Vijay Sales [CPS] IN

Thursday, February 18, 2021

रॉयल कारभार! आस्ताद-स्वप्नालीचा लग्नात राजेशाही थाट

 


मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी  आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.


आस्ताद आणि स्वप्नालीने १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रजिस्टर पद्धतीने लग्न केले.


राजेशाही थाटात स्वप्नाली-आस्तादचा लग्नसोहळा पार पडला.


सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे.


लग्नात आस्तादने ऑफ व्हाइट रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते. तर, स्वप्नालीनेदेखील मरुन रंगाची भरजरी साडी नेसली होती.


अत्यंत साधा मेकअप करुनदेखील स्वप्नालीचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.


या लग्न समारंभाला मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी हजेरी लावली.


            आस्ताद स्वप्नालीच्या लग्नातील खास क्षण


                आस्ताद-स्वप्नालीचा रॉयल कारभार


                      लग्नासाठी आस्तादचा स्वॅग

      सोशल मीडियावर होते आस्तादच्या लुकचीही चर्चा


काही वर्षांपासून आस्ताद आणि स्वप्नाली एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.







No comments:

Post a Comment