Vijay Sales [CPS] IN

Wednesday, January 6, 2021

आज आपण कावळा या पक्षी विषयी थोडक्यात माहिती घेऊ या. कावळा अर्थात काक हा असा पक्षी

 जय हरि माऊली! 

आज आपण कावळा या पक्षी विषयी थोडक्यात माहिती घेऊ या. 



कावळा अर्थात काक हा असा पक्षी आहे ज्याला जिवात्मा ( मृत व्यक्तीचे सूक्ष्म शरीर ) व परमात्मा ( देवाचे स्वरुप ) हे दोन्ही दिसतात.


कावळा चकना असतो म्हणजे एक डोळा मोठा व दुसरा लहान असतो म्हणून तो वाकडी मान घालून बघत असतो त्याला एका डोळ्याने देवाचे व दुसऱ्या डोळ्याने जिवात्माचे रुप दिसून येते.


जेव्हा आपण पिंड किंवा मृत व्यक्ती साठी वाडी ठेवतो तेव्हा जिवात्मा त्या ठिकाणी काळ्या सावली सारखा हजर असतो तो इतरांना न दिसता फक्त कावळ्यालाच दिसतो कारण जिवात्माला जवळून बघण्याची दूरदृष्टी ही फक्त कावळ्या मध्येच असते.


पिंड किंवा वाडी समोर एक काळी सावली हालचाल करीत आहे हे त्याला दिसते म्हणून तो त्या पिंडाजवळ जात नाही... गेला तरी ती सावली त्याला हिसकावून लावते.जिवात्मा अतृप्त असल्याने आपल्या जागेतून हलत नाही परंतू जेव्हा पिंडदान करणाऱ्याने जेव्हा त्याचा मनातील ईच्छा पूर्ण करेन असे आश्वासन देताच तो जिवात्मा तृप्त होतो व पुढच्या मार्गक्रमणाला निघून जातो.


कावळ्याला तेथील सावली निघून गेली हे समजताच तो पिंडाला येऊन शिवतो.कावळा हा शनि देवाचे वाहन असून यमलोकाचा द्वारपाल आहे.पाताळात त्यांचा काक लोक असतो तेथे याचा नित्य निवास असतो.


इतर अनेक पक्षी आहेत ज्यांना वेगवेगळी दूरदृष्टी असते उदाहरणार्थ - गरुडाला तेज नजर असते तो उंच आकाशातून ही आपले भक्ष जमिनीवर बारकाईने शोधू शकतो.घुबडाचे डोळे अंधारात उजेडाप्रमाणे चालतात तसेच कावळ्याला जिवात्मा व परमात्मा पाहाण्याची दिव्यदृष्टी लाभलेली असते.


पौराणिक कथे नुसार कावळाला अमरत्व म्हणजे सृष्टीचा अंत झाला तरी तो एकमात्र पक्षी जिवंत राहू शकतो असे वरदान श्री विष्णूंनी दिले आहे.


कावळा व कुत्रा यात काहीच फरक नाही.हे दोन्ही प्राणी मनुष्याशी एकरुप आहे.ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल अशा व्यक्तींचा मृत्युकाळ यांना आधीच समजून येतो म्हणून कावळे घरावर, छतावर किंवा खिडकीवर येऊन काक्रोश करत असतात तर कुत्रा हा रात्री रडत असतो.


काहींच्या मते यमदूत हे मृत्यू होणाऱ्या व्यक्तीच्या काही दिवस आधी घराजवळ फेरफटका मारतात हे यमदूत कुत्रा व कावळ्याला दूरदृष्टी ने समजून येतात पण कोणाचा मृत्यू होणार हे समजून येत नाही म्हणून आपली भावना संकेत जवळच्या मनुष्यापर्यत पोहचवण्याचे काम हे करतात.


मृत्यू नंतर अंतिम यात्रा बाहेर काढली जाते तेव्हा हेच सर्व कुत्रे कोल्हेकुईत आळवत असताना दिसतात कारण त्यांना तिर्डीवर काहीतरी ( जिवात्माची हालचाल ) सौम्य हालचाल होत आहे हे दिसत असते.जवळचा व्यक्ती गेला ही भावना कुत्रांच्या मनात आल्याने इतर सर्व कुत्रे सुद्धा शोक आळवनी  करतात.


कोल्हापूरात पूर येत आहे.नदीची पातळी वाढत आहे हेच संकेत कुत्रे तेथील गावकर्याना देत होते मग तेथून त्यांनी काढता पाया घेतला होता तसेच २००४ साली दक्षिण भारतात त्सूनामी येणार याचे संकेत तेथील हत्तींना समजताच ते तेथून निघून गेले.


मनुष्यापेक्षा दिव्यदृष्टी ही प्राण्यांना लाभली आहे कारण प्राणी हे निसर्गाशी एकरुप आहेत.निसर्गाची प्रत्येक बारीकसारीक हालचाल त्यांना जवळून समजते.


दत्त मंदिर किंवा स्वामींच्या मठात कुत्रा हा भजनात रडताना दिसतो.शंख वाजवताना शंखाध्वनी सारखा आळवताना दिसतो कारण कुत्राचे पुर्वजन्मी संकेत व भक्ती भावनेने दत्त मुर्तीत दिसणारा सूक्ष्म दैवी ( दत्त ) अवतार तो चटकन ओळखतो तेव्हा तो परमेश्वराशी एकरुप असतो.


मनुष्याशा पेक्षा दिव्यदृष्टी ही प्राण्यांमध्ये असते.त्यांचा डोळ्यातील नेत्रपटल ( chorold ), 

दृष्टीपटल ( Ratina ), 

श्वेतमांडल ( Sciera ), 

भिंग ( Lens ) 

या वरती संशोधकांचे संशोधन सध्या चालू आहेत.



टिप :- सदरील लेख हा  मनोरंजन म्हणून पहावे  हि विनंती.


No comments:

Post a Comment