Photo : या फोटोत ऐश्वर्याला ओळखलंत का?
एका बर्थडे पार्टीतील हा फोटो असून ऐश्वर्या त्यात मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहे.
सिनेसृष्टीतील सर्वांत सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आपल्या आरसपानी सौंदर्याने ती आजही चाहत्यांना घायाळ करते. ऐश्वर्याने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरंच उशिरा पदार्पण केलं. मात्र पदार्पण करताच तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. इन्स्टाग्रामवर सध्या तिच्या लहानपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत तुम्ही तिला ओळखलंत का?
एका बर्थडे पार्टीतील हा फोटो दिसत असून ऐश्वर्या त्यात मित्र-मैत्रिणींसोबत दिसत आहे. पहिल्या फोटोत हास्यानेच तिची ओळख सहज पटते. तर दुसऱ्या फोटोत तिचे डोळे खूप काही बोलून जातात. ऐश्वर्याच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
ऐश्वर्या २०१८ मध्ये ‘फन्ने खान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव व अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ती लवकरच दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटात झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे त्यात ती नकारात्मक भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. या चित्रपटात विक्रम, कार्ती, जयम रवी, विक्रम प्रभू आणि अदिती राव हैदरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील

No comments:
Post a Comment