Vijay Sales [CPS] IN

Thursday, August 13, 2020

चला हवा येऊ द्या फेम “अंकुर वाढावे”ची मन हेलावणारी पोस्ट

 

चला हवा येऊ द्या फेम “अंकुर वाढावे”ची मन हेलावणारी पोस्ट



एखाद्या व्यक्तीचे व्यंग हे चेष्टेचा विषय बनलेली अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. परंतु अशा चेष्टेला कितपत बळी पडणे हे त्या व्यक्तीवरही अवलंबून असते. असेच काहीसे चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे या कलाकारानेही अनुभवले आहे आणि अनुभवत आहे. अंकुर वाढवे उत्तम अभिनयासोबतच एक उत्कृष्ट कविता देखील करणारा कलाकार आहे. आपली व्यथा त्याने आपल्या या पुढे दिलेल्या कवितेतून लिहिली आहे. त्याची ” भावना” ही कविता निश्चितच मन हेलावणारी जरी असली तरी त्याला खचून न जाता आयुष्यात पुढे चालत कसे राहायाचे हे त्याच्याकडे पाहून तुम्हा आम्हा सर्वानाच खात्री पटेल. त्याच्या कवितेत त्याने आपले मन कसे मोकळे केले आहे ते जाणून घेऊयात…


ankur wadhave actor

सगळ्यांच्या भावनांचा आदर ठेवून माझ्या स्वतःच्या भावना व्यक्त करतोय माझ्या मुळे भावना दुखावलेल्यांची जाहीर माफी मागतो. …….-भावना .. मला छोटू म्हणा, बुटक्या म्हणा, म्हणा हवा तर बारक्या बोच्याच्या, माझ्या भावना दुखणार नाहीत; प्रपोस केला तर दादा म्हणा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती म्हणा .. म्हणा हवं तर तोंड पहिला का आरशात भावना माझ्या दुखत नाहीत; कुत्रे मागे लागो की लागो लहान मुलांचा जत्था ‘ओय बारका माणूस!’ भावना माझ्या दुखणार

नाहीत; रस्त्यावर उभा असताना उगाच टपली मारून जा … बुडावर चापटी मारून भावना माझ्या दुखणार नाहीत; ‘हा चुत्या आहे याला काय..’ म्हणा सल्ला दिला तर बिंधास्त ‘हुशारी मारू नको’ म्हणा भावना माझ्या दुखणार नाहीत होय, नाही दुखणार भावना उथळ असतात…….त्या आता माझ्या दुखावून दुखावून झाल्या बोथड – अंकुर विठ्ठलराव वाढवे . अनेकांनी हि पोस्ट शेअर करत अंकुश बद्दलचा आडवं त्यांच्या शब्दात व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे . अंकुशच कामच त्याला खूप काही देऊन गेलं आणि तो मेहनती तर आहेच शिवाय त्याच्यातील माणुसकी खूप मोठी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय.

No comments:

Post a Comment