‘हेल्दी डाएट’च्या नावाखाली विषारी घटकांचे सेवन करताय? थांबा! आधी खाद्यपदार्थांची शुद्धता तपासा
डाळी
सामान्यत: बाजारात विकल्या जाणाऱ्या डाळींचा रंग टिकवण्यासाठी त्या ‘मेन्टील यलो पेंट’ने रंगवल्या जातात. त्याची तपासणी करण्यासाठी आपल्याला हायड्रोक्लोरिक अॅसिडची आवश्यकता असते. चाचणीसाठी थोडी मसूर डाळ घेऊन ती पाण्यात टाका आणि त्या पाण्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे चार थेंब घाला. जर, मसूर डाळीमध्ये भेसळ केली तर पाण्याचा रंग लाल होईल. असे आढळल्यास सावधगिरी बाळगा अन्यथा मूत्रपिंडासंबंधित समस्या किंवा पाचन तंत्राचा त्रास होऊ शकतो. याच पद्धतीने आपण हळदीची शुद्धता देखील तपासू शकता.
दूध
दुधाची शुद्धता तपासण्यासाठी आपल्याला लॅक्टोमीटरची आवश्यकता लागते. याशिवाय दुधात नायट्रिक अॅसिडचे दोन थेंब मिसळून देखील शुद्धता तपासता येते. नायट्रिक अॅसिड मिळताच दूध आणि पाणी दोन्ही आपोआप वेगळे होते (How to check the purity of pulse, grains, and other food ingredients).
लाल तिखट / मसाला
वीट किंवा मातीची बारीक भुकटी लाल तिखट किंवा मसाल्यात भेसळ करण्यासाठी वापरली जाते. त्यासह यात कृत्रिम रंगही मिसळला जातो. या चाचणीसाठी पाण्यात लाल मिरची घाला आणि काही वेळ थांबा. जर, लाल तिखट पाण्यावर तरंगताना दिसत असेल, तर ते शुद्ध आहे. परंतु, जर ते तळाशी गेले तर, त्यात भेसळ आहे.
हिंग
शुद्ध हिंग जाळले असता, ते प्रकाशित होते. व्यतिरिक्त शुद्ध हिंग पाण्यात टाकले असता, त्याचा रंग दुधीच्या रंगाप्रमाणे होते. जर असे काही घडले नाही तर ते भेसळयुक्त हिंग असू शकते.
वाटाणे
मटारच्या दाण्यांवर हिरवा रंग वापरला जातो, जो शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्याची शुद्धता तपासण्यासाठी, मटार काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा. भेसळयुक्त असल्यास मटारचा हिरवा रंग निघून जाईल.
काळी मिरी
काळ्यामिरीत भेसळ करताना त्यात पपईच्या बिया सुकवून त्या मिसळल्या जातात. जर आपल्याला याची शुद्धता तपासायची असेल, तर काळीमिरी पाण्यात टाका. काळीमिरी पाण्यात बुडेल, तर पपईचे दाणे पाण्यावर तरंगू लागतील.







No comments:
Post a Comment