका साकारत आहे.
भक्तीने 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक मालिका व रिअॅलिटी शोजमध्ये काम केलं आहे.कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या रिअॅलिटी शोमधून ती घराघरांत पोहोचली आहे.
तू अशी जवळी राहा' या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली.खऱ्या आयुष्यात भक्ती विवाहित असून मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता निखिल रत्नपारखी तिचा पती आहे.निखिलने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांत, मालिकांत विनोदी भूमिका साकारल्या आहेत.निखिलने ‘ओह माय गॉड’, ‘पहेली’, ‘जयंताभाई की लव्हस्टोरी’ या हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.त्याचप्रमाणे ‘नारबाची वाडी’, ‘व्हेंटिलेटर’, ‘सुपरस्टार’ यांसारख्या मराठी चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.अग्गंबाई सासूबाई' मालिकेत अल्लड मॅडीची भूमिका साकारणारी भक्ती खऱ्या आयुष्यात खूप सुंदर दिसते.






No comments:
Post a Comment